महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजीत सिंह घाटगे यांच्या विजयासाठी आरदाळ येथे भैरीदेवाला घातले साकडे.( ग्रामदैवतांना दंडवत घातला दंडवत..)
आजरा.- प्रतिनिधी.
कागल विधानसभा मतदार संघातील चुरशीच्या लढाईत व कागल मतदार संघातील बदल हवा असणाऱ्या व राजे समरजितसिंह घाटगे यांचे वर प्रेम करणाऱ्या सूर्यकांत पाटील व विशाल पुंडपळ या दोन कार्यकर्त्यांनी आरदाळ गावातील सर्व ग्रामदैवतांना दंडवत घातला आहे. गावातील मतदार, ग्रामस्थ व महिला यांचे समवेत घागरी कळस घेऊन ओल्या अंगाने महादेव मंदिरामध्ये आरती करून येथून दंडवत घालत दत्त मंदिर येथून गावातून भैरी मंदिरापर्यंत वाजत गाजत दंडवत घातला व ग्रामदैवत भैरीदेवाला साकडे घातले व प्रचारास सुरुवात केली. रविवार हा भैरीदेवाचा वार असल्याने प्रचाराची सुरुवात केली.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी जाधव, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव, उद्योजक शंकर पावले, प्राध्यापक सुभाष शेळके सर, सरपंच रुपाली पाटील ,ग्रा.पं. सदस्य विठ्ठल पोवार, ग्रा.प. सदस्य मंगल पुंडपळ, महादेव पुंडपळ, स्वाती पाटील, प्रीतम पाटील, सुहास शिवणे, सुरेश पावले, शिवाजी पोवार, भिकाजी ससाने, दिलीप सोनार, मेघा ससाणे, बबन पाटील, अशोक पावले, बाळू पोवार, कृष्णा चव्हाण, विठ्ठल नाईक, सुनील डवरी, प्रकाश देसाई, वीरधवल देसाई, आनंदा डवरी, महादेव जाधव यांचेसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्राध्यापक सुभाष शेळके सर म्हणाले आपल्या मतदार संघात निष्कलंक निस्वार्थ उमेदवाराची गरज असून राजेंच्या रूपाने उमेदवार आपल्याला लाभला आहे त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला बळ मिळाले असून राजे आमदार झाल्यावर या भागाचा विकास करतील. शिवाजी गुरव म्हणाले राजेसाहेब आमदार होऊन महाविकास आघाडीचे मंत्री होणार आहेत त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी राहूया त्यांना बळ देऊया उद्योजक शंकर पावले यांनी आभार मानले.
