आजरा अर्बन बँकेकडे दीपावली पाडव्यानिमित्त ८ कोटी ३५ लाखाच्या ठेवी जमा.
आजरा.- प्रतिनिधी.
दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल ८ कोटी ३५ लाख ३४ हजार रुपयांच्या ठेवी एका दिवसात जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. सध्या बँकेकडे ९४९ कोटी ९८ लाख रूपयाच्या ठेवी व ६१९ कोटी २१ लाख रुपये कर्जे आहेत. त्याबाबत बँकेचे संचालक व अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख मा.श्री. अशोकअण्णा चराटी, बँकेचे चेअरमन मा.श्री. रमेशअण्णा कुरुणकर, व्हा. चेअरमन मा.श्री. सुनिल मगदुम व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले व सर्वांना बँकेच्या वतीने दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
