आजरा शहराच्या विकासासाठी आम. आबिटकर यांच्या सोबत. १२ माजी नगरसेवक ( आबिटकर म्हणजे आमचा पक्ष.- माजी नगरसेवक अशोक चराटी.- आजरा शहरातून वाढता पाठिंबा. )
आजरा.- प्रतिनिधी.

आम. प्रकाश आबिटकर म्हणजेच आमचा पक्ष आहे. आजरा शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व माजी नगरसेवक एकत्र येऊन पाठिंबा देत असल्याचे पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक अशोक चराटी यांनी सांगितले स्वागत प्रास्ताविक माजी नगरसेवक विलास नाईक यांनी केले.
पुढे बोलताना श्री चराटी म्हणाले आजरा ग्रामपंचायत असताना इतका निधी मिळत नव्हता. पण सर्वांच्या सहकाऱ्यांनी आजरा ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली व आजरा शहराचा विकास होऊन कायापालट झाला. हे नाकारता येणार नाही. अनेक कामे मंजूर झाले आहेत परंतु आचारसंहितामुळे थांबली आहेत. ती देखील निवडणुकीनंतर पूर्ण करू आपण केलेल्या कामाची पोचपावती म्हणून मताच्या पेटीतून आजरा जिल्हा परिषद मधून मताधिक्य द्यायचे आहे. आजरा शहरातील सर्व उपस्थित माजी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील मतदारांना धनुष्यबाण चिन्ह घरोघरी जाऊन सांगावे व प्रचाराला सुरुवात करावी. प्रचाराची सुरुवात तशी उमेदवारी अर्ज भरल्यापासून चालूच केली आहे. परंतु आज पासून पुन्हा आपापल्या प्रभागात सर्वांनी मिळून आघाडी घेऊ या असे बोलताना श्री चराटी म्हणाले.
यावेळी बोलताना प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले आजरा शहर व आजरा जिल्हा परिषद मधील केलेला आमदारानी आजरा जिल्हा परिषद मध्ये प्रचंड विकास कामे केली आहेत. यामध्ये गवसे येथील वैद्यकीय रुग्णालय, गंगामाई वाचन मंदिर, क्रीडा संकुलन क्रीडांगणासाठी निधी, रवळनाथ मंदिर, आजरा येथील होणारे ५० बेड हॉस्पिटल, आजरा शहर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी केलेले रस्ते गटरी विकास. असे अन्य बरेच विकास कामे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेले आहेत. आपण जी आजरा शहरातून आघाडी देणार आहात. याचा फरक पूर्ण मतदारसंघात पडणार आहे. नक्कीच खात्री आहे आपण केलेल्या विकास कामाला पोचपावती म्हणून मताचे पेटीतून भरघोस मतदान करणार आहात. असे बोलताना प्रा. आबिटकर म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी ,माजी उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, माजी नगरसेवक सिकंदर दरवाजकर, आनंदा कुंभार, माजी नगरसेविका शुभदा जोशी, शकुंतला सलामवाडे, सह मुस्लिम समाजाचे समाज बांधव, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय पाटील यांनी आभार मानले.

🛑माजी नगरसेविका सुमैय्या खेडेकर गट व कार्यकर्त्यांचा आम. आबिटकर यांना पाठींबा.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील व आजरा जिल्हा परिषद मधील आजरा नगरपंचायत च्या माजी नगरसेविका सुमैय्या खेडेकर गट व कार्यकर्ते यांनी आज दि. ४ रोजी आमदार प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा दिला. यावेळी बोलताना सौ खेडेकर म्हणाल्या
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुक बाबत महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत. परंतु मागील दहा वर्षापासून आमदार. प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून आजरा शहराचा जो विकास झाला आहे. तो सर्वांच्या डोळ्यासमोर आहे.
आम्हाला जाती पाती किंवा गट तट यामध्ये न जाता आज रोजी ज्यांनी विकास केला त्यांच्या सोबत राहण्याचा व पुढील काळात उर्वरित विकास कामे करून घेऊन आजरा शहराचा विकास पूर्णत्वास नेण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. म्हणून आज आम्ही आम. आबिटकर साहेबांना पाठिंबा देत आहोत. समाजाचा विकास झाला नाही. म्हणून अपप्रचार होत आहे. पण आजरा शहरात सर्व समाजातील लोक रहातात..उदा…
पाण्याची पाईप लाईन हि सर्वांसाठी आहे.. कोणत्याही एका समाज्या साठी नाही. तसेच रस्ते विकास , क्रीडा संकुलन गंगामाई वाचन.. रवळनाथ मंदिर अशी वेगवेगळी कामे यामध्ये ही सर्व समाजासाठी आहेत. यामुळे काम करणाऱ्या माणसाला मतदान करण्याचा निर्णय पक्ष व गट तट सोडून घेतला असल्याचे सौ. खेडेकर यांनी बोलताना सांगितले.
यावेळी अमित खेडेकर, शरीफ खेडेकर, अमजत माणगावकर, इम्रान सोनेखान, जुबेर माणगावकर, रिजवान खेडेकर, सह आजरा शहरातील खेडेकर गट व कार्यकर्ते उपस्थित होते. आरिफ पटेल यांनी आभार मानले.

