Homeकोंकण - ठाणेभाजपसमोर असंतुष्टांची नाराजी दूर करण्याचे आव्हान.- नाराजांची समजूत काढताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

भाजपसमोर असंतुष्टांची नाराजी दूर करण्याचे आव्हान.- नाराजांची समजूत काढताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होतेय दमछाक?🟥 दिवाळीच्या धामधुमीत चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडलं मात्र सेन्सर अलार्म वाजला.- अन् चोरट्यांनी काढला पळ.🛑टिम इंडियाचा न्यूझीलंडकडून लाजीरवाणा पराभव.- मायदेशात कसोटी मालिकेचे सर्व सामने गमावण्याची टिम इंडियावर नामुष्की.

🟥भाजपसमोर असंतुष्टांची नाराजी दूर करण्याचे आव्हान.- नाराजांची समजूत काढताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होतेय दमछाक?

मुंबई :- प्रतिनिधी.

राज्यात विधानसभा निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर (सोमवार) आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ही प्रमुख लढत होत आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यामुळे जागावाटपासाठी जोरदार रस्सीखेच रंगली होती. अगदी अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या दिवशी देखील प्रमुख पक्षानं त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली. महायुतीमध्ये भाजपा सर्वाधिक जागा लढवत आहे. त्याचबरोबर भाजपामध्ये नाराजांची संख्यादेखील मोठी आहे.
🔴देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईतील निवासस्थान असलेला ‘सागर’ बंगला सध्या भाजपामधील घडामोडींचं केंद्र बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षातील असंतुष्टांची रिघ त्यांच्या सागर बंगल्यावर लागली आहे. उपमुख्यमंत्री त्या सर्वांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई भाजपाचे दिग्गज नेते आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी देखील सध्या पक्षावर नाराज आहेत. त्यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केलीय. त्यांचा राग शांत करण्यासाठी भाजपा नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पक्षाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी गोपाळ शेट्टी यांना आज शनिवारी सकाळी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेलं. त्या ठिकाणी त्यांची चर्चा झाली. सागर बंगल्यावरील भेटीनंतर मी भाजपा कधीच सोडणार नाही. पक्षाचे नुकसान होईल असे काही करणार नाही, अशी ग्वाही गोपालजी शेट्टी यांनी देवेंद्रजी फडणवीस आणि शिवप्रकाशजी यांच्या भेटीनंतर दिली आहे.’ असं ट्विट तावडे यांनी केलं आहे.
🟥भाजपासमोर मुंबई प्रमाणेच पुण्यातील नाराजांचं देखील आव्हान आहे. पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातून इच्छूकांची संख्या भाजपामध्ये मोठी होती. साहजिक पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर शहरातील प्रमुख नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पाडव्या दिवशी पुण्यातील नाराज नेत्यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. धीरज घाटे ,जगदीश मुळीक ,श्रीनाथ भिमाले, संजय काकडे ,सनी निम्हण यांची भेट घेत फडणवीस यांनी केली नाराजी दूर केली. विधानसभेत संधी नाही मिळाली तरी चिंता नका करू भविष्यात सगळ्यांना न्याय देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या या शिष्टाईला यश आलंय. कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळल्यानं नाराज असलेले पुणे भाजपा अध्यक्ष धीरज घाटे यांनी ट्विट करत त्याबद्दल जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.

🟥नाशिकमध्ये दिवाळीच्या धामधुमीत चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडलं मात्र सेन्सर अलार्म वाजला.- अन् चोरट्यांनी काढला पळ

नाशिक.- प्रतिनिधी.

एकीकडे दिवाळीची धामधूम सुरु आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. नाशिकच्या येवला येथील एस. एस. मोबाईल या मोबाईलच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी दीड लाखांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
🔴याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या येवला येथील एस. एस. मोबाईल या मोबाईलच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे व सेन्सर अलार्म वाजल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला.
🅾️चोरट्यांना चोरलेले मोबाईल तिथेच टाकून पळ काढावा लागला. मात्र दुकानातील रोख रक्कम व दोन मोबाईल असा दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. मोबाईल दुकानातील चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

🟥टिम इंडियाचा न्यूझीलंडकडून लाजीरवाणा पराभव.- मायदेशात कसोटी मालिकेचे सर्व सामने गमावण्याची टिम इंडियावर नामुष्की

मुंबई :- प्रतिनिधी.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे. या सामन्यात २५ रन्सने न्यूझीलंडने दणदणीत विजय मिळवला आहे. ३ सामन्यांच्या या टेस्ट सिरीजमध्ये न्यूझीलंडने भारताला आपल्याच देशात व्हाईट वॉश दिला आहे. भारतात ३ सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये सर्व सामने गमावण्याची ही टीमची पहिलीच वेळ आहे.
🔴टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई टेस्टमध्ये पराभव झाला आहे. 24 वर्षात पहिल्यांदाच पाहुण्या टीमने भारताला त्याच्याच भूमीवर टेस्ट सिरीजमध्ये व्हाईट वॉश दिला आहे. यापूर्वी 2000 मध्ये खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 2-0 असा पराभव केला होता. न्यूझीलंडचा दुसरा डाव १७४ रन्सवर आटोपला होता. भारताकडून डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने पाच विकेट्स घेतले. या सामन्यात किवी टीमने पहिल्या डावात 235 रन्स केले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात 263 रन्स केले. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे भारताला 28 रन्सची आघाडी मिळाली होती.
🟥सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियासमोर विजयासाठी 147 धावांचं लक्ष्य होतं. छोट्या धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया अनेकवेळा फसली आहे. टीमने कर्णधार रोहित शर्माची पहिली विकेट 13 रन्सवर गमावली, त्यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया सुरुच राहिली. भारताने अवघ्या 29 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. भारतासाठी सर्वात मोठी खेळी ऋषभ पंतने खेळली आणि 9 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 64 रन्स केले. या काळात टीमच्या एकूण आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अखेरीस हतबल झालेल्या टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.