Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रराम कृष्ण हरी वाजवा तुतारी.- मेळाव्यात कार्यकर्त्यांची घोषणा.( कोळिंद्रे जि. प. मतदार...

राम कृष्ण हरी वाजवा तुतारी.- मेळाव्यात कार्यकर्त्यांची घोषणा.( कोळिंद्रे जि. प. मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नंदाताईंना.. विष्णुपंत केसरकर गटाचा पाठिंबा.)

राम कृष्ण हरी वाजवा तुतारी.- मेळाव्यात कार्यकर्त्यांची घोषणा.
( कोळिंद्रे जि. प. मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नंदाताईंना.. विष्णुपंत केसरकर गटाचा पाठिंबा.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील कोळिंद्रे जि.प.मतदार संघात कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत विचार मेळावा माजी सभापती, आजरा कारखान्याचे माजी चेअरमन विष्णुपंत केसरकर यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या विचार मेळाव्यात महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी दिला. परंतु कार्यकर्त्यांची मागणी श्री. केसरकर यांना जि. प. उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी अट घातली.
आश्वासन द्या मगच पाठिंबा असा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई यांना घेरले. नेहमी प्रमाणे दादांनी निर्णायक भूमिका घेऊन अखेर विषय मार्गी लावला

यावेळी बोलतांना श्री.‌केसरकर म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराला पाठिंबा दिला मात्र त्याचे खूप परिणाम भोगावे लागले यामुळे यावेळी निर्णय घेताना कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच निर्णय घेण्याचे ठरविले. पक्ष फुटले आहेत. पक्षांची भाऊगर्दी झाली आहे. बंडखोरीही वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी योग्य निर्णयाची गरज आहे. माझे कार्यकर्ते मला महत्त्वाचे आहेत. जिल्हा परिषद सदस्य होण्याची आपली इच्छा असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. रस्ते, गटारी, लाडकी बहिण योजना म्हणजे फक्त विकास नाही. महागाई वाढली त्याकडे सरकारचे लक्ष नाही. काॅंग्रेसने लोकाभिमुख कारभार केला तर युती शासनाच्या काळात कमिशन घेऊन लोकप्रतिनिधींनी आपला विकास साधला.आता महाविकास आघाडी सोबत जाण्याची गरज असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. सुरेश बुगडे, सदानंद देसाई, विठ्ठल चव्हाण, संभाजी गडकरी, महेश पाटील, पंडीत पाटील, धनाजी बुगडे, विलास जोशिलकर, राजू होलम यांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती असलेले उदय जोशी म्हणाले, केसरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय बळ देणारा आहे. स्व.बाबासाहेब कुपेकर यांच्या दूरदृष्टी मुळे तालुक्याचा विकास झाला आहे.यावेळच्या उमेदवार डॉ.नंदाताई बाभूळकर यांच्याकडे संघटन कौशल्य आहे.या भागाचा विकास करणे हे त्यांचे स्वप्न आहे.ते पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी खंबीर रहावे असे आवाहन केले.

मुकुंदराव देसाई.- म्हणाले राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर एकच निर्णय घेतला होता काही पण होऊ दे पण शरद पवार साहेबांच्या पाठीशी राहायचे असं ठरवलं होतं. महाविकास आघाडीच्या उमेदवाराची तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाचे स्वागत. महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जो निर्णय दिला तो कौतुकास्पद आहे. स्व.बळिराम देसाई यांचे केसरकर मानसपुत्र आहेत. मागील काळात परममित्राच्या नादात केसरकर यांना कारखाना निवडणूकीत चूक झाली. मतमतांतर जरुर होते मात्र केसरकर यांचे संबंध कधीच तोडले नाही.राष्ट्रवादी विभागणी नंतर आमच्यातील कांही मंडळी निष्ठा व तत्वे गुंडाळून बाहेर पडली.त्याचे नुकसान त्यांना दिसून येतील. या बैठकीला कोळिंद्रे जि.प.मतदार संघातील केसरकर गटाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Oplus_131072

चौकट

Oplus_131072

कोळींद्रे जिल्हा परिषद मधील मसोलीचे सरपंच व शिवसेनेचे विलास जोशीलकर म्हणाले विष्णुपंत केसरकर यांच्यासोबत आम्ही आहोत. परंतु आजरा तालुक्याला जोडलेल्या आजरा राधानगरी भुदरगड विधानसभा मतदार संघात मशाल चिन्ह पण आहे.. या मशाल चिन्हाला देखील पाठिंबा द्यावा.. अर्थात महाविकास आघाडीलाच पाठिंबा द्यावा आपण राष्ट्रवादीचे काम करावे असे सूचित केले. पण आमची मशाल चिन्ह लक्षात ठेवा….. व के. पी. साहेबांना मदत करा.. असे मत सदर बैठकीत श्री जोशीलकर यांनी व्यक्त केले.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.