Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रक्राईम न्यूज💥 🛑लोखंडी धारदार हत्यारे विक्री करण्याच्या उददेशाने व कब्जात बाळगलेल्या स्थितीत...

क्राईम न्यूज💥 🛑लोखंडी धारदार हत्यारे विक्री करण्याच्या उददेशाने व कब्जात बाळगलेल्या स्थितीत दोघांवर गुन्हा दाखल.‌🛑सुगंधी पान मसाला, तंबाखू व सुगंधी जर्दा असलेला मुद्देमाल विक्री करताना उत्तुरात एकावर गुन्हा दाखल.🛑 बिगरपरवाना बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करताना पेरणोली येथे गुन्हा दाखल.🛑आजरा उत्तुर येथे कल्याण मटका जुगार खेळ घेत असताना गुन्हा दाखल.

💥क्राईम न्यूज💥
🛑आजरा उत्तुर येथे कल्याण मटका जुगार खेळ घेत असताना गुन्हा दाखल.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा उत्तुर येथे कल्याण मटका जुगार खेळ घेत असताना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद समीर संभाजी कांबळे पो.हे.कॉ. 1172, नेमणूक- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा. यांनी केली आहे . या गुन्ह्यातील
आरोपीचे नांव रमेश शिवराम रक्ताडे व.व.50 रा.पागार गल्ली उत्तुर ता. आजरा येथे गुन्हा घडला या गुन्ह्यातील माल 2135/- रू.त्यात रोख रक्कम 2,130/- रूपये व कल्याण मटका जुगाराचे इतर साहित्य मिळून किं.स यातील हकीकत यातील आरोपी हा त्याचे स्वतःचे फायद्याकरीता आजरा ता. आजरा येथील गणपत गल्ली चौक जवळ असले एम.डी प्लंबींग स्टोअर चे समोर रोडवर उघडयावर थांबुन लोकांचेकडुन कल्याण मटका जुगार खेळ घेत असताना 2135/- रुपये किंमतीचे कल्याण मटका जुगार गुन्ह्याचे मुददेमालासह मिळुन आलेने यातील फिर्यादी यांनी सरकारतर्फे दिले फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🛑 बिगरपरवाना बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करताना पेरणोलीत गुन्हा दाखल.

आजरा.- प्रतिनिधी.

पेरणोली ता. आजरा येथे बेकायदेशीर देशी दारू विक्री करताना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद दिपक सुभाणा किल्लेदार, पो. यांनी आजरा पोलिसात दिली आहे यातील आरोपी अमर भिमराव दळवी वय 40, रा. पेरणोली, ता. आजरा पेरणोली ते वझरे जाणारे रोडवर रस्त्याचे कडेला बांबर नावचे शेताजवळ झुडपाच्या आडोशास पकडण्यात झाले यातील मिळालेला माल 1000 /- रू. त्यात 180 मिलीच्या देशी दारू व्हाईट डॉक्टर कंपनीच्या काचेच्या 20 बॉटल प्रत्येकी 50.00 /- रूपये मिळून किं.स.
05/- पांढ-या रंगाची कापडी पिशवी एकूण- 1005/-रुपये
हकीगत वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपीत याने आपले कब्जात वरील वर्णनाचा प्रोव्ही गुन्ह्याचा देशी दारू व्हाईट डॉक्टर कंपनीच्या काचेच्या बॉटल दारू आपले कब्जात बेकायदा बिगरपरवाना बाळगून बेकायदेशीररित्या विक्री करीत असलेचे मिळून आलेने महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे फिर्यादीने फिर्याद दिलेने गुन्हा दाखल. दाखल – पो.हे.कॉ.1636 पन्हाळकर अधिक तपास पो.ना.2099 येलकर करत आहेत.

🛑सुगंधी पान मसाला, तंबाखू व सुगंधी जर्दा असलेला मुद्देमाल विक्री करताना उत्तुरात एकावर गुन्हा दाखल.

आजरा.- प्रतिनिधी.

उत्तुर येथे सुगंधी पान मसाला, तंबाखू व सुगंधी जर्दा असलेला मुद्देमाल विक्री करताना आजऱ्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद
फिर्याद अनंत राजाराम देसाई, पो. यांनी आजरा पोलिसात दिली आहे. यातील आरोपी असिफ रशिद नाईकवाडे वय 33, रा. उत्तूर ता. आजरा दि. 26/10/2024 रोजी उत्तूर ता. आजरा ते कोल्हापूर जाणारे रोडला उत्तूर येथील शाही स्वीट मार्ट व शाही पान दरबार नावचे दुकानात गुन्हा घडला
गुन्हा दाखल ता. वेळ दि. 26/10/2024 रोजी
मिळाला माल 1015/- रूपये त्यात वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधी पान मसाला, तंबाखू व सुगंधी जर्दा असलेला मुद्देमाल हकीगत वरील तारखेस, वेळी व ठिकाणी यातील आरोपी क्रमांक 1 हा स्वताःचे फायदयाकरीता वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधी पान मसाला, तंबाखू व सुगंधी जर्दा तत्सम पदार्थाचे सेवन हे मानवी जिवीतास अपायकारक व हानीकारक आहे याची माहिती असताना तसेच सदर पदार्थांचे सेवनामुळे ह्वदयरोग, ओरल सबम्युकस, फायब्रोसीस, मुखाचा कर्करोग, अन्न नलीका कर्करोग, ओठाचा कर्करोग व तरुण पिढी व्यसनाधिन होते याची जाणीव असताना देखील व अशा पदार्थावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली असताना देखील त्याचे शाही स्वीट मार्ट व शाही पान दरबार नावचे दुकानात वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधी पान मसाला, तंबाखू व सुगंधी जर्दा असलेला एकूण 1015/- रूपये किंमतीचा मुद्देमाल विक्री करीत असताना मिळून आलेबाबत यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिलेने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🛑लोखंडी धारदार हत्यारे विक्री करण्याच्या उददेशाने व कब्जात बाळगलेल्या स्थितीत दोघांवर गुन्हा दाखल.‌

आजरा.- प्रतिनिधी.

लोखंडी धारदार हत्यारे विक्री करण्याच्या उददेशाने व कब्जात बाळगलेल्या स्थितीत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय हत्यार कायदा प्रकरणी विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतची फिर्याद पत्तारोहीत आनंदा धुंदरे, व.व.35, पो.कॉ असून यातील आरोपी सुरजसिंग जगतसिंग शिकलकर्ताक, व.व.32 व रामसिंग जगतसिंग शिकलकर्टाक व.व.26 दोघे रा. बैलहोंगल ता. बैलहोंगल
जि. बेळगावी राज्य. कर्नाटक उत्तुर बाजारपेठ येथे किरण पोतदार यांचे घराचे बाजूला रोडवर उत्तुर ता. आजरा . गुन्हा दाखल ता.व वेळ दि.26/10/2024 रोजी
मिळाला माल – 7800/-रु. किमतीचे लोखंडी धारधार कोयते, त्याच्या लोखंडी पात्याची लांबी 10 इंच, रुंदी अंदाजे 3 इंच व त्याचे लोखंडी मुठीची लांबी 5 इंच अशी एकुण कोयत्याची लांबी 15 इंच, प्रत्येकी 300 रु. किमतीचे 26 लोखंडी कोयते मिळून किंमत असून बंदीआदेश लागू असताना वरील वर्णानाची हत्यारे बेकायदा बिगर परवाना विक्री करण्याच्या उददेशाने आपले कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळून आलेने यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिलेने गुन्हा दाखल करून पुढील तपास मा सपोनि सो यांचे आदेशाने पोहेकॉ 1955 कांबळे यांचेकडे देणेत आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.