दुध उत्पादकांचा – गोकुळ दुध संघ आधारवड – गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर
( मलिग्रे ता. आजरा येथील दीपावली निमित्त रवळनाथ दुध संस्था भेट वस्तू प्रदान.)
आजरा.- प्रतिनिधी.
गोकुळ दुध संघाने हरियाणा म्हैस खात्रीने दुध उत्पादकांना मिळण्यासाठी केर्ली येथे म्हैस डेपोची संकल्पना राबवली असून दुध उत्पादकांनी हरियाणा म्हैस व दुधाची खात्री करून खरेदी केल्यास वाहतूक खर्चासाठी पाच हजार व दोन वर्षे म्हैस चे संगोपन केल्यावर तीस हजार रूपये गोकुळ संघामार्फत अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे वासरू संगोपन अनुदान पुर्वी प्रमाणे संघाने सुरू केले असल्याचे संचालीका अंजनाताई रेडेकर यांनी मलिग्रे येथील रवळनाथ दुध संस्था भेट वस्तू प्रदान कार्यक्रमात व्यक्त केले. अध्यक्ष स्थानी संस्था चेअरमन शिवाजी कागिनकर होते. प्रमुख उपस्थिती आजरा साखर कारखाना संचालक अशोक तर्डेकर होते.
स्वागत अशोक शिंदे यांनी केले प्रास्ताविक सहाय्यक अधिकारी एम एस कोले यांनी गोकुळ संचालिका रेडेकर मॅडम दरवर्षी गडहिंग्लज आजरा चंदगड तालुक्यातील दुध संस्थाना भेटून संस्था व सभासद यांच्या अडचणी समजावून घेतात तसेच कै.केदारी रेडेकर फौन्डेशन मार्फत संस्थाना दिवाळी निमित्ताने भेट वस्तू देवून सन्मानित करण्यात आलेचे सांगितले. तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा तुळसाबाई बुगडे यांच्या हस्ते श्रीमती रेडेकर याचा सत्कार करणेत आला. यावेळी सुपरवायझर विश्वास चव्हाण, संजय घाटगे, विनायक पाटील, आनंदा बुगडे, मारूती कोकितकर, ईश्वर चौगले, दिलीप बुगडे, भिकाजी सुतार, संभाजी बुगडे प्रकाश सावंत, विश्वास बुगडे यांच्या सह भाग्यलक्ष्मी महिला दुध संस्था व रवळनाथ दुध संस्था संचालक सभासद व कर्मचारी उपस्थित होते. आभार एम जी बुगडे यांनी मानले.
चौकट – अशा विविध संस्थेने भेटी यामध्ये
जयभवानी दूध संस्था लाटगाव
चेअरमन. नंदकुमार सरदेसाई
व्हॉईस चेअरमन . बाजीराव सरदेसाई
सारजाई दूध संस्था.
चेअरमन प्रवीण सरदेसाई
व्हॉईस चेअरमन संदेश दळवी
दूधगंगा संस्था
चेअरमन गणपती पाटील
व्हॉईस चेअरमन मसनु कांबळे
अमृत लक्ष्मी दूध संस्था
चेअरमन तनुजा घाटगे
व्हॉईस चेअरमन नंदकुमार सरदेसाई
राधाई लाटगाव दूध संस्था.
चेअरमन धोंडिबा देसाई
व्हॉईस चेअरमन राधिका देसाई
