Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रलक्ष्मी महिला दुध संस्थेने अल्पवधितच केलेली प्रगती ही कौतुकास्पद. श्रृंगारवाडी आजरा -...

लक्ष्मी महिला दुध संस्थेने अल्पवधितच केलेली प्रगती ही कौतुकास्पद. श्रृंगारवाडी आजरा – ता.सह विविध संस्थेला गोकुळ संचालिका यांची भेट दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा.

लक्ष्मी महिला दुध संस्थेने अल्पवधितच केलेली प्रगती ही कौतुकास्पद. श्रृंगारवाडी आजरा
ता.सह विविध संस्थेला गोकुळ संचालिका यांची भेट दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा.

आजरा.- प्रतिनिधी.

श्रृंगारवाडी तालुका आजरा येथील लक्ष्मी महिला सह. दुध संस्थेच्या नव्याने बाधण्यात आलेल्या इमारतीच्या उद्घाटन गोकुळच्या संचालिका श्रीमती. अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते मोठया उत्साहात संपन्न झाला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आक्काताई चौगुले यांनी श्रीमती रेडेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. पुढे बोलताना श्रीमती रेडेकर म्हणाल्या लक्ष्मी महिला दुध संस्थेने अल्पवधितच केलेली प्रगती ही कौतुकास्पद आहे. संस्थेची स्वः मालकीची इमारत होने हे भुषणावह आहे. या संस्थेच्या संचालक मंडळाने केलेला पारदर्शक व काटकसीरच्या कारभारामुळेच संस्थेला ही प्रगती साधता आली. ग्रामीण भागातील आर्थिक कणा म्हणुन दुध व्यवसायाकडे पाहिले जाते. या व्यवसायामुळेच ग्रामीण अर्थकरण मजबुत झाले आहे. त्यामुळेच दुध उत्पादकांनी या व्यवसायाकडे दुय्यम व्यावसाय म्हणून न पाहता मुख्य व्यवसाय म्हणून पाहणे गरजेचे आहे. गोकुळ दुध संघाच्या वतीने परराज्यातील गुजरात, हरियाणा येथून विकत घेतलेल्या म्हैशींना अनुदान दिले जाते. त्याचा लाभ दुध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा. उत्पादकांना चांगल्या जातीच्या म्हैशी जिल्हया मध्येच करता यावी या करिता संघाच्या वतीने केर्ली ता करविर येथे म्हैशींच्या मोठया गोठयांची उभारणी केली आहे. गुजरात व हरयाणा येथील चांगल्या म्हैशींची आयात येथे केली जाते व सभासदांना माफक व योग्य दरात विक्री साठी उपलब्ध केली जाते. याचा लाभ दुध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाला संरपंच समीर देसाई, शामराव हरेर, बळवंत शिंत्रे, दशरथ सावंत, बाळु पाटील, विनायक जोशीलकर, धनाजी तारळेकर, विनायक पाटील यांच्या सह ग्रामस्थ उपस्थीत होते.
गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्या वतीने तालुक्यातील सर्व संस्थांना सदिच्छा भेट देउन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालिका श्रीमती रेडेकर यांनी तालुक्यातील सर्व संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन संस्थेच्या अडीअडचणी समजावून घेतल्या व संस्थेचे संचालक मंडळ व उत्पादकाना भेटून मिठाई व भेट वस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी देवर्डे, हाळोली, वेळवटी, म्हसोली, पेठेवाडी, खेडगे, शेळप, पारपोली, दाभिल, दाभिलवाडी, माद्याळ, दर्डेवाडी, मेढॉली, हत्तीवडे, होणेवाडी, कागिणवाडी, दाभेवाडी, कानोली, हारुर, या गावातील दुध संस्थांचा संपर्क करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोकुळ दुध संघाचे अधिकारी के.डी. आमते, श्री. कोले सुपरवायझर विश्वास चव्हाण, विजय केसरकर, उदय पाटील, विनायक पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.