Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण… अन्याय निवारण समिती.🛑जनता सहकारी गृहतारण कडून...

आजऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण… अन्याय निवारण समिती.🛑जनता सहकारी गृहतारण कडून दिवाळी भेट : सभासदांना ११ % लाभांश आणि कर्मचाऱ्यांना (१६.६६%) (दोनपगार) दिवाळी बोनस

🛑जनता सहकारी गृहतारण कडून दिवाळी भेट : सभासदांना ११ % लाभांश आणि कर्मचाऱ्यांना (१६.६६%) (दोनपगार) दिवाळी बोनस.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

जनता सहकारी गृहतारण संस्थेने अत्यंत खडतर परिस्थितीतून वाटचाल करत कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच संस्थेने ८७.५४ कोटीं ठेवींचा टप्पा पार केला आहे. मागील आर्थिक वर्षाकरीता संस्थेकडून ११ % लाभांश प्रदान करण्याबाबत संचालक मंडळाकडून निर्णय घेण्यातआला. त्यानुसार सभासदांच्या खात्यावर ही लाभांश रक्कम जमा करण्यातआली आहे.

संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन संस्थेकडून (१६.६६%) म्हणजेच दोन पगार इतका दिवाळी बोनस, ग्रॅज्युएटी, विमा संरक्षण, ड्रेसकोड आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्था चेअरमन मारूती मोरे, संचालक डॉ. अशोक बाचुळकर, डॉ. तानाजी कावळे, प्रा. विनायक चव्हाण, जनरल मॅनेजर मधुकर खवरे व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मारूती मोरे यानी सांगितले की जनता सहकारी संस्था फक्त घरकुलं उभी करत नाही, तर माणसं उभी करते, घराला घर पण देते. त्यामुळे माणसं जोडणारी संस्था म्हणून संस्था ओळखली जाते. स्वतःच घरकुल असा वंहे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जनता सहकारी गृहतारण संस्था ठामपणे सभासदांच्या पाठीशी उभी आहे. कार्यक्षमआणि घरपोच सेवा हा संस्थेचा वसाआहे. सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांच्याशी जिव्हाळ्याचं, आपुलकीचं आणि विश्वासाचं नातं जपत संस्थेनं सत्याऐंशी कोर्टी ठेवींचा टप्पा गाठलाआहे.

दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर मुदत बंद ठेव खातेस १३ महीनेसाठी ९% व्याजदर करणेत आला. शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनाच कर्ज पुरवठा केला जातो, त्यामुळे ठेवी २००% सुरक्षित आहे. संस्थेकडून ५६ कोटी हून अधिक कर्जवितरीत केले आहे. सन २००८ नंतर सभासदांच्या मागणीनुसार संस्थेने आपला विस्तार महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र झालेला आहे. घर किंवा फ्लट खरेदी, घरबांधणी, वाढीवबांधकाम, घरदुरुस्तीकरीता एक कोटीपर्यंत २० वर्ष मुदतीकरीता सुलभ व्याज दराने संस्था कर्ज पुरवठा करतआहे. शिवाय प्लॉट खरेदीसाठी वीस वर्ष मुदतीचे पंच्याहत्तर लाखा पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. गृहकर्जाच्या हप्त्यांना (मुद्दल व व्याज) आयकर सवलत आहे. याचा फायदा कर्जदारांना होतो. शिवाय कमीत कमी वेळेतआवश्यक कागदपत्रांच्याआधारे गृहकर्ज उपलब्ध होत अहे, त्यामुळे ग्राहकांनीया दिवाळीच्या मुहुर्तावर जनता सहकारी गृहतारण संस्थेकडून गृहकर्ज घेऊन आपले घर कुलाचे स्वप्न साकार करावे. संस्थेच्या आणखीन वैशिष्ट्यांची माहिती देताना ते पुढे म्हणाले की आज घडीला गडहिंग्लज आणि

कोल्हापूर सारख्या ठिकाणी स्वमालकीच्या इमारतीत संस्थेची कार्याल येआहेत, ही खूप मोठी जमेची बाजू आहे. संस्थेच्या सर्व शाखांमधील व्यवहार हे संगणकीकृत आहेत. सर्व शाखांमध्ये सोनेतारण कर्ज सोय करण्यातआली आहे. याचबरोबर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत संस्थेने वेळोवेळी उद्भवलेल्या नैसर्गिक आणि राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी भरघोस अशी मदत केली आहे. पारदर्शी आणि स्वच्छ कारभार, काटेकोर नियोजन, व्यवस्थापन मंडळाचे काटकसरीचे धोरण, दूरदृष्टी आणि अधिकारी व कर्मचारी वर्गाची कार्यतत्परता यामुळे दिवसें दिवस संस्थेची भरभराट होत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून आरंभीपासूनच संस्थेला ऑडीट वर्ग अ मिळालेला आहे.

🛑आजऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण… अन्याय निवारण समिती.

आजरा. प्रतिनिधी.

Oplus_131072

गेल्या चार वर्षापासून आजरा शहरातील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा विविध कारणांनी चर्चेत आहे. या बाबत आजरा रहिवाशी अन्याय निवारण समिती मार्फत दि. २६/०६/२०२४ रोजी विधानसभा निवडणुक आचार संहितापूर्वी छ. शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे अनावरण करावे असे सूचित केले होते. त्यास अनुसरून महाराजांचा पुतळा उभारणी समिती वतीने पत्रकार परिषद घेऊन अनावरण लवकरच करण्याचे जाहीर केले होते.

विविध संस्थांनी, व्यक्तींनी, लोकप्रतिनिधींनी भरघोस निधी दिलेला हा श्री महाराजांचा पुतळा अद्यापही अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. दोन महिन्यापूर्वी अनावारणच्या हालचाली सुरू असतानाच विविध कारणे पुढे करून अनावारण प्रक्रियेला खो घालण्यात आला. अनावारणसाठी कोणला आणायचे ? त्याचे श्रेय कोणी घ्यायचे ? या राजकीय वादात पुतळ्याचे अनावारण लांबले आहे. तेव्हा आजरा रहिवाशी अन्याय निवारण समिती वतीने एवढेच मागणे आहे कि, छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे तोंड झाकून ठेवून उघड माथ्याने फिरणाऱ्या मंडळींना पुतळ्याचे लवकरात लवकर अनावारण करण्याची सदबुद्धी परमेश्वराने द्यावी. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे या प्रसिद्धी पत्रकावर परशुराम बामणे (भाऊजी) अध्यक्ष, नाथ देसाई उपाध्यक्ष, वाय.बी. चव्हाण सेक्रेटरी, पांडुरंग सावरतकर सचिव, सदस्य – बंडोपंत चव्हाण, जोतीबा आजगेकर, दिनकर जाधव, राजु विभुते आदिच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.