मुस्लिम समाजात कोणताही गट नाही.- आम्ही सर्व एकच आहोत.
( आजऱ्यातील मुस्लिम बांधवांची तिसरी पत्रकार परिषद. )
आजरा.- प्रतिनिधी.

मुस्लिम समाजात कोणताही गट नाही आम्ही सर्वजण एकच आहोत. मागील दोन दिवसापासून आजरा शहरात मुस्लिम समाजाच्या दोन पत्रकार परिषद झाल्या यामध्ये गटातटाचे राजकारण.. आमदारांनी विकास केला कोणी म्हणतंय केला नाही. परंतु आमदारांचं लोकप्रतिनिधी म्हणून विकास काम करणे हे कर्तव्य आहे. यामध्ये विकास केला की नाही. यापेक्षा. मुस्लिम समाजाचा किती विकास झाला. हे महत्त्वाचं आहे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी समाजाचा मतदान बाबत सर्वजण एकत्र बसून निर्णय घेऊ अन्य काही मंडळी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सर्व समाज एक संघ आहे. असे मत शिवसेना उभाठा शहर प्रमुख समीर चांद यांनी केले.
यावेळी सलीम सतिफ म्हणाले यापुढे आमच्या समाजाचा विकास जे लोकप्रतिनिधी करतील त्यांच्यासोबत आम्ही राहू. याबाबत लवकरच सर्व समाज एकत्र येऊन योग्य तो निर्णय घेईल आमच्यातील काही बांधवांनी काही निर्णय घेतले ते वैयक्तिक आहेत. समाज म्हणून नाही. दोन विद्युत बल्प लावले म्हणजे विकास नसतो. कुठे विकास केला आहे. ते दाखवून द्यावे.
यावेळी फिरोज पटेल रमेश लमतुरे इमरान, मुतालीन मुल्ला , नौशाद माणगावकर, रहीम बागवान, रियाज मुजावर, अबुल माणगावकर सह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
