Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रतालुक्याला जोडलेल्या तीन विधानसभा मतदारसंघात.- नेत्यांचे मतभेद मिटले पण मनभेद मिटणार का.?

तालुक्याला जोडलेल्या तीन विधानसभा मतदारसंघात.- नेत्यांचे मतभेद मिटले पण मनभेद मिटणार का.?

तालुक्याला जोडलेल्या तीन विधानसभा मतदारसंघात.- नेत्यांचे मतभेद मिटले पण मनभेद मिटणार का.?

आजरा.- संभाजी जाधव.

आजरा तालुक्याला जोडलेल्या तीन विधानसभा मतदारसंघातील. विद्यमान आमदार यांच्याशी स्थानिक नेत्यांची मागील अनेक वर्षापासून राजकीय मतभेद आता मिटले आहेत व एकत्र येऊन एका व्यासपीठावर येणार व या सर्व घडामोडी दाराआड मिटून मतभेद पूर्णत्वास जाऊन अंतिम निर्णय झाले आहेत. परंतु मतभेद मिटले पण मनभेद मिटणार का.? अशी तालुक्यात चर्चा आहे. मागील अनेक अनेक स्वराज्य संस्थांमध्ये एकाकी पाडून केलेले पराभव हे येथील स्थानिक नेते विसरणार का. ? तर काही नेत्यांनी येथील स्थानिक नेत्यांवर तोंडाने केलेले काही आरोप हे जिव्हारी लावून घेतले आहेत. त्यामुळे असे काही पराभव व राजकीय अस्तित्व धोक्यात आले असताना देखील त्याही नेत्यांनी सर्व काही विसरून पाठींबा देण्याची सत्र सुरू आहे. तसे राजकारणात कोण कोणाचा शत्रू कोण कोण कोणाचा मित्र नसतो. राजकीय स्वार्थासाठी नेते कधी एका व्यासपीठावर येऊ शकतात हे काही नवीन नाही. हे मागील अनेक वर्षापासून व मागील दोन वर्षात हे आपण राज्यात पाहत आहोत. आजरा तालुक्यात काही गटातील नेत्यांची इच्छा असल्याने हा निर्णय घेतला असावा पण तळागाळातील कार्यकर्त्यांच काय. हा विचार झालेला नाही. आता दिलेला पाठिंबा हा भविष्यात राजकीय नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी जवाचे – तवा असे सद्यस्थितीत राजकीय परिस्थिती आहे.
पण एक मात्र निश्चित तिनंही विधानसभा मतदारसंघात २०२४ विधानसभा निवडणूक ही हलक्यात घेण्यात अर्थ नाही. हा विजय कोणत्याही उमेदवारासाठी सोपा नाही.
यामुळे जमिनीवर राहुन या विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. अन्यथा कोणाला तरी हलक्यात घेऊन.. चालणार नाही. मतदार संघात उमेदवारांची संख्या वाढवून मताची विभागणी झाल्यास आपला विजय निश्चित आहे. हा देखील राजकीय गैरसमज होऊ शकतो… अशी चर्चा आजरा तालुक्यात आहे.. तूर्तास

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.