माजी आम. के. पी. पाटील. यांनी मातोश्रीवर जाऊन बांधलं शिवबंधन.
मुंबई.- प्रतिनिधी.
राधानगरी विधानसभेचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले आहे. यामुळे के पी पाटील हे मशाल हाती घेणार आहेत. शिवसेना उभाठा कडे हा मतदारसंघ जाणार की काँग्रेसकडे याची चर्चा मागील १५ दिवसापासून होती. यामध्ये आता के. पी पाटील यांनी हाती शिवबंधन बांधल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेना उभाठा गटाला गेल्याचे निश्चित झाले आहे. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील सह पदाधिकारी उपस्थित होते.