मानसिंग खोराटे यांची जन आशिर्वाद यात्रेला मतदारसंघात वाढता पाठींबा :
चंदगड – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मानसिंग खोराटे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने तुडये जिल्हा परिषद अंतर्गत अनेक गावांना भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक जनतेशी थेट संवाद साधला, त्यांची प्रश्नं आणि अडचणी समजून घेतल्या, तसेच आपल्या विकासात्मक दृष्टिकोनाची स्पष्टता दिली. गावकऱ्यांनी मांडलेल्या समस्यांना उत्तर देण्यास ते तयार असल्याचे सांगत, त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेल्या परिवर्तनाची सुरुवात याच भेटींद्वारे केल्याचे प्रतिपादन केले.
या यात्रेची सुरुवात करताना मानसिंग खोराटे यांनी स्पष्ट केले की, “मी या निवडणुकीच्या रिंगणात परिवर्तन घडवण्यासाठी उभा आहे. आज या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने गावागावांना भेटी देत असून, जनतेने मांडलेले प्रश्न समजून घेत आहोत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू.” त्यांनी हेरे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध गावांना भेट दिली, ज्यामध्ये कोदारी, नगरगाव, गुळंब, करजगादे, पाले, मोटनवाडी, जेलुगडे, कलिवडे, किटवडे, सदावरवाडी या गावांचा समावेश होता.
गावकऱ्यांच्या समस्या ऐकल्यानंतर त्यांनी पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, आणि रोजगाराच्या संधी यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, “गावातील लोकांना त्यांच्या मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे, त्यावर शाश्वत धोरणे आखून त्याची योग्य अंमबजावणी करुन दिलेला शब्द नक्कीच पाळणार असल्याचे आवर्जून नमूद केले.
मानसिंग खोराटे यांनी चंदगडच्या पर्यटन विकासाबद्दल विशेष योजना मांडल्या. त्यांचा उद्देश तुडये जिल्हा परिषदेतील गावांना पर्यटनाच्या माध्यमातून विकसित करणे आहे. त्यांनी सांगितले की, “या भागांमध्ये नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळे आहेत, ज्यांना योग्य प्रकारे प्रोत्साहन दिल्यास हा परिसर एक प्रमुख पर्यटन केंद्र बनू शकतो.” त्यांनी पर्यटन प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्या माध्यमातून अर्थव्यवस्था मजबूत होईल.
यात्रेदरम्यान त्यांनी सांगितले की, “माझे मुख्य ध्येय म्हणजे या भागातील बेरोजगारी कमी करणे आणि लोकांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणे. या भागातील उद्योग, पर्यटन, आणि शेतीवर आधारित प्रकल्पांच्या विकासासाठी आम्ही काम करू.” खोराटे यांच्या या धोरणांमुळे स्थानिकांचा विश्वास जिंकण्याचा आणि गावांचा आर्थिक विकास साधण्याचा त्यांचा मानस स्पष्ट झाला.
मानसिंग खोराटे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. यात्रेदरम्यान उपस्थित असलेल्या प्रमुख व्यक्तींमध्ये रमाकांत गावडे, विठ्ठल गावडे, संजय सांबळेकर, तानाजी मेटकर, सुजित दळवी, आकाश दळवी, खेमाजी दळवी, विठ्ठल दळवी, वैजू गावडे, लक्ष्मण गावडे, परशराम गावडे, दत्ताराम परीट, कृष्णा नाईक, पांडुरंग गावडे, अमृत कांबळे पाटील, टिळक कांबळे, रामचंद्र तावडे आणि शाहू सदावर यांचा समावेश होता.
यात्रेच्या माध्यमातून खोराटे यांनी स्थानिक लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे की, त्यांच्या नेतृत्वात परिवर्तन घडेल. त्यांनी गावकऱ्यांना दिलेले आश्वासन आणि मांडलेले योजनांचे स्पष्ट दृष्टिकोन, या दोहोंमुळे गावकऱ्यांमध्ये एक नवीन आशा आणि उत्साह निर्माण झाला आहे. त्यांच्या मते, “गावाचा विकास आणि त्यातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे.”
या जन आशीर्वाद यात्रेमुळे आगामी निवडणुकीत मानसिंग खराटे यांच्या नेतृत्वाची भूमिका अधिक ठळक बनली आहे. त्यांच्या विकासात्मक योजनांमुळे आणि जनतेच्या समस्यांवर दिलेल्या समाधानकारक उत्तरांमुळे त्यांच्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.