Homeकोंकण - ठाणेमातोश्रीवर पक्ष प्रवेशाचा गराडा🟥बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक माजी आमदार परशुराम उपरकर यांचा ठाकरे...

मातोश्रीवर पक्ष प्रवेशाचा गराडा🟥बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक माजी आमदार परशुराम उपरकर यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…💥सिंधुदुर्गात कट्टर शिवसैनिकांमध्ये पसरले आनंदाचे वातावरण

मातोश्रीवर पक्ष प्रवेशाचा गराडा🟥बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक माजी आमदार परशुराम उपरकर यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…
💥सिंधुदुर्गात कट्टर शिवसैनिकांमध्ये पसरले आनंदाचे वातावरण

मुंबई.- प्रतिनिधी.

बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक,माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत करून शिवबंधन हातात बांधले.तर सिंधुदुर्गातील कट्टर शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
🟪यावेळी ठाकरे शिवसेनेचे सचिव,माजी खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक , आ.मिलिंद नार्वेकर,जिल्हाप्रमुख संजय पडते,संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत,संदेश पारकर,गितेश राऊत,वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
🟥माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या समवेत बाबल गावडे,आशिष सुभेदार, विनोद सांडव ,दीपक गावडे,मंदार नाईक,राजेश टंगसाळी ,संदीप लाड, आप्पा मांजरेकर, सचिन मयेकर, नाना सावंत,आबा चिपकर, विजय उपरकर,प्रणव उपरकर आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांनी पहिल्या टप्प्यात प्रवेश केला आहे.
🟥विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मालवण,वेंगुर्ले,देवगड व किनारपट्टी भागांमधील मच्छीमार पट्ट्यात ठाकरे शिवसेनेला त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर एक अभ्यासू व आक्रमक नेतृत्व करणारे श्री. उपरकर ठाकरे शिवसेनेत आल्यामुळे आगामी काळात संघटनात्मक बांधणीसाठी त्यांचा फायदा होईल. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जुन्या सहकाऱ्यांना पक्षात घेऊन एक प्रकारे शह देण्याचा प्रयत्न केलेला आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी माजी आमदार राजन तेली यांच्या प्रवेशापाठोपाठ आज पुन्हा परशुराम उपरकर यांचा प्रवेश देत उद्धव ठाकरेंनी हा जिल्ह्याच्या राजकारणात नवी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला आहे.
🔴माजी आमदार परशुराम उपरकर हे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती म्हणून काम केले आहे. विधान परिषद सदस्य म्हणून जिल्ह्यासह राज्यातील प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न सभागृहात केलेला आहे. मूळ शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचाही अनेक वर्ष त्यांना अनुभव आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर नेहमी आक्रमक भूमिका घेत त्यावर आवाज उठवण्याचं काम श्री. उपरकर यांनी सातत्याने केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.