Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमुस्लिम समाजातील काही घटक म्हणजे पूर्ण समाज नाही.- विकास कामे झाली नाही....

मुस्लिम समाजातील काही घटक म्हणजे पूर्ण समाज नाही.- विकास कामे झाली नाही. असे म्हणणाऱ्यांनी सिद्ध करावे. ( आजऱ्यात मुस्लिम समाजाची पत्रकार परिषद संपन्न.)

मुस्लिम समाजातील काही घटक म्हणजे पूर्ण समाज नाही.- विकास कामे झाली नाही. असे म्हणणाऱ्यांनी सिद्ध करावे. ( आजऱ्यात मुस्लिम समाजाची पत्रकार परिषद संपन्न.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजऱ्यातील काही मुस्लिम बांधवांनी समाजावर होत असलेल्या विकासाचा अन्याय बाबत पत्रकार परिषद घेऊन आपले मत व्यक्त केले होते. यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम समाजाच्या मताचा वापर करून घेतला पण समाजाचा विकास झाला नाही. त्यामुळे यापुढे आमच्या समाजाचा विचार करेल त्याचा आम्ही विचार करू पण या पत्रकार परिषद बाबत आजऱ्यातील मुस्लिम समाजातील अन्य काही प्रमुख प्रमुख पदाधिकारी यांनी आज दि. २२ रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली भावना व्यक्त केली.
यावेळी अरिफ पटेल बोलताना म्हणाले आजरा शहरातील मुस्लिम समाजाचा विकास झाला नाही. असं काही आमच्यातील नागरिक म्हणतात. आजरा शहराचा विकास झाला तो कोणत्या एका जाती-धर्माचा नाही तर तो शहराचा झाला आहे. मग रस्ते असो पाईपलाईन असो, अन्य वास्तु असतील पण आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून विकास झाला आहे. काही प्रमाणात राहिला असेल. त्यांनी काहीच विकास केला नाही असे म्हणणे हा बालिशपणा असं म्हणावे लागेल. असे श्री . पटेल म्हणाले.

यावेळी शरीफ खेडेकर म्हणाले फक्त तुम्ही म्हणजे समाज नाही प्रत्येकाला आपला गट म्हणून काम करतो यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी एकत्र येऊन जो समाजाचा मताचा वापर होत आहे. याचा विचार समाजाने ठाम निर्णय घेऊन केला पाहिजे. आमच्या समाजातील काही मंडळी स्वार्थ साधण्यासाठी काम करतात समाज म्हणणारे समाजातले काही घटक होते.‌ ते त्यांचं मत झालं. म्हणून खरं काय आहे ते आम्ही सांगितलं असे खेडेकर म्हणाले

यावेळी इरफान काजी म्हणाले
आजऱ्यातील अनेक कॉलनीमध्ये रस्ते गटर्स, काही घरगुती वैयक्तिक कामे केली आहेत. यामुळे लोकप्रतिनिधी यांनी काहीच काम केले नाही. असा आरोप करणे चुकीच आहे.

यावेळी करिम काडगावकर म्हणाले यामध्ये राजकारण करणारे राजकारण करतील काम करणारा कोण आहे याचा विचार झाला पाहिजे व समाजाने केला पाहिजेत. काही आमच्या समाजातील नागरिकांनी पत्रकार परिषदेमध्ये काही प्रमाणात चुकीची भूमिका मांडली आहे.
मागील काही महिन्यापूर्वी समाजावर काही अन्याय झाला यासाठी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी कोणी आलं नाही. यावेळी निवडक लोक शोधून आणायची वेळ आली. अशावेळी कुठे असतात ते नेते. ही आमची स्वतःची लढाई आहे ती आपण स्वतः लढली पाहिजेत आमच्या समाजाचा मताचा वापर करून घेत आहेत कोणत्याही पक्षांनी आमच्या समाजाला मदत केली नाही. यापुढे आम्हाला मदत करणाऱ्याला आम्ही मदत करू असा निर्णय एकमुखी घेतला पाहिजे.‌ असे काडगावकर म्हणाले तर दुसरीकडे यापूर्वीचे आमदार के पी पाटील कधी मतदारसंघात फिरकले नाहीत. त्यामानाने आम. श्री. आबिटकर थोडीफार का असेना पण मतदार संघातील मतदारांच्यावर लक्ष देऊन त्यांनी मतदारसंघाचा विकास केला आहे.
अमजत माणगावकर म्हणाले आमच्या समाजातील काही लोकांनी केलेले वक्तव्य हे चुकीचे आहे तुम्हाला हे प्रतिनिधित्व कोणी दिले दुसऱ्यावर आरोप करून समाजाला एकत्र पकडण्याचे तुम्ही कधी समाजाची कामे घेऊन आमदारा कडे गेलाच नाही. पण तुम्ही कसं म्हणू शकता की आमदारांनी काम केली नाहीत. त्यामुळे स्वतःचे स्वार्थासाठी चुकीचे आरोप करू नका. असे मत या पत्रकार परिषदेत मुस्लिम बांधवांनी व्यक्त केले या पत्रकार परिषदेत आसिफ पटेल, जुबेर माणगांवकर, मौजूद माणगांवकर, जुबेर सोनेखाल
तौफीक माणगांवकर, तनवीर मकानदार, कुदरत लतीफ सह समाजातील काही नागरिक उपस्थित होते.

चौकट.

समाजातील दोन्ही घटकाच्या गटातील नागरिकांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केलेली भावना एकच आहेत. सहा हजार इतके मताधिक्य आजरा शहरात असताना देखील. समाजाचा वैयक्तिक विकास झाला नाही. यासाठी भविष्यकाळात आमच्या समाजाचा विकास कोणी करेल त्याच्यासोबत आम्ही राहू. परंतु दोन दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये. वैयक्तिक समाज हिताची कामे झाली नाहीत. असं मत व्यक्त केलं होतं.‌ त्यामुळे भविष्यकाळात समाज हितासाठी समाजाने एकत्र राहणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.