🛑 पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी यांचा शिंदे शिवसेनेत – जेलमधून परतताच पक्षप्रवेश ( जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती )
मुंबई :- प्रतिनिधी.

२०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखाली शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत पांगारकरने प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर श्रीकांत पांगारकर याची जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीकांत पांगारकर हे माजी शिवसैनिक आहेत आणि ते परत पक्षात आले आहेत. त्यांची जालना विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे”, माजी मंत्री आणि शिवसेनेचे जालन्यातील नेते अर्जून खोतकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
🟥५ सप्टेंबर २०१७ रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घराबाहेर ही घटना घडली. या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अमोल काळेची एसआयटीने चौकशी केली. त्यात महाराष्ट्रातील व्यक्तीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यास सांगितल्याचे त्याने सांगितले.
तपासातून समोर आले की, गौरी लंकेश यांची हत्या होण्यापूर्वी आणि नंतर श्रीकांत पांगारकर हा अमोल काळेच्या संपर्कात होता. या प्रकरणात पांगारकरला अटक करण्यात आली. २०१८ मध्ये श्रीकांत पांगारकरला अटक करण्यात आली होती. यावर्षी ४ सप्टेंबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने पांगारकरला जामीन मंजूर केला.
🔴नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातही श्रीकांत पांगारकरचा सहभाग होता. याचवर्षी ऑगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पांगारकर आणि इतर चार सहआरोपींना जामीन मंजूर केला होता. पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलवर हल्ला करण्याचा कट आणि त्यासाठी शस्त्रसाठा केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.
🟥श्रीकांत पांगारकर माजी नगरसेवक
आरोपी श्रीकांत पांगारकर जालना नगर परिषदेचा माजी नगरसेवकही राहिलेला आहे. २००१ ते २००६ या काळात तो नगरसेवक होता.
🛑भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?- भाजपचे देवेंद्र फडणवीस – अजित अजितदादा पवार बाहेर.- अमित शाह एकनाथ शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून २९ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे.या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. दिल्लीतील या बैठकीनंतर सदर नेत्यांमध्ये चंदीगड इथंही एक बैठक पार पडली. मात्र चंदीगडमध्ये अमित शाह यांची राज्यातील तिन्ही नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड स्वतंत्र चर्चा केल्याचे समजते.
🔴विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री नक्की कोणार होणार, याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढू, मात्र मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय निवडणुकीनंतर आमचे केंद्रीय नेतृत्व घेईल, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मांडण्यात येत आहे. अशातच अमित शाह यांनी चंदीगड येथील बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १५ ते २० मिनिटे स्वतंत्र चर्चा केल्याने त्यांना नेमकं काय आश्वासन दिलं, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.दरम्यान 15 ते 20 मिनिटांची चर्चा होत असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मात्र हॉटेल बाहेर थांबले होते.
🟥दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेबाबतही भाजपचं केंद्रीय नेतृत्व समाधानी असल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिमेचा अधिकाधिक वापर महायुतीने करून घ्यावा, अशी भाजप नेतृत्वाची इच्छा असल्याचं बोललं जात आहे. याबाबत ‘एबीपी माझा’ने वृत्त दिलं आहे.
🛑भाजपची पहिली यादी दोन दिवसांत?
भाजपमध्ये दोन डझन विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांमध्ये बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे. ही रणनीती अंमलात आणण्याची जबाबदारी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या व्यक्तींना देण्यात आली आहे. त्यातील बहुतेकांनी उमेदवार यादी जाहीर करण्याची घाई करू नका, असे मत दिले आहे. भाजपची पहिली यादी गुरुवारीच जाहीर केली जाणार होती, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ती अडली आहे. तरीही, आमची पहिली यादी दोन दिवसांत येईल, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने नुकताच केला आहे.
🛑ठाकरे पक्षाच्या 30 संभाव्य उमेदवारांच्या यादीत आश्चर्यकारक नावे.-
संकटात सोबत असणाऱ्या शिवसैनिकांचे काय?
मुंबई :- प्रतिनिधी.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादीत आश्चर्यकारक नावे पहायला मिळत आहेत.
🔴महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाचा प्रण घेतलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कोण असतील याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलीय. त्यातच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची संभाव्य 30 उमेदवारांची यादी समोर आलीय… ठाकरेंच्या या यादीत आयारामांचा बोलबाला पाहायला मिळतोय…. ठाकरेंच्या यादीत चौदा विद्यमान आमदारांव्यतिरिक्त अजून 16 नावं समोर येतायहेत.. त्यापैकी 9 म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक आयारामांना संधी देण्यात आलीय. त्यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यताय.
🟥शिवसेना ठाकरे पक्षाची ही सगळी खेळी निवडणुका जिंकाण्यासाठी असल्याचं म्हणत संजय शिरसाठ यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यंदाची विधानसभा निवडणुक ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अस्तित्वाची असणार आहे.. या निवडणुकीचे निकाल हे ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य ठरवणार आहे.. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील बडे मोहरे टीपून ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे.. आयारामांना मानाचं पान देत असताना संकटातही सोबत असणारे शिवसैनिक नाराज होणार नाहीत याची काळजी ठाकरेंना घ्यावी लागणार आहे. परंतु आयाराम मंडळी ही उमेदवारीसाठी इतर पक्षातून नाराज होऊन आली आहेत. याचाही विचार स्थानिक निष्ठा वंतांनी घेतला पाहिजेत सत्तेत जायचं असेल तर इतरांना सोबत घेऊन जावे लागेल. कदाचित हा विचार निष्ठावंत नाराज न होता करतील अशी चर्चा आहे.
🛑ठाकरेंच्या यादीत आयारामांचा बोलबाला (हेडर)
🔺1. स्नेनल जगताप – महाड
- काँग्रेसमधून शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश – 6 मे 2023
🔺2. अद्वय हिरे – मालेगाव बाह्य
- भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश – 27 जानेवारी 2023.
🔺3. दीपेश म्हात्रे -डोंबिवली
- शिवसेना शिंदे गटातून शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश 6 ऑक्टोबर 2024
🔺4. किशन तनवाणी – संभाजीनगर मध्य.
- शिवसेनेतून भाजप पुन्हा शिवसेना असा प्रवास
🔺5. राजू शिंदे – संभाजीनगर
- भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश – 7 जुलै 2024
🔺6. दिनेश परदेशी – वैजापूर भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात
- पक्षप्रवेश – 12 सप्टेंबर 2024
🔺7. सुरेश बनकर- सिल्लोड
- भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश – 18 ऑक्टोबर 2024
🔺8. राजन तेली – सावंतवाडी
- भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश -18 ऑक्टोबर 2024
🔺9. दीपक साळुंखे – सांगोला
- राष्ट्रवादी AP मधून शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश – 18 ऑक्टोबर 2024