Homeकोंकण - ठाणेउद्धव ठाकरेंचा डबल धमाका.- महायुतीला मोठे धक्के.- भाजपचे माजी आमदार राजन तेली...

उद्धव ठाकरेंचा डबल धमाका.- महायुतीला मोठे धक्के.- भाजपचे माजी आमदार राजन तेली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले दीपक आबा साळुंखे हे दोघेही शुक्रवारी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश../छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील पुतळ्याची जोडणी करणाऱ्या वेल्डरला अटक.- तीन दिवसाची पोलीस कोठडी.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील पुतळ्याची जोडणी करणाऱ्या वेल्डरला अटक.- तीन दिवसाची पोलीस कोठडी.

मालवण :- प्रतिनिधी.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे भागांची जोडणी तसेच आतील बाजुस आधार देण्यासाठी वापरलेल्या साहित्याची जोडणी (वेल्डींग) करण्याचे काम परमेश्वर रामनरेश यादव (रा. मिर्झापूर, रा. उत्तरप्रदेश) यास अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
मालवण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १३३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११०, १२५, ३१८, ३ (५) सहकलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम अन्वये दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी दाखल आहे.
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळयाचे वेगवेगळ्या सुट्या भागांची जोडणी करीत असतांना जोडणीसाठी कमकुवत व निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे संपुर्ण पुतळयाचे जोडणीला मजबुती व टिकाऊपणा आला नसल्याचे, तसेच पुतळयाचा प्रत्येक भाग जोडतांना पुर्णपणे भाग जोडले गेले आहेत याची खात्री न करता आणखी भाग (पार्ट) जोडल्या गेल्यामुळे पुतळ्याचे प्रत्येक भागाला आवश्यक अशी मजबुती मिळु शकली नाही, तसेच पुतळयाचे आतील बाजुस आधारासाठी वापरलेले लोखंडी साहित्य (बिम, अँगल, सळई ईत्यादी) हे कमकुवत व निकृष्ठ दर्जाचे वापरल्याने आतील बाजूस गंज लागून पुतळा कोसळयाची दुर्घटना घडल्याचे तांत्रीक तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे भागांची जोडणी तसेच आतील बाजुस आधार देण्यासाठी वापरलेल्या साहित्याची जोडणी (वेल्डींग) करण्याचे काम परमेश्वर रामनरेश यादव रा. मिर्झापूर राज्य उत्तरप्रदेश यास देण्यात आले होते. गुन्हयाचे तपासामध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आली असुन मा. न्यायालयाने त्यास ३ दिवसांची पोलीस कोठडी दिलेली असुन गुन्हयाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली श्री घनश्याम आढाव हे करीत आहेत.

🛑मुलीने माहेरचे घर पेटविले
आंबेगाव येथील घटना – सर्व वस्तू जळून खाक.- मुलीवर गुन्हा दाखल

सावंतवाडी :- प्रतिनिधी.

वडिलांनी सासरी जाण्यास सांगितल्याच्या रागातून मुलीने माहेरच्या घराला आग लावण्याचा प्रकार तालुक्यात घडला आहे. यात घर आणि घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे अंदाजे अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी आंबेगाव येथे घडली. दरम्यान याप्रकरणी वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित मुलीचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. मात्र तिचे आणि पतीचे पटत नाही. त्यामुळे ती चतुर्थीच्या काळात आंबेगाव येथील आपल्या घरी आली होती. या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा तिने आपल्या आई-वडिलांसोबत वाद उकरून काढला. यावेळी घरातील लोकांना कंटाळून ते दुसऱ्या मुलीकडे राहायला गेले होते. आज सकाळी किरकोळ भांडण काढून तिने थेट घरालाच आग लावली आणि सर्व वस्तू पेटवून दिल्या. हा प्रकार आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांनी पाहिला व याची कल्पना संबंधित मुलीच्या वडिलांना दिली. मात्र ते गोव्यात असल्यामुळे येईपर्यंत उशिर झाला. सर्व दरम्यान शेजाऱ्यांनी आज विझवण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्यांचे प्रयत्न असफल ठरले. या आगीत त्यांचे घरातील सर्व साहित्य कपडे जळून खाक झाले आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. झालेला प्रकार हा आपण रागाच्या भरात केला, अशी कबुली मुलीने दिली. हे घर इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आले होते. मात्र अचानक हा प्रकार घडल्यामुळे आता संबंधित विवाहितेच्या वडीलांचे कुटुंब बेघर झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली व पंचनामा केला आणि वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलीवर गुन्हा दाखल केला आहे.

🔴 उद्धव ठाकरेंचा डबल धमाका.- महायुतीला मोठे धक्के.- भाजपचे माजी आमदार राजन तेली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले दीपक आबा साळुंखे हे दोघेही शुक्रवारी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश..

🟥अनेक वर्षांनी दोघेही पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत.

मुंबई :- प्रतिनिधी

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी महायुतीला दुहेरी धक्का दिलाय. माजी आमदार आणि भाजपचे नेते राजन तेली शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले दीपक आबा साळुंखे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
अनेक वर्षांनी ते पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते हातात मशाल घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शुक्रवारी दुपारी ४ वाजता हा पक्षप्रवेश मातोश्री येथे पार पडेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

🛑सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली असा रंगणार सामना.-
भाजपला कोकणात हादरा.-
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भाजपचे नेते व माजी आमदार राजन तेली करणार ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश..

🛑”कमळा”ची साथ सोडून राजन तेली हातात घेणार “मशाल”

सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला कोकणामध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार राजन तेली शुक्रवारी भाजपला सोडचिठ्ठी देणार आहेत.तर सकाळी 10 वाजता मिलिंद नार्वेकर हे राजन तेली यांची भेट घेणार आहेत.
🟥राजन तेली हे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षात गेल्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. याआधी राजन तेली यांनी भाजपच्या मेळाव्यातून दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला होता.
🛑’ 2014 मध्ये भाजपसाठी मी माझा बळी दिला. 2019 मध्ये एबी फॉर्म काढून टाकला. पक्षाने मला एबी फॉर्म दिला असता तर त्याच वेळी दीपक केसकरांचा पत्ता कट झाला असता. आम्ही किती अन्याय सहन करायचा? 15 वर्षांमध्ये तुम्ही तुमच्या प्रकल्पांना न्याय देऊ शकत नाही. दरवेळी दीपक केसरकर मी केलं मी केलं म्हणतात. दीपक केसरकर फक्त कामाचं श्रेय घेतात. मी रस्त्यासाठी निधी आणला पण नारळ दीपक केसरकर फोडतात. दरवेळी मी केलं म्हणतात, आम्ही केलं असं कधी म्हणणार? केसरकरांनी चिपी विमानतळावर 20 जणांना तरी नोकरी लावली का’, अशी टीका राजन तेली यांनी केसरकरांवर केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.