Homeकोंकण - ठाणेविधानसभा निवडणुकीचा आचारसहिता भंग होऊ नये. पहा.. प्रशासकीय माहिती. 🟥रात्री १० ते...

विधानसभा निवडणुकीचा आचारसहिता भंग होऊ नये. पहा.. प्रशासकीय माहिती. 🟥रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कोणत्याही फिरत्या वाहनावर कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपक वापरण्यास निर्बंध.🛑हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत) अंमलात राहतील.👇👇

विधानसभा निवडणुकीचा आचारसहिता भंग होऊ नये. पहा.. प्रशासकीय माहिती. 🟥रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कोणत्याही फिरत्या वाहनावर कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपक वापरण्यास निर्बंध.
🛑हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत) अंमलात राहतील.👇👇

सिंधुदुर्गनगरी :- प्रतिनिधी.

निवडणुकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जिवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा घालू ठेवण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (द 3) मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर खालील प्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत.
🔺ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. आहेत. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्यावापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहीती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.

🔺हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत) अंमलात राहतील.
🟣जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था,सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध

सिंधुदुर्गनगरी :- प्रतिनिधी.

विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दिनांक. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत) निर्बंध घातल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी काढले आहेत.

🟪निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करण्यास निर्बंध

सिंधुदुर्गनगरी :- प्रतिनिधी.

निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अंन्वये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत) जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या, उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे. सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणूक संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डीग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करण्यास निर्बंध घातल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी जारी केले आहेत.

🟪निवडणूक काळात दि. 18,19, 20 व 23 नोव्हेंबर रोजी कोरडा दिवस.

सिंधुदुर्गनगरी :- प्रतिनिधी.

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी संदर्भीय पत्रातील मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 142 अन्वये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व देशी / विदेशी दारुविक्रीची दुकाने (सीएल-३, एफएल-२, एफएल-बीआर-२, टिडी-१ इत्यादी) अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आदेश दिले आहेत.

🔺कोरडे दिवस, बंदचा कालवधी पूर्ण जिल्ह्यात याप्रमाणे- दि. 18 नोव्हेंबर, 2024 मतदानाच्या अगोदरचे दिवस, सायंकाळी 5 वाजलेपासून बंद. 19 नाव्हेंबर, 2024 मतदानाच्या अगोदरचे दिवस, संपूर्ण दिवस बंद. दि. 20 नोव्हेंबर, 2024 मतदानाचा दिवस,मतदान पूर्ण होईपर्यंत बंद व दि. 23 नोव्हेंबर, 2024 मतमोजणीचा दिवस.

🔺आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकां विरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कळविले आहे.

🟣शासकीय कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध

सिंधुदुर्गनगरी :- प्रतिनिधी.

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत) निबंध लावण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी आदेशित केले आहे.

🟪पूर्वपरवानगी शिवाय सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध

सिंधुदुर्गनगरी :- प्रतिनिधी.

विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे इत्यादी करीता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधीत मालकाची परवानगी शिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाचे परवानगी शिवाय वापर करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत) निर्बंध लावण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी आदेशित केले आहे.

🟪सार्वजनिक रस्त्यावर, निवडणुकी संबंधी पोस्टर्स, बैनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होडींग्ज, कमानी लावण्यास प्रतिबंध

सिंधुदुर्गनगरी :- प्रतिनिधी.

जिल्ह्यातील निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणुकी संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्हिंग्ज, कमानी लावणे या व इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवू शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध घालणे मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (घख) अन्वये निवडणुकीच्या प्रचाराचे साहित्य कोणात्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 ) निर्बध लावण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी आदेशित केले आहे.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.