Homeकोंकण - ठाणेबाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा.- आरोपींनी एका महिन्यात १० वेळा केला...

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा.- आरोपींनी एका महिन्यात १० वेळा केला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा प्रयत्न.🛑कायदा ‘आंधळा’ नाही!.- न्यायदेवतेच्या डोळ्याची पट्टी हटली!- हातात तलवारीऐवजी आता संविधान./ अंधेरीत इमारतीला भीषण आग.- एका घरातील तिघांचा आगीत होरपळून मृत्यू.

🛑बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा.- आरोपींनी एका महिन्यात १० वेळा केला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा प्रयत्न.
🛑कायदा ‘आंधळा’ नाही!.- न्यायदेवतेच्या डोळ्याची पट्टी हटली!- हातात तलवारीऐवजी आता संविधान
अंधेरीत इमारतीला भीषण आग.- एका घरातील तिघांचा आगीत होरपळून मृत्यू.

मुंबई :- प्रतिनिधी

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. शूटर्सनी (आरोपी) गेल्या महिन्यात वांद्रे आणि आसपासच्या भागात सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी १० हून अधिक वेळा प्रयत्न केले होते. पण ते त्यामध्ये अयशस्वी ठरले. पोलिसांनी सांगितलं की, बाबा सिद्दिकी यांची मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली. ही खुली जागा असल्याने शूटर्स हत्या करण्यात यशस्वी झाले.
🔴दाटीवाटीचा परिसर असल्याने याआधी बाबा सिद्दिकी यांची हत्या करताना शूटर्स अयशस्वी झाले होते. विविध कारणांमुळे शूटर्सना गोळीबार करण्याची संधी मिळाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. अनेकवेळा बाबा सिद्दिकी आले नाहीत आणि जेव्हा ते आले तेव्हा अनेक समर्थक त्यांच्यासोबत असायचे त्यामुळे आरोपींना त्यांचा प्लॅन बदलावा लागायचा. पोलिसांनी हत्या या प्रकरणातील आणखी एक आरोपी हरीश कुमार निषाद (२४) याला उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथून अटक केली. त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
🟥अन्य तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. गुरमेल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी शूटर्सची नावं आहेत. प्रवीण लोणकर अटक केली आहे. तो शुभम लोणकरचा भाऊ आहे. आरोपीने खरेदी केलेली बाईक पोलिसांनी जप्त केली आहे, शूटर्सना रेकीसाठी ती बाईक देण्यात आली होती. आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, प्रवीणने निषादला सेकंड हँड बाईक घेण्यासाठी ६० हजार रुपये दिले होते. या बाईकवरून निषाद पुण्याहून मुंबईला गेला आणि कुर्ल्यातील त्याच्या भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या शूटर्सना दिली. बाबा सिद्दिकी यांची रेकी करण्यासाठी शूटर्सनी बाईकचा वापर केला.

🛑कायदा ‘आंधळा’ नाही!.- न्यायदेवतेच्या डोळ्याची पट्टी हटली!- हातात तलवारीऐवजी आता संविधान

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था

भारतीय न्यायव्यवस्थेने ब्रिटीशांचा काळ मागे टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे केवळ चिन्हच बदलले नाही, तर न्यायदेवतेने वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टीही काढून टाकण्यात आली आहे.आता कायदा आंधळा नसल्याचा संदेश सर्वोच्च न्यायालयाने देशाला दिला आहे.

🛑सुप्रीम कोर्टात डोळ्यावर पट्टी नसलेला लेडी ऑफ जस्टिसचा अर्थात न्यायदेवतेचा नवा पुतळा उभारण्यात आला आहे. आता तलवारीऐवजी संविधान न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या हातात दिसत आहे. काही काळापूर्वी ब्रिटीश कायद्यात बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता न्यायदेवतेच्या नव्या रुपामुळे ही बदलांची नांदी ठरणार असल्याचे द्योतक दिसत आहे. देशात कायदा आंधळा नाही आणि तो शिक्षेचे प्रतीकही नाही असा संदेश देण्यासाठी तलवारीऐवजी संविधान पुस्तिकेची जागा घेतलेली दिसतेय.

🟥न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या डोळ्यावर पट्टी जी असते त्याचा अर्थ म्हणजे कायद्यासमोर सर्व समान आहेत आणि याचेच प्रतिनिधित्व करण्यासाठी ती होती, याचा अर्थ असा की न्यायालया समोर दिसणाऱ्या लोकांची संपत्ती, शक्ती किंवा स्थितीचे इतर चिन्हक पाहू शकत नाहीत, तर अधिकार आणि अन्यायाला शिक्षा देण्याची शक्ती दर्शवते.

🛑सरन्यायाधीशांच्या सूचनेनुसार..

प्राप्त माहितीनुसार, सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या आदेशानुसार सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींच्या वाचनालयातील नवीन पुतळ्याचे डोळे उघडे ठेवण्यात आले आहेत. या न्यायदेवतेच्चा डाव्या हातात संविधानाच्या जागी तलवार आहे, याकडेही एक प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. इंग्रजाच्या काळातील वारसा वारसा मागे सोडण्याचा हा एक भाग असू शकतो. याआधीच भारतीय न्याय संहिता सारख्या वसाहती काळातील फौजदारी कायद्याच्या जागी भारतीय न्याय संहिता लागू करण्यात आली आहे.

सरन्यायाधीशांच्या कार्यालयाशी संबंधित माहितीनुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा असा विश्वास आहे की भारताने ब्रिटिश वारशातून पुढे जावे आणि कायदा कधीही आंधळा नसतो, तो सर्वांना समानतेने पाहतो. हा संदेश देण्यासाठी लेडी ऑफ जस्टिसचे स्वरूप बदलल्याचे द्योतक आहे. पुतळ्याच्या हातात तलवार नसून राज्यघटना असली पाहिजे, जेणेकरून देशाला एक संदेश जाईल की ती न्याय देतात. राज्यघटना ही तलवार हिंसेचे प्रतीक आहे पण न्यायालये घटनात्मक कायद्यांनुसार न्याय देतात.

🛑तराजूचा अर्थ

न्यायदेवतेच्या उजव्या हातातील न्यायाचा तराजू आहे. तो तसाच आहे कारण तो समाजातील संतुलनाचे प्रतिनिधित्व करतो आणि निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी दोन्ही बाजूंच्या तथ्ये आणि युक्तिवादांचे न्यायालय सत्याच्या कसोटीवर वजन करतात.

🟥अंधेरीत इमारतीला भीषण आग.- एका घरातील तिघांचा आगीत होरपळून मृत्यू

मुंबई :- प्रतिनिधी.

मुंबईच्या अंधेरीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.अंधेरीच्या पश्चिमेत लोखंडवाला परिसरात असलेल्या रिया पॅलेस या इमारतीला लागली मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आज बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास रिया पॅलेस इमारतीच्या दहावा मजल्यावर एका घरामध्ये ही मोठी आग लागली. क्षणात या आगीने रौद्ररूप धरण केलं. परिणामी या आगीमध्ये घरात असलेले दोन वयस्कर नागरिक आणि नोकराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन तब्बल एका तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले आहे.या घटनेत तिघांचा आगीमध्ये जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र पहाटे लागलेल्या या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.