Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्ररासुबाई देवस्थान स्थानिक व्यवस्थापन समितीचा झालेला ठराव विधीग्राह्य असून तो नियमांच्या तरतुदीचे...

रासुबाई देवस्थान स्थानिक व्यवस्थापन समितीचा झालेला ठराव विधीग्राह्य असून तो नियमांच्या तरतुदीचे पालन करून ग्रामसभेने बहुमताने मंजूर केलेला आहे.- रासूबाई स्थानिक देवस्थान सल्लागार उपसमिती हरपवडे( प्रसिद्धीसाठी केलेले आरोप बदनामीकारक.)

रासुबाई देवस्थान स्थानिक व्यवस्थापन समितीचा झालेला ठराव विधीग्राह्य असून तो नियमांच्या तरतुदीचे पालन करून ग्रामसभेने बहुमताने मंजूर केलेला आहे.- रासूबाई स्थानिक देवस्थान सल्लागार उपसमिती हरपवडे
( प्रसिद्धीसाठी केलेले आरोप बदनामीकारक.)

आजरा.- प्रतिनिधी.

हरपवडे ता. आजरा येथील काही नागरिकांनी ग्रामपंचायत ने मनमानी कारभार व ठराव केले बाबत प्रसिद्धी पत्रक दिले होते. या अनुषंगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातील आरोपाबाबत रासूबाई स्थानिक सल्लागार उप समिती. हरपवडे यांनी प्रसिद्धी पत्रक दिली आहे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.‌
आजरा तालुक्यातील मौजे हरपवडे येथील ग्रामपचायत प्रशासनाने दि. २६/०१/२०२४ रोजी आलेली ग्रामसभा व गट विकास अधिकारी पंचायत समिती आजरा यांचे वैध्यता प्रमाणपत्र चुकीचे व बेकायदेशीर असले बाबत हरपवडे गावातील रहिवाशी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कोल्हापूर व देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केले आहे. त्या अर्जावरती सरपंच व नियोजित समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांचे म्हणणे असे कि, २६/०१/२०24 रोजी झालेली ग्रामसभा व त्या ग्रामसभेमध्ये रासुबाई देवस्थान स्थानिक व्यवस्थापन समितीचा झालेला ठराव विधीग्राह्य असून तो नियमांच्या तरतुदीचे पालन करून ग्रामसभेने बहुमताने मंजूर केलेला आहे. त्या सभेला ज्या लोकांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत ते लोक हि त्या ग्रामसभेला उपस्थित होते. परंतु त्या वेळी विरोध दर्शविला नाही. ग्रामसभा संपल्यानंतर त्यांनी मा.गट विकास अधिकारी सो. पंचायत समिती आजरा यांच्याकडे ग्रामसभा भोगस आहे. तसेच रासुबाई देवस्थान स्थानिक उप समितीचा ठराव दमदाटी करून मंजूर केलेला आहे अशा तक्रारी दाखल केलेल्या आहेत. सदर ग्रामसभेला पंचायत समितीचे प्रतिनिधी म्हणून नामदेव लोखंडे (सर) गावचे पोलीस पाटील एस.बी. कांबळे, पशु धन पर्यवेक्षक व पशू वैद्यकीय दवाखाना पेरणोली व तसेच डॉ. पुरषोत्तम ढेकळे हे पशु वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती आजरा इ. शासकीय कर्मचारी हजर होते. त्यामुळे सदरची ग्रामसभा बेकायदेशीर म्हणता येणार नाही.

तक्रारीचे निवारण करण्यासाठी मा.गट विकास अधिकारी यांनी ग्रामविस्तार अधिकारी (TPO) यांची नेमणूक करून हरपवडे ग्रामपंचायती मधील ग्रामसभेचे दप्तर तपासणीसाठी पाठवून देऊन पूर्ण दप्तर तपासले. सदर ची ग्रामसभा कायदशीर झालेली आहे. असा शेरा दिला व सदर चा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी मा.गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठवला. त्यानंतर मा.गट विकास अधिकारी यांनी १५/०३/२०२४ रोजी पंचायत समिती आजरा यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवून तक्रारदार यांना आपले म्हणणे मांडणे कामी अंतिम संधी देऊनही तक्रारदार पैकी श्री. मारुती गोविंद केळुसकर यांचे व्यतरिक्त तक्रार दार यांनी सुनावी नोटीस स्वीकारलेल्या नाहीत तसेच सुनावणीस तक्रारदार उपस्थित राहिले नाहीत त्या नंतर सरपंच, ग्रामसेवक ग्रामपंचायत हरपवडे तालुका आजरा यांना सदर ग्रामसभा नियमानुसार व कायद्यातील तरतुदीचे पालन करून पूर्ण केलेले आहे. असे कार्यालयाचे मत आहे. म्हणून त्यांनी ग्रामसभा वैध्यतेचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत हरपवडे याना दिले आहेत.

सदरचे ग्रामसभा वैध्यता प्रमाणपत्र तक्रारदार यांना मान्य नाही. ते दमदाटी करून घेतले आहे. सदरची सभा बेकायदेशीर आह व आम्हाला म्हणणे मांडण्यासाठी बोलावले नाही म्हणून त्यांनी १९/०३/२०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी सो कोल्हापूर यांच्याकडे सदरचे ग्रामसभा वैद्यता प्रमाणपत्र रद्द व्हावे म्हणून तक्रार केली होती. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर यांचे सूचनेनुसार उप मुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी सदर प्रमाणपत्राची पडताळणी करणे कामी सरपंच ग्रामसेवक यांना दप्तर घेऊन येणेस सांगितले. त्या दप्तरामध्ये ग्रामसभेची नोटीस दवंडी रजिस्टर लोकांच्या सह्या असणारे प्रोसिडिंग ई. कागद पात्रांची तपासणी करून उप मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. कोल्हापूर यांनी २६/०१/२०२४ रोजी झालेली ग्रामसभा विधीग्राह्य असून ती नियमानुसार व कायद्यातील तरतुदीचे पालन करून ती पूर्ण झालेली आहे. असे पत्र देवस्थान व्यवस्थान समिती पश्चिम महाराष्ट्र यांना व ग्रामपंचायत हरपवडे यांना दि. ३०/०९/२०२४ रोजी दिले आहे.

सदर नवीन रासुबाई देवस्थान कमिटी हरपडे स्थापन होणार व गेल्या ५ वर्षात पूर्वीच्या कमिटीने केलेला गैर व्यवहार आपल्या अंगट येणार व आपल्यावर कार्यवाही होईल या भीतीपोटी त्यांनी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प कोल्हापूर व देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र यांचेकडे ग्रामसभा व वैध्यता प्रमाणपत्र रद्द कराव म्हणून वारंवार त्याच त्याच तक्रारी करत आहेत. तसेच नियोजित समितीचे अध्यक्ष सौ. मनीषा गोविंद गुरव व त्यांचे पती गोविंद लक्ष्मन गुरव यांनी २००३ व २०१३ साली ग्रामपंचायतीला उपसमिती स्थापन करून लाखो रु. घोटाळा केला आहे. असे खोटे आरोप करून जन माणसामध्ये आमची प्रतिमा मलीन करणे, अपमानित करणे, आमचे मानसिक खच्चीकरण करणे या हेतूने संबंधितांनी प्रसिद्धी केली आम्हाला बदनाम करण्याचा कट कारस्थान करत आहेत. आम्ही २००३ साली व २०१३ साली रासुबाई देवस्थान कमिटी ग्रामसभेमध्ये स्थापन केली. व गाववाल्यांची मिटिंग घेऊन देवालय बांधणे संदर्भात चर्चा केली असता. ग्रामस्थांनी सांगितलेकी सध्या गावाची आर्थिक स्थिती बरी नाही व लोकांच्याकडून पैसे मिळणे कठीण होईल व मंदिर आर्धवट राहील या विचाराने सध्या मंदिर बांधू नये असा निर्णय झाला होता. त्या मुले रासुबाई देवस्थान समितीने कोणत्याही प्रकारची बुके छापली नाहीत व कोणत्याही प्रकारचा निधी गोळा केला नाही. त्यामुळे भ्रष्टाचार होण्याचे कारण नाही. तरी सदर तक्रार अर्जाचा विचार न करता देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र यांनी रासुबाई देवस्थान समितीची उपसमिती मंजूर करण्यात यावी. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.