🛑करणी प्रकरणात सिंधुदुर्गच्या महिला पोलिसाचा सहभाग.- कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक पसार.( दोघे नेपाळच्या सीमेवर असल्याची माहिती.) कुलकर्णी यांच्या घराची पाहणी करण्यासाठी मुळीक ही इतर संशयितांसोबत कोल्हापुरात आली होती.
कोल्हापूर :- प्रतिनिधी.
गंगावेशीतील सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७) यांना करणी केल्याची भीती घालून त्यांच्याकडून ८४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल उकळणाऱ्या टोळीत पोलिस महिलेचा समावेश आहे. गुन्हा दाखल होताच सिंधुदुर्ग पोलिस मुख्यालयात सेवेत असलेली कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक ही पसार झाली आहे. तिच्या अटकेसाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधला असून, लवकरच तिच्यासह अन्य संशयितांनाही अटक होईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.
🟥कोकणातील दादा पाटील महाराज (पाटणकर), आण्णा उर्फ नित्यानंद नारायण नायक आणि सोनाली पाटील उर्फ धनश्री गणपत काळभोर या तिघांनी फिर्यादी कुलकर्णी यांना करणी केल्याची भीती घातली. त्यासाठी सिंधुदुर्ग येथे कार्यरत असलेली कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक हिची मदत घेतली. कुलकर्णी यांच्या घराची पाहणी करण्यासाठी मुळीक ही इतर संशयितांसोबत कोल्हापुरात आली होती. अनेक विधींसाठीही ती उपस्थित होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. ती तोतया पोलिस असावी, असा जुना राजवाडा पोलिसांना संशय होता.मात्र, अधिक माहिती काढताच वस्तुस्थिती समोर आली. तिच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक सिंधुदुर्ग पोलिस मुख्यालयात गेले होते. मात्र, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच ती पसार झाली आहे. तिच्या अटकेसाठी दोन्ही जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
🛑संशयित राज्याबाहेर पळाले?
या गुन्ह्यातील मुख्य संशयितांचे मोबाइल नंबर बंद आहेत. ते राज्याबाहेर पळाल्याचा पोलिसांना संशय आहे. मुख्य आरोपी दादा पाटील महाराज आणि आण्णा नायक हे दोघे नेपाळच्या सीमेवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांच्या अटकेसाठी लवकरच एक पथक रवाना होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
🟥पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेत्यांसाठी होणार दोन स्वतंत्र महामंडळे.- मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई :- प्रतिनिधी.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे.
🟥महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत विक्रमी ८० निर्णय घेण्यात आले. यात सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत तब्बल ८० निर्णय घेतले. दिवंगत उद्योजक रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रस्ताव आजच्या कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला. नॉन क्रिमिलेयरची मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख केली असून, लेवा पाटील समाज महामंडळ, संत गोरोबा कुंभार महामंडळ व कोळी समाज महामंडळाचा प्रस्तावही हातावेगळा केला आहे. विशेषतः पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठीही सरकारने 2 स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. उद्योगपती रतन टाटा यांना जो उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला होता, तो यापुढे रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, मुंबई येथे जे उद्योग भवन बनत आहे, त्यालाही रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे.
🔴महाराष्ट्रात पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने विविध घटकांशी संबंधित 80 निर्णयांवर शिक्कामोर्तब केले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीत एकूण 80 निर्णय घेण्यात आले. त्यात काही नवी महामंडळे स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यात संत गोरोबा कुंभार महामंडळ, कोळी समाज महामंडळ, लेवा पाटील समाज महामंडळ, पत्रकार व वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी 2 स्वतंत्र महामंडळ आदींचा समावेश आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून ते प्रसिद्ध पत्रक रद्द करण्यात आल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.