कोणत्याही परिस्थितीत ४ लाख क्रशिंग करावे लागेल.- सभासद ऊस उत्पादकांनी सहकार्य करावे. चेअरमन वसंतराव धुरे (४ लाख क्रशिंग करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील.)
आजरा.- प्रतिनिधी

चालू हंगामात कोणत्याही परिस्थितीत ४ लाख क्रशिंग केलेच पाहिजेत अन्यथा कारखान्यात आर्थिक अडचण निर्माण होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे वसंतराव देसाई सहकारी साखर कारखाना बॉयलर अग्नीप्रदीपन व होम हवन विधी समारंभ कार्यक्रमाप्रसंगी चेअरमन वसंतराव धुरे बोलत होते. समारंभ संचालक सुभाष देसाई व सौ. विजयालक्ष्मी देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
स्वागत संचालक काशिनाथ तेली यांनी केले. कामगारांना मागील प्रमाणे पगार व बोनस देण्याची नियोजन आहे. पुढील काळात आर्थिक परिस्थिती सुधारणा करून मग पुढील हंगामात सकारात्मक निर्णय घेऊ सर्वांनी मनामध्ये शंका न घेता संचालक मंडळ कारखाना व कामगारांच्या पाठीशी आहे असे बोलताना श्री धुरे म्हणाले
यावेळी संचालक मुकुंद दादा देसाई म्हणाले कारखान्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्रुटी काय आहेत. पाहून चार लाख तसेच पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मागील चुकीची पूर्ण वरती होऊ नये यासाठी तज्ञाकडून दुरुस्ती सर्व संचालक यांनी केली आहेत. कारखान्यामध्ये सुसूत्रीपणा यावा अधिकाधिक कृषी होऊन जास्तीत जास्त साखर तयार व्हावी कृषीचे पर्याय चार लाख च्या अपेक्षा आहेत.

कामगारांच्या प्रश्न युनियनच्या माध्यमातून सोडवण्यात येतील कर्मचारी यांनी मनावर घेऊन काम केला आहे सहकारातील संस्था चांगल्या चालव्यात देशातील साखर उद्योग अडचणीत आपल्या अडचणी खाते प्रमुखांना सूचना कराव्यात खाते प्रमुख संचालक मंडळाला सांगतील आपल्यामध्ये मनभेद असावेत मतभेद नसावेत सर्वांनी मिळून हा हंगाम चांगल्या पद्धतीने पार पाडाव्या असे बोलताना संचालक श्री देसाई म्हणाले.
यावेळी बोलताना संचालक सुधीर देसाई म्हणाले कारखाना आर्थिक अडचणीत येऊन दोन वर्षे बंद राहिला व कामगारांनी अर्धा पगारवर काम केले परंतु पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्यामुळे कारखाना चालू झाला. सद्यस्थितीला कारखान्याची परिस्थिती आर्थिक अडचणी असून चालू हंगाम चार लाख क्रशिंग करण्याच्या दृष्टीने काम करायचे आहे. फक्त साखरेवर कारखाना चालणार नाही. त्यासाठी नवीन प्रोजेक्ट चालू करावा लागेल. मी जिल्हा बँकेचा संचालक म्हणून कर्जाच्या पैशाचा योग्य वापर व्हावा ते पाहणे माझी जबाबदारी आहे. त्यामुळे कारखान्यामध्ये कोणताही चुकीचा कारभार चालणार नाही. पण ते सभासद व ऊस उत्पादक कामगारांनी चालू हंगाम कोणत्या परिस्थितीत चांगल्या पद्धतीने पार पडावा यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे श्री देसाई म्हणाले.

यावेळी प्र. कार्यकारी संचालक ज्योती व्यंकटेश सर्व संचालक, सभासद कामगार, सर्व विभागाचे खाते प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक अनिल फडके यांनी आभार मानले.
चौकट.
बाॅयलर प्रदीपन कार्यक्रमामध्ये रतन टाटांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच वसंतराव देसाई सहकारी साखर कारखान्याचे कायम कर्मचाऱ्यांना ₹. ९०००/- व हंगामी कर्मचाऱ्यांना ₹७०००/- सानुग्रह अनुदान देण्याचे चेअरमन श्री धुरे यांनी जाहीर केले.