श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर संचालित ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंच आयोजित वकृत्व स्पर्धा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा संचालित ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात कु. भक्ती सुधीर साळोखे पार्वती शंकर विद्यालय, उत्तर व माध्यमिक गटात कु. सोहम संतोष पाटील – पार्वती शंकर विद्यालय, उत्तूर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. कै. पांडुरंग बिडकर गुरूजी खुल्या वक्तृत्व स्पर्धेत पूर्व तयारी गटात कु. गणेश ज्ञानदेव लोळगे पारगांव, हातकणंगले व उत्स्फूर्त गटात राजेंद्र मारुती पटेकर- आजरा यांनी प्रथम क्रमांक मिळवीला स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-
प्राथमिक गट : इयत्ता ५ वी ते ७ वी
प्रथम क्रमांक : कु. भक्ती सुधीर साळोखे पार्वती शंकर विद्यालय, उत्तूर
व्दितीय क्रमांक : कु. श्रेया संदिप चौगुले विद्यामंदिर, कोरीवडे
तृतीय क्रमांक : कु. जानवी सागर पाटील विद्यामंदिर, साळगाव
माध्यमिक गट : इयत्ता ८ वी ते १० वी
प्रथम क्रमांक : कु. सोहम संतोष पाटील पार्वती शंकर विद्यालय, उत्तर व्दितीय क्रमांक : कु. समृद्धी उत्तम वांद्रे पेरणोली हायस्कूल, पेरणोली तृतीय क्रमांक : कु. सिमरन भिकाजी पाटील व्यंकटराव हायस्कूल, आजरा
खुली स्पर्धा – पूर्वतयारी गट
प्रथम क्रमांक : कु. गणेश ज्ञानदेव लोळगे पारगांव, हातकणंगले व्दितीय क्रमांक : कु. चैतन्य कुंडलिक कांबळे कोळवण, भुदरगड तृतीय क्रमांक : कु. संकेत कृष्णात पाटील वरणगे, पाडळी
खुली स्पर्धा – उत्स्फूर्त गट
प्रथम क्रमांक : राजेंद्र मारुती पटेकर- आजरा
व्दितीय क्रमांक : कु. राखी राजू नवार – गवसे
तृतीय क्रमांक : कु. प्रतीक्षा वसंत पाटील सौंदलगा, चिकोडी कै. लक्ष्मण धोंडिबा पाटील व कै. रमेश वामन टोपले व कै. पांडुरंग बिडकर गुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सूरवात झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजय विडकर, इंजिनिअर मा. विजयकुमार पाटील, व श्री. निनाद राजेश टोपले उपस्थित होते. कार्य क्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर होते स्वागत व प्रास्ताविक कार्य वाह सदाशिव मोरे यांनी केले. सुत्रसंचालन संचालिका सौ. विद्या हरेर व संचालक श्री. कुंडलिक नावालर यांनी केले. संचालक वामन सामंत यांनी आभार मानले. शालेय गटासाठी प्रा. मल्लीकार्जुन शिंत्रे, प्रा. विनायक चव्हाण, डॉ. मारुती डेळेकर, बी. एम. कामत, रविंद्र भोसले, प्रा. विठ्ठल हाक्के तर खुल्या गटासाठी शिवाजी पारळे, डॉ आप्पासाहेब बुडके, विजय पोतदार, राजीव टोपले, बी. एम. कामत, रविंद्र भोसले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी सौ. संतोषी टोपले, सौ सुनिता विडकर, बाळकृष्ण दरी, पाचवडेकर, विनय बिडकर, सौ. रुपा कडवाले, संदिप देसाई उपाध्यक्षा गीता पोतदार, विनायक आमणगी, संचालक विजय राजोपाध्ये, संभाजीराव इंजल, सुभाष विभुते, रविंद्र हुक्केरी, महंमदअली मुजावर, विठोबा चव्हाण, डॉ. अंजनी देशपांडे, सुचेता गडडी, सौ शुभांगी निर्मळे, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखिल कळेकर, महादेव पाटील, आजरा हायस्कुल व पं दीनदयाळ विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मलिग्रे येथे ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूकदार यांची बैठक संपन्न:
आजरा.- प्रतिनिधी.

मलिग्रे ता आजरा येथील मल्लिकार्जून मंदिर मध्ये ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूकदार यांची बैठक आजरा साखर कारखाना संचालक मा. अशोक तर्डेकर याच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रास्ताविक कॉ. संजय घाटगे यांनी केले. यावेळी माजी संचालक पांडूरंग सावंत यांनी आजरा कारखान्याने क्रम पाळीने ऊस तोड करावी, तोडणी ओढणीचे योग्य नियोजन करावे, तर पोलिस पाटील मोहन सावंत यांनी खुद्द तोड करणारे शेतकरी याना ही वाढीव तोडणी हप्ता मिळावा आणि ऊस तोड सलग करून, शेती पानदं खुले करावेत तर वाहतूकदार यांनी आपल्या अडचणी व येणार्या प्रश्नावर चर्चा करून आमच्याही कांहीं समस्या असल्या तरीही गाव ठरवेल त्याप्रमाणे आम्ही काम करू असे अस्वाशित केले. या वर्षी गावाचा संपूर्ण ऊस आजरा साखर कारखान्याला घालण्याचा निर्धार व्यक्त करून, तसा ठराव एकमताने मंजूर केला.
यावेळी संचालक अशोक तर्डेकर यांनी आजरा कारखाना अडचणीतून वाटचाल करीत असताना देखील योग्य नियोजन करून ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूकदार याचे प्रश्न मार्गी लावण्याचे आमचे प्रयत्न राहतील त्याचप्रमाणे आपल्या हक्काचा कारखाना यशस्वी होण्यासाठी सभासद, उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूकदार तसेच कारखाना कामगार यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी सदा मानगावकर, माजी सरपंच गजानन देशपांडे, शिवाजी भगुत्रे, विश्वास महाराज बुगडे ,सुरेश बुगडे, प्रकाश सावंत, दिलीप बुगडे , दत्ता परीट, ऊदय देशपांडे, विजय कागिनकर , धनाजी बुगडे, सागर बुगडे याच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार मा. सरपंच अशोक शिंदे यांनी मानले.