🛑रामतिर्थ मार्गावर पर्यटन कर आकारणीबाबत.. अन्याय निवारण समितीचे वन विभागाला निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील एक सुप्रसिध्द असे पर्यटन स्थळ आहे. स्थानिक तसेच बाहेर गावचे पर्यटक मोठ्या संख्येने या पर्यटन स्थळाला भेट देत असतात. या ठिकाणी वन विभागाच्या वतीने आकारणी केली जात असल्याबाबत आग्रा अन्याय निवारण समितीने निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा – गडहिंग्लज या मार्गावरुन रामतिर्थकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंदाजे ३०० मिटर अंतरावर चौकी तयार करून, रामतिर्थ मंदिरकडे जाणाऱ्या वाहनामधील पर्यटकांकडून प्रत्येकी रु. १०/ प्रमाणे कर आकारणी करणेत येते. सदर कर आकारणीचे प्रयोजन काय? सदर रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत शासन खर्चातून झालेला आहे. सदर रस्त्याची देखभाल दुरुस्ती देखील शासन करते मग ही कर आकारणी कशासाठी करता व या कराचे मोबदल्यात आपण कोणत्या सुविधा दुरवता या बद्दलची माहिती अवगत करावी. सद्या चालु असलेल्या पर्यटन कर वसुलीबाबत पर्यटक नाखुष असून रामतिर्थ येथे फक्त (राम मंदिर, हनुमान मंदिर, सहादेव मंदिर व दत्त मंदिर) मंदिरे आहेत तसेच धबधबा आहे हे पहाण्यासाठी वहानातील प्रत्येक पर्यटकाकडून विनाकारण रु. १०/ चा भुर्दंड होतो असा विचार करून पर्यटक जाणेचे टाळत आहेत. तेंव्हा सदर पर्यटन कर ताबडतोब बंद करून पर्यटकांना विना मोबदला जाऊ द्यावे. जंगल सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण उभा केलेला तपासणी नाका याबद्दल आमचे काही दुमत नसुन त्याबाबत आमचे नेहमी सहकार्य मिळेल याची आम्ही ग्वाही देतो.
तरी वरील रस्त्यावर असलेला पर्यटन कर त्वरीत थांबवावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे, वाय.बी.चव्हाण सेक्रटरी, दिनकर जाधव उपाध्यक्ष, पांडुरंग सावरतकर सचिव तसेच सदस्य नितीन यादव, रविंद्र नेवरेकर, राजु विभुते, जोतिबा आजगेकर, संतोष बांदीवडेकर, जावेद पठाण, गौरव देशपांडे संजय जोशी यांच्या सह्या आहेत.
🛑ग्रामसभा वैधता प्रमाणपत्र चुकीचे व बेकायदेशीर असलेबाबत.- हरपवडे ग्रामस्थांचे जि. प. चे मुख्याधिकारी यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील हरपवडे येथील ग्रामपंचायत प्रशासनाने दि २६ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या ग्रामसभा वैधता प्रमाणपत्र चुकीचे व बेकायदेशीर असलेबाबत हरपवडे ता. आजरा येथील रहीवाशी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कि दि २६ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेत. श्री रासुबाई देवस्थान स्थानिक सल्लागार उप समिती मौजे हरपवडे यांनी हा ठराव बेकायदेशीर व अरेरावी करून हा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामसभेत या ठरावाला विरोध केला असताना, आमची ग्रामपंचायत आहे. आमच्या मनाप्रमाणे व आम्ही ठरवू तसेच करणार असे उध्दट ग्रामसभेत बोलण्यात आले. त्यावेळी आम्ही ग्रापंचायत हरपवडे याना विरोध नोंद करून तसे पत्र दिले व गट विकास अधीकारी पंचायत समिती आजरा यांचे कडे तक्रार अर्ज दिला. या प्रकरणाची सुनावनी कींवा चौकशी न करताच वैधता प्रमाण पत्र दिले. यानंतर दि. १९/३/२०२४ रोजी आपले कार्यलय कडे दाद मागीतली असना आपण दि.२३/५/२०२४ रोजी आपण गट विकास अधीकारी यांनी पत्र पाठवले, चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल अद्याप याबाबत कोणते कारवाई झाली नाही. गटविकास अधिकारी आजरा यांनी सुनावणी न घेता, बोगस कागद पत्रे जोडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर याच्या कडे सादर केले आहे. त्यांनी देवस्थान कडे ही सादर केली या प्रकारणाचा सहा निशा होत नाही तोपर्यंत प्रकरण प्रलबीत ठेवून, प्रकरणाची चौकशी व्हावी.
गट विकास अधीकारी यांना आम्ही भेटलो असना, आम्ही तुम्हाला बोलवतो असे सांगण्यात आले व त्यानंतर कोणतीही चौकशी कोता विश्वासात न घेताच दि १०/९/२०२४ रोजी देवस्था न व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्या पत्राचा सुध्दा विचार न करजाचा व आम्हाला विश्वासात न घेता अहवाल सादर आपले कडे सादर केला असे आम्हास समजले तरी आम्ही ग्रामसभेतील मागणी केलेली माहीती व्हिडीओ शुटींग पूर्ण न देता अपूरी देऊन आमची दिशाभूल करणेचे काम ग्राम- पंचायतीने केले आहे. तरी या सर्व सर्व बाबी लक्षात घेवून आम्हात्या न्याय मिळावा,
तसेच मंजूर ठरावाला नियोजीत उप समितीस स्थगीती मिळावी. कारण सन २००३ व २०१३ या साली गोविंद गुरव यांची ग्रामपंचायत सत्ता असलेचा गैरफायदा घेवून त्याची पत्नी सौ व गोविंद गुरव यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेळा ठराव करून देवस्थान उप समिती बनवण्यात आली व त्याची नोंद देवस्थान य. महाराष्ट्र यांचेकडे न करताच लाखो रुपयांचा भ्राटाचार केला आहे. गेली सात वर्षे खोट्या तक्रारी केल्या आहेत व हेच अध्यक्ष व सदस्य पून्हा नियोजन देवस्था न उप समितीत असून ही परीस्थिती गट विकास अधीकारी याना आम्ही सांगीतली असना आपल्या अधीकाराचा गैर वापर करून व राजकीय दबावाखाली अहवाल दिला असे समजने जरी ही बाब न्याय मिळावा अन्यथा अंदोलनाचा पवित्र्या घेण्यात येणार आहे. असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर धनाजी सावंत, संजय हळवणकर सह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.