🔴देव तारी त्याला कोण मारी.- सापाने चिमुकल्याच्या मानेला घेतला चावा.- चिमुकला २० दिवस बेशुद्ध.- उपचारानंतर मिळाले जीवदान
🛑आठ वर्षीय मुलीवर अत्याचार.- नराधमास २० वर्ष सक्तमजुरी.- कोल्हापुरातील घटना.
चिपळूण :- प्रतिनिधी
नवी मुंबईतील घणसोली येथे राहणाऱ्या चिन्मय जाधव या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी गणपती उत्सवासाठी दुर्गवाडी येथे आणले होते. मात्र ७ सप्टेंबर २०२४ रोजी मुलाच्या गळ्याला मण्यार या विषारी सापाने मानेचा चावा घेतला. त्यामुळे ते बाळ पूर्णपणे बेशुद्ध झाले. श्वासही थांबला, आणि त्याच्या हातपायामधील ताकद पूर्णपणे गेली.
🟥या बाळाला तातडीने चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात आणण्यात आले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या बाळावर वालावलकर रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब उपचार सुरु केले. कृत्रिम श्वास देण्याकरता व्हेंटिलेटर लावण्यात आला. पनवेलहून खास मार्गदर्शन करणारे डॉ. महेश मोहिते आणि वालावलकर रुग्णालयाचे डॉ. अनिल कुरणे, डॉ. शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. अनेक दिवस बाळ निपचित होते. शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती जिवंतपणाचे लक्षण म्हणजे डोळ्याच्या बाहुल्याची हालचाल ती सुद्धा होत नव्हती. अशा अनेक दिवसांपासून बाळाची प्रकृती गंभीर होत होती.
🔴भारत सीरमच्या अँटी स्नेक व्हेनमच्या एकूण ३० कुप्या देण्यात आल्या होत्या. तरीही सुधारणा दिसेना. शेवटी डॉक्टरांनीसुद्धा आशा सोडली पण ‘देव तरी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय आला. दहाव्या दिवशी बाळाने डोळे उघडले. हळूहळू उपचारांना प्रतिसाद देत बाळ हात हलवू लागले आणि आपल्या आईलासुद्धा ओळखू लागले. जवळजवळ पाऊण महिना हे बाळ मृत्यू शय्येवर होते.
🟥पण बाळाला व्हेंटिलेटर असताना इन्फेकशन होऊ, नये पाठीला जखमा होऊ नयेत याची पूर्ण जबाबदारी बालरोग तज्ज्ञांनी समर्थपणे पेलली. बाळाचा संपूर्ण खर्च हा महात्मा जोतिबा फुले योजने अंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आला. बाळाच्या आई वडिलांनी रुग्णालयाचे शतशः आभार मानले आहेत. रुग्णालयातील बालरोल विभागातील नर्सिंग स्टाफ आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. गौरी परब, डॉ. प्रचेता गुप्ता, डॉ. मोहित कडू, डॉ. सलोनी शाह, डॉ. पंक्ती मेहता, डॉ. तनीषा सोमकुवर यांनी विशेष सेवा देऊन बाळाचा जीव वाचवला याबद्दल डेरवण रुग्णालय प्रशासनाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
🛑आठ वर्षीय मुलीवर अत्याचार.- नराधमास २० वर्ष सक्तमजुरी.- कोल्हापुरातील घटना
कोल्हापूर :- प्रतिनिधी.

आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या नराधम बापास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी २० वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी (दि. ७) सुनावली. लक्षतीर्थ वसाहत परिसरात १० जानेवारी २०२० मध्ये गुन्हा घडला होता.
🟣सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई आणि मावस बहीण गल्लीत वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यावेळी घरात मोबाइलवर खेळत बसलेल्या आठ वर्षीय मुलीवर तिच्या बापानेच लैंगिक अत्याचार केला.
🔴हा प्रकार पीडित मुलीच्या आईच्या निदर्शनास येताच तिने पतीला जाब विचारला. मात्र, चूक झाली. माफ कर. असे म्हणत त्याने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. याबाबत तिने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तत्कालीन शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे आणि उपनिरीक्षक सुनीता शेळके यांनी गुन्ह्याचा तपास करून संशयिताच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
🟥ॲड. पाटील यांनी न्यायाधीशांसमोर ९ साक्षीदार तपासले. पीडित मुलीसह तिची आई, मावस बहीण आणि वैद्यकीय अधिका-यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षी आणि वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश अग्रवाल यांनी आरोपीस दोषी ठरवले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार धोंडिराम शिंदे यांनी काम पाहिले.