गिरणी कामगार व वारसदार बहुद्देशीय सेवा संघ मुंबई.
आयोजित नेसरी येथे जाहिर मेळावा संपन्न
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

गिरणी कामगार व वारसदार यांना मुंबईत घरे शासनाकडून आतापर्यंत १५००० गिरणी कामगार व वारसदारांना दिली गेली पण अद्याप ३० वर्षात १ लाख गिरणी कामगार व वारसदार घराच्या प्रतिक्षेत आहेत. तरी या गिरणी कामगारांच्या जिव्हाळयाच्या विषयाला हात घालून शासनाला जागकरून दखपात्र निर्णय घेण्याच्या दृष्टीने सदर मेळाव्याचे आयोजन रविवार दि. ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी विठ्ठलदिप हॉल, कोबाड रोड, नेसरी, ता. गडहिंग्लज येथे करण्यात आले होते.
या मेळाव्यात गिरणीकामगारांच्या खालील प्रमुख मागण्या घेऊन आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्हयातील सर्व गिरणी कामगार व वारसदार यांचे करिता सदर जाहिर मेळावा आयोजित केला आहे.

झालेल्या सेभेपूढील प्रमुख मागण्या :- १) गिरणी कामगार व वारसदार यांना घरे ही मुंबईतच मिळाली पाहिजेत.
२) गिरणी कामगार व वारसदार यांना शासनाकडून या पुढे जितकी वर्षे घरे देण्यास विलंब होईल तितकी वर्षे २५ पात्र गिरणी कामगार व वारसदार यांना मासिक भाडे रू. १५५,००० प्रमाणे नियमित देण्यात यावेत.
३) गिरणी कामगार व वारसदार यांचेकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आहेत आणि त्यांनी म्हाडाकडे अद्याप फार्म भरलेला नाही त्यांचे आवश्यक कागदपत्रे घेऊन नविन फॉर्म भरण्याची संधी देऊन शासनाच्या वेटिंगलिस्ट मध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा.
४) दि. १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय (जी.आर) रद्द करण्यात यावा. या प्रमुख मागण्या समोर घेऊन सदर जाहिर मेळाव्यात प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
५) वचननामा यामध्ये आपला
अध्यक्ष मुद्दा यावा आश मागणी आहे गिरणी कामगार व वारसदार बहुद्देशीय सेवा संघ मुंबई. याच बरोबर या जाहिर मेळयाव्या करिता विशेष व बहुमुल्य सहकार्य लाभलेले शुगर क्षेत्रातील यशस्वी उद्योजक तसेच दौलत कारखान्याला नवसंजिवणी देणारे आजरा तालुक्यातील हालेवाडी गावचे गिरणी कामगार वारसदार मानसिंग खोराटे यांचा ही या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमच्या संघटनेमार्फत सत्कार करण्यात येतो आहे.
तसेच आपले सहकारी गिरणी कामगार हेमंत गोसावी व गिरणी कामगार वारसदार रमाकांत बने यांनी गिरणी कामगारांचे हक्काच्या इतिहासात प्रथमच १४ दिवस वरील मागन्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय समोर बांद्रा मुंबई येथे उपोषन केलेले आहे. आशा या कर्तृत्ववान व समाजहितासाठी जिवाची पर्वा न करणाऱ्या प्रतीनिधीचा आमच्या संघटने मार्फत सत्कार करत आहोत. यावेळी सदर मेळाव्यात
सत्कार मुर्ती गिरणी कामगार वारसदार मानसिंग खोराटे यशस्वी उद्योजक (गिरणी कामगार वारसदार), हेमंत गासावी जेष्ठ गिरणीकामगार
रमाकांत बने लढाऊ आंदोलक (गिरणी कामगार वारसदार) सत्कार करण्यात आला. सत्कार ला उत्तर देताना उद्योजक श्री. खोराटे म्हणाले गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांना पक्के घर देण्यासाठी प्रयत्न करणार
गिरणी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्य उज्वलासाठी शाश्वत विकास करणे शाश्वत विकास हाच माझा ध्यास गिरणी कामगारांना घरी मिळण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून एकत्र लढूया व गिरणी कामगारांना आपल्या हक्काचे घर मिळवून देऊया असे म्हणाले. यावेळी गिरणी कामगार व वारसदार बहुउद्देशीय सेवा संघ, मुंबई. गिरणी कामगार व वारसदार चहुउद्देशीय सेचा संघ मुंबई गिरणी कामगारांच्या इतिहासात सर्व संघटना एकाच होते यामध्ये अर्जुन भादवणकर अध्यक्ष, रमेश पाटील उपाध्यक्ष (विमा प्रतिनिधी CLIA), अशोक शिंदे सेक्रेटरी, सुजित कोळेकर महाराष्ट अध्यक्ष, भिमराव साळगावकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, संजय मांगले कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, उत्तम, आर्दाळकर मुंबई प्रतिनिधी, प्रविण मगदुम मुंबई प्रतिनिधी, दयानंद दळवी मुंबई प्रतिनिधी, प्रतिक पाटील खजिनदा, शिवाजी जाधव आजरा तालुका अध्यक्ष, अभिजीत पाटील, आजरा तालुका उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, गिरणी कामगार व वारसदार बहुउद्देशीय सेवा संघ मुंबई. सह गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार श्री साळगावकर यांनी मानले.