गर्जना संघटनेच्या गर्जनेने.-आजरा वन विभागाचा सावळा गोंधळ केला उघड.( वृक्ष लावल्याचा बनाव.- घटनास्थळी झाडेच नाहीत.- ६८५६ वृक्ष लागवड गेली कुठे. )
आजरा.- प्रतिनिधी.
संकेश्वर-बांदा महामार्गातील झालेल्या वृक्षतोडीची पर्यायी लागवड ६८५६ झाडांची लागवड केल्याचा बनाव करून कोर्टीची बिले पास, परिक्षेत्र वन अधिकारी आजरा वनपाल दक्षिण आजरा महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग ठेकेदार यांची मिली भगत करून माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या खाजगी शेतीतीत वृक्ष लागवड केल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले. याबाबतची माहिती गर्जना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. श्री बेलवाडे बोलताना म्हणाले.
संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ चे बांधकाम करताना सुमारे २८०० झाडे तोडण्याचा अधिकृत परवाना असताना त्याहीपेक्षा जास्त १२००० हून अधिक झाडे तोडून वनाधिकारी आणि ठेकेदार यांनी पर्यावरणाचे प्रचंड हानी केली असून संपूर्ण कामांमध्ये वन विभागाने प्रचंड भ्रष्टाचार
केल्याचा आमचा आरोप असल्याने आम्ही त्याचा पाठपुरावा करीत असताना माननीय वन मंत्र्याच्या दिनांक २५ में २०२४ च्या आदेशाने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी उपविभाग अधिकारी भुदरगड-आजरा तसेच उपविभाग अधिकारी गडहिंग्लज – चंदगड यांना चौकशीचे निर्देश दिले होते.

त्यानुसार दोन्ही प्रांत कार्यालयात सुनावण्या सुरू आहेत याचपैकी उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज चंदगड यांच्याकडे तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी स्मिता डाके यानी एक दाखला दिल्याचे आढळे, संकेश्वर बांदा महामार्गाचे पूर्णत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी राजेंद्र सिंग भांबू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांनी आजरा वनपरिक्षेत्रातील परिमंडळ दक्षिण आजाराकडे मौजे. सरोळी ता. आजरा या गावातील गट क्रमांक २६१ (२० गुंठे) आणि गट क्रमांक २६२ (२५ गुंठे) या क्षेत्रात किमान 1 x 1 मीटर अंतरावर एकूण ४५ गुंठे क्षेत्रात आंबा, आवळा, सिसम, वड, पिंपळ, गुलमोहर, अर्जुन, सादडा, करंजी, इत्यादी प्रकारचे सुमारे ६८५६ झाडे लावल्याचा बनाव करत सदर क्षेत्र खाजगी मालकीची असून माजी. भा. प्र. से. आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे असल्याचे सुद्धा लक्षात आले नाही, सदर ठिकाणी यापैकी एक ही झाड लावले नसून सध्या तिथे ऊस शेती आहे तसेच या प्रकरणी श्री. देसाई कुटुंबियांना काही माहिती नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या अधिकाऱ्यांनी सामान्य
शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या जमिनीवर कागदोपत्री काय काय प्रकार केले असतील याची कल्पना करता येणार नाही. गर्जना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांनी सदर प्रकरणी सखोल चौकशी करून सर्व अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करून त्यांच्या आणि महामार्ग ठेकेदारावर पर्यावरण हानी आणि भ्रष्टाचार केल्याबाबत फौजदारी गुन्हा नोंद करावा तसेच नियूक्ती पासून ते आतापर्यंत केलेल्या सर्व कामाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तसेच देशभरातील सर्व महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या बांधकामांमध्ये लावलेल्या झाडांचे त्वरित सर्वेषण करून पडताळणी करावी यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि भारत सरकारकडे मागणी करणार आहोत.
तसेच वन मंत्री आणि महा. वन विभाग सचिव यांनी लक्ष घालून अशा भ्रष्ट मनमानी परिक्षेत्र वन अधिकारी आजरा यांच्यावर टोकाची कारवाई होण्यासाठी सूचना कराव्यात अशी मागणी गर्जना करीत आहे. बनाव केलेल्या सर्व ६८५६ झाडाची रितसर सामाजिक वनीकरण
केलेच पाहिजे. जीओ-टॅगिंगि तंत्र वापरून सर्व झाडे सक्षम होईपर्यंत देखरेख करावे अन्यथा गर्जना योग्य पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा आम्ही देत आहोत. सदर पत्रकार परिषदेत गर्जना संघटनेचे दिगंबर मिसाळ, बाजीराव लोखंडे, श्रावण कांबळे, नारायण भोसले, अमोल ढोणूक्षे, ज्योतिबा नांदवडेकर, सुरेश हातकर, बाबू कांबळे आणि सुरेश लाड तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत माहिती सोबत प्रसिद्धी पत्र गर्जना संघटनेचे कार्यालय सचिव विनायक चिटणीस यांनी आजरा जिल्हा कोल्हापूर येथून प्रसिद्ध केले आहे.

चौकट
तसेच सद्यस्थितीत देखील काही वृक्ष तोडायला अद्यापही चालू आहेत. मालकी हक्क दाखवून मडिलगे येथील आठ दिवसांपूर्वी वृक्ष तोडण्यात आले होते. याबाबत वनविभागाने संबंधित वृक्ष तोडणारे यांच्यावर तक्रारीनुसार पंचनामा केला होता. हा पंचनामा सदर वृक्ष हे बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्याने संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्याचे काम बांधकाम विभागाकडे दिले असल्याचे वनविभागाचे कर्मचारी यांनी सांगितले आहे. पण अजूनही याबाबतची कोणती कारवाई झाली नसल्याचे समजते.. याबाबत नागरिकांमध्ये सदर वृक्ष वातावरण शांत करून हडप करण्याची चिन्ह असल्याचे चर्चा आहे. संबंधित वृक्षाच्या फांद्या तोडायला विद्युत तारा देखील काढण्यात आल्या होत्या परंतु कोणत्याही चलन न भरता सदर तारा काढण्यात आल्या. पण वृक्षच तोडलं फांद्या तोडायला तारा काढल्या होत्या पण वृक्ष तोडलं हे महावितरणच्या लक्षात का आलं नाही असा प्रश्न उपस्थित होतो.