पैसे तुमच्या खात्यावर पण पुण्य आमच्या खात्यावर.- आम. प्रकाश आबिटकर.
(आजऱ्यात शासनाच्या विविध योजनेचे मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम संपन्न. )
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील आजरा जिल्हा परिषद मधील संजय गांधी निराधार योजना प्राधान्य लाभार्थी, कुटुंब रेशन कार्ड मंजुरी पत्र व पंचायत समिती आजरा मार्फत गोठा, शौचालय अनुदान योजना लाभार्थी मंजुरी पत्र वाटप. कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून आम. प्रकाश आबिटकर बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक तहसीलदार समीर माने यांनी केले. पुढे बोलताना आम. श्री. आबिटकर म्हणाले जनतेचे काम करण्यासाठी आम्ही निवडून आलो आहोत आयुष्यातील सर्वात मोठे पुण्याचे काम आहे. पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात परंतु पुण्य आमच्या खात्यावर जमा होण्याचे काम आम्ही करत होती आमची जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी यांनी संवेदनशील होऊन काम केले पाहिजे व लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला पाहिजे.

आजरा तहसील व पंचायत समिती विभागातील सर्व कर्मचारी लाभार्थ्यांना अगदी जबाबदारीने व प्रामाणिकपणे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. याचा सार्थ अभिमान आहे. असे बोलताना आम. श्री.आबिटकर म्हणाले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा म्हणाले. संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदावर काम करत असताना. कोणताही पक्ष गट तट न पाहता योग्य लाभार्थी यांना लाभ मिळवून देण्याचे काम केले आहे. या जिल्हा परिषद मतदार संघातील ३०३ संजय गांधी प्रकरण यातील २६ ग्रामपंचायत मधील श्रावण बाळ योजना ३१० अन्नधान्य ७६ लाभार्थी अशा एकूण ६१२ लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे. तोंडे बघून काम संजय गांधी निराधार योजनेत कधीच केलं नाही. समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांची कामे पूर्ण होण्यासाठी व त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काम केले आहे शासनाने गोरगरीब जनतेसाठी योजना काढल्या. या योजनेचे लाभ घेणारे लाभार्थी शासनाला विसरणार नाहीत. आग्रा तहसीलदार कार्यालयातील अधिकारी जनतेला न्याय देणारे अधिकारी आहेत. त्यांच्या व्यथा जाणून घेणारे असे अधिकारी लाभले आहेत असे श्री डिसोझा म्हणाले.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवर व कार्यक्रमाचे अध्यक्ष आम. श्री आबिटकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पत्र वाटप करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार म्हासाकांत देसाई, विकास कोलते, सहायक गट. विकास अधिकारी दिनेश शेटे, श्रीपती यादव, जी एम पाटील, श्वेता सरदेसाई, संजय पाटील, सरपंच प्रियांका जाधव, दत्ता पाटील, सुधाकर पाटील, सह विभागातील प्रमुख मान्यवर संबंधीत प्रशासकीय अधिकारी लाभार्थी ग्रामस्थ शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
