सुवर्णसंधी
फक्त शेतकऱ्यांसाठी.- औषध फवारणी बॅटरी पंप सिंगल मोटर पंप ५०% सवलतीच्या दरात.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.-.(शिवसेना आजरा तालूका ) वितरण शुभारंभ संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी औषध फवारणी बॅटरी पंप सिंगल मोटर पंप सवलतीच्या दरात.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आजरा तालूका यांच्यावतीने आज दिनांक ६ रोजी या वितरण सोहळ्याचा समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे होते.
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख युवराज पोवार म्हणाले वाढत्या महागाईमुळे शेतकरी त्रस्त आहेत यामध्ये आपल्या शेतातील शेत पिकांना सेंद्रिय खताची फवारणी व अन्य फवारणी करण्यासाठी आजरा शिवसेनेच्या सौजन्याने खास शेतकऱ्यांसाठी ५०% सवलतीच्या दरात औषध फवारणी बॅटरी पंप सिंगल मोटर पंप – ३८८ फक्त १५९९/-देत आहोत कृषीमित्र शेतीसेवा केंद्र आंबोली रोड आजरा या ठिकाणी येऊन आपण या शेतीपंपाचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले.


यावेळी गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, संभाजी पाटील (शिवसेना उपजिल्हाप्रमुख)
आजरा शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, युवा सेना महेश पाटील, उपतालुकाप्रमुख शिवाजी आढाव, संजय येसादे, सागर वाघरे, तसेच तानाजी डोंगरे दिनेश कांबळे, आनंद येसने, सुनील मुळीक सह तालुक्यातील शाखाध्यक्ष शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर प्रमुख माद्याळकर यांनी आभार मानले.
