🛑आजरा अर्बन बँकेला “सर्वोत्कृष्ट बैंक” पुरस्कार प्रदान.
🛑विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्षम केंद्र – आजरा महाविद्यालयाचा लौकिक… प्राचार्य डॉक्टर ए एन सादळे..
आजरा.- प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि. यांचे मार्फत जिल्हास्तरीय बँकींग परिषदेच्या कार्यक्रम सोहळ्यामध्ये आजरा अर्बन बँकेला “सर्वोत्कृष्ट बैंक” पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ बुधवार दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमामध्ये रु.५०१ कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांच्या गटात सर्वोत्तम नागरी सहकारी बँकेस दिला जाणारा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बैंकस सलग तिसऱ्या वर्षी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष श्री. निपुणराव कोरेसो व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या उपाध्यक्षा सौ. वैशालीताई आवाडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी बँकेचे चेअरमन रमेश कुरुणकरसो, संचालक सुरेश डांगसो, विलास नाईकसो, डॉ. अनिल देशपांडेसो, किशोर भुसारीसो, आनंदा फडकेसो, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीरसो उपस्थित होते.
आजरा तालुक्यामध्ये ६४ वर्षापूर्वी बँकेचा कार्यविस्तार सुरू झाला. शेतीपुरक उद्योग, छोटे व्यावसायिक व उद्योग यांना अर्थ पुरवठा हा केंद्र बिंदू मानून बँकेने आतापर्यन्त जवळपास रु.१५०० कोटीच्या वर व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. स्वभांडवलावर मल्टी स्टेट दर्जा प्राप्त करणारी जिल्ह्यातील आजरा बँक ही एकमेव बँक असून शेड्यूल बँकेकडे वाटचाल सुरू आहे. बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बँकिंग, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsap Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत.

बँक महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्हयात व कर्नाटक राज्यातील बेळगावी व उत्तर कन्नड जिल्हयात एकूण ३५ शाखांच्या माध्यमातून सेवा देत आहे.
भविष्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गरजू व्यावसायिक व उद्योजकांना व त्यांच्या गरजाना अर्थ पुरवठा करून देशाच्या प्रगतिमध्ये योगदान देण्याचा मानस असून वरील सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधनेचे आवाहन बँकेचे चेअरमन रमेश कुरुणकरसो यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्षम केंद्र – आजरा महाविद्यालयाचा लौकिक… प्राचार्य डॉक्टर ए एन सादळे..
आजरा.- प्रतिनिधी.

अण्णा- भाऊ स्मृती पंधरवडा निमित्त आजरा महाविद्यालय आजरामध्ये ज्युनिअर व्होकेशनल विभागाच्या वतीने तालुकास्तरीय शालेय निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर ए एन सादळे हे होते.
सकाळी 11 वाजता कार्यालयीन अधीक्षक श्री योगेश पाटील सर उपप्राचार्य दिलीप संकपाळ सर व्होकेशनल विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक एम एच देसाई सर तसेच अण्णा भाऊ स्मृती पंधरवडा कार्यक्रमाचे विभाग प्रमुख प्राध्यापक विनायक चव्हाण सर या मान्यवरांच्या उपस्थितीत कै काशिनाथ (अण्णा) चराटी व कै. माधवराजी( भाऊ) देशपांडे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर लगेच निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध स्पर्धेसाठी आजरा तालुक्यातून 15 शाळांमधून 55 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तर वक्तृत्व स्पर्धेसाठी तालुक्यातून 17 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
दुपारी 3 वाजता बक्षीस वितरण समारंभ प्राचार्य डॉक्टर ए एन सादळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर एन सादळे यांनी आजरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हेच महाविद्यालयातून देण्यात आलेल्या शिक्षणाची पोचपावती आहे असे मत व्यक्त केले. महाविद्यालयामध्ये क्रमित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना विकसित करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यामधूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होतो. असे प्रतिपादन केले.या स्पर्धेमध्ये पुढील प्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

निबंध स्पर्धा
प्रथम क्रमांक.. प्रणाली नामदेव कुंभार ( पार्वती शंकर विद्यालय उत्तुर.) द्वितीय क्रमांक.. दिपाली उदय नेवगे ( बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे.) तृतीय क्रमांक… संकेत सुनील कांबळे ( पेरणोली हायस्कूल पेरणोली.) उत्तेजनार्थ…1) सिद्धी युवराज सुतार ( मडिलगे हायस्कूल मडिलगे )
2) हर्षदा निलेश नरवलकर. ( माध्यमिक विद्यालय अर्दाळ.)
वक्तृत्व स्पर्धा…
प्रथम क्रमांक.. सिमरन भिकाजी पाटील (व्यंकटराव हायस्कूल आजरा ) द्वितीय क्रमांक… निवेदिता पांडुरंग सागर ( माध्यमिक विद्यालय अर्दाळ ) तृतीय क्रमांक… संचिता संतोष दिवेकर ( बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे ) उत्तेजनार्थ.. 1) सौरभ संतोष पाटील ( पार्वती शंकर विद्यालय उत्तुर ) 2) रिया राजाराम सावंत..( पार्वती शंकर विद्यालय उत्तुर ) 3) समृद्धी उत्तम वांद्रे ( पेरणोली हायस्कूल पेरणोली )
बक्षीस पात्र सर्व विद्यार्थ्यांचे रोख रक्कम स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ज्युनिअर व्होकेशनल विभागातील सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच प्रशासकीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दोन्ही स्पर्धेचे परीक्षण सिनिअर विभागातील प्राध्यापक डॉक्टर बुडके सर व प्राध्यापिका डॉक्टर मनेर मॅडम तसेच जुनिअर विभागातील प्राध्यापक रत्नदीप पवार, प्राध्यापिका एस जी धामणेकर, प्राध्यापिका व्ही एम देसाई, प्राध्यापिका एस आर पारकर, प्राध्यापिका एस ए कांबळे , प्राध्यापिका एस आर माने यांनी केले.