जनता सहकारी गृहतारण संस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत.
आजरा.- प्रतिनिधी
आजरा सारख्या ग्रामीण भागात असणाऱ्या जनता सहकारी गृहतारण संस्थेने मार्च २०२४ अखेर ८२ कोटी ८४ लाख १८ हजारांच्या ठेवी गोळा केल्या असून संस्थेने ५८ कोटी ४१ लाख ९८ हजार इतके कर्ज वाटप केलेने संस्था विश्वास व पारदर्शक कारभाराचे धोतक असल्याचे मत संस्थेचे व्हा चेअरमन श्री. गणपतराव आरळगुंडकर सर यांनी संस्थेच्या २३ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेत व्यक्त केले.
संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ४३ लाख ९१ हजार ७३४ इतका निव्वळ नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लांभाश देण्यात आल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष गणपतराव आरळगुंडकर यांनी संस्थेच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहिर केले. सभेच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. आरळगुंडकर होते.
स्वागत व प्रास्ताविक संस्था उपाध्यक्ष श्री.आरळगुंडकर यांनी करुन संस्थेच्या आजपर्यंतच्या सांपत्तीक स्थितीचा आढावा सभासदासमोर सादरकेला. यावेळी सेवानिवृत्त, बढती मिळालेबद्दल शाल, स्मृतीचिन्ह व आत्मचरीत्र पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ४ थी ५ वी शिष्यवृत्ती, १०वी व १२ वी व पदवीधर, वेगवेगळ्या क्षेत्रातील नाविण्यपूर्ण प्राविण्य मिळविलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव चिन्ह, व आत्मचरीत्र पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रो डॉ. अशोक बाचूळकर सर यांनी केले.
संस्थेची विषय पत्रिका, मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन, ताळेबंद व नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले,, शासकीय लेखापरीक्षणाचे वाचन व संचालक मंडळ कर्ज यादीचे वाचन मॅनेजर मधुकर खवरे यांनी केले. संस्थेच्या ऐनवेळच्या विषयांमध्ये श्री. चंडोपंत चव्हाण, संभाजीराव इंजल, हंबीरराव आडकूरकर, कृष्णा येसणे यांनी सभेत सहभाग घेतला.
संस्थेची गडहिंग्लज व कोल्हापूर येथे स्व-मालकीची इमारती असून गारगोटी, इचलकरंजी, सांगली व पाटणे फाटा येथे शाखा सुरु आहेत. संस्थेला आय एस ओ. मानांकन ९००१: २०१५ प्राप्त झालेले आहे असे संस्थेचे व्हा. चेअरमन यांना सांगीतले. आपली संस्था स्व-भांडवलावर सुरु असून कोणत्याही बँकेकडून कर्ज न घेता व्यवहार सुरु आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. सभासदांनी या पुढिल काळातही सहकार्य करावे असे आवाहन उपाध्यक्ष गणपतराव आरळगुंडकर यांनी केले.
सभेचे सुत्रसंचालन प्रा. विनायक चव्हाण व आभार डॉ. सौ. अंजनी देशपांडे यांनी मानले. यावेळी आजरा शाखेचे संचालक प्राचार्य डॉ. अशोक सादळे, प्रा. डॉ. तानाजी कावळे, प्रा. बळवंत कडवाले, प्रा. मनोज देसाई, प्रा.सौ. लता शेटे, प्रा. सी. नेहा पेडणेकर उपस्थित होते. संस्थेचे मॅनेजर मधुकर खवरे व प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार व सर्व शाखाचे चेअरमन, संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.