Homeकोंकण - ठाणेवळवाच्या पावसाने तालुक्यात भात पिकांचे नुकसान.- आजरा तालुक्यातील भात पिके झोपली.- प्रशासनाने...

वळवाच्या पावसाने तालुक्यात भात पिकांचे नुकसान.- आजरा तालुक्यातील भात पिके झोपली.- प्रशासनाने जागे व्हावे.

वळवाच्या पावसाने तालुक्यात भात पिकांचे नुकसान.- आजरा तालुक्यातील भात पिके झोपली.- प्रशासनाने जागे व्हावे.

आजरा.- प्रतिनिधी.

मागील दोन-तीन दिवसात वळवाचा पाऊस अधिक प्रमाणात पडत आहे. अचानक येणार वळवाचा पाऊस या पावसाने भात पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. आजरा तालुका हा भात पिक घेणारा तालुका आहे. येथील शेतकरी ऊस पिकासोबत अधिक प्रमाणात भात पीक घेत असतात.

काही भागात इतके प्रकल्प असताना पाण्या अभावी पावसाळी भात पीक घेणे शेतकरी पसंत करतात परंतु लवकर येणारी (लव्ही ) भाते शरीरास घातक असणाऱ्या रासायनिक खतामुळे अधिक जोमाने येतात व मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास ती जमीनदोस्त होतात. नेमक्या भात कापणीच्या वेळी वळवाचा पाऊस पडल्याने भात कापणी करून मळणी काढणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. त्यामुळे भात कापून ठेवून ऊन नसल्यामुळे मळणी कशी काढायची व भात वाळवायचं कसं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासाठी शासन स्तरावर संबंधित नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. तरी अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी ई. पीक. पाणी नोंद केली नाही अशा शेतकऱ्यांनी सदर नोंद करून आपल्या भात पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी करावी.

Oplus_131074

यामुळे प्रशासनाला मदत होईल व आपली नुकसान भरपाई मिळेल. आपण जर पीक पाणी नोंद केली नसेल तर आपल्याला नुकसान भरपाई मिळणार नाही. व ज्या शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. अशा शेतकऱ्यांनी ज्यांची भात पिकाचे नुकसान झाले आहे. त्यांनी संबंधित विभागाशी संपर्क करावा. परंतु अधिक प्रमाणात भात पिकाचे नुकसान झालेले शेतकरी नुकसान भरपाई ची मागणी करत आहेत. यासाठी संबंधित विभागाने अशा शेतकऱ्यांची माहिती घेऊन पंचनामे करावे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.