Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रपुढील हंगामाची तयारी पूर्ण क्षमतेने करून गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा...

पुढील हंगामाची तयारी पूर्ण क्षमतेने करून गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा मानस.- चेअरमन वसंतराव धुरे ( वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.)

पुढील हंगामाची तयारी पूर्ण क्षमतेने करून गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा मानस.- चेअरमन वसंतराव धुरे ( वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखाना अनंत अडचणीतील हा कारखाना सभासदांचे व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकार्य व मार्गदर्शनानुसार पूर्ण क्षमतेने व ४ लाख टन क्रशिंग करून चांगल्या पद्धतीने कारखाना चालविणेचा प्रयत्न आम्हा संचालक मंडळाचा राहणार असल्याचे चेअरमन वसंतराव धुरे आजरा साखर कारखान्याच्या ३४ व्या सर्वसाधारण सभेत बोलत होते. स्वागत संचालक एम. के. देसाई यांनी केले तर अहवाल वाचन प्र.‌ कार्य. संचालक व्यंकटेश ज्योती यांनी केले पुढे प्रास्ताविक करताना श्री धुरे म्हणाले प्रथमतः ग्वाही देतो, कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक गळीत हंगामाच्या मध्यावर झालेने मागील हंगामामध्ये म्हणावे तसे काम आम्हाला करता आले नाही. अपुरी आलेली तोडणी वाहतुक यंत्रणा, महामार्गाचे सुरू असलेले काम यामुळे ऊस पुरवठ्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या त्याचाही गळीतावर परिणाम झाला व कारखान्याचे गाळप कमी झाले. कारखान्याची मशिनरीही १९९७ पासून कार्यरत असलेने ती पूर्ण क्षमतेने चालवितांना तक्रारी येत आहेत. याचा विचार करून व अन्य कारखान्याची गाळप क्षमता व ऊसाची उपलब्धता यामुळे गळीताचे दिवस कमी झाले आहेत. म्हणून कमीत – कमी दिवसात जास्तीत – जास्त गाळप व्हावे. याकरीता कार्यरत असलेल्या मशिनरीमध्ये तज्ञांचे सल्याने कांही बदल व जादा आवश्यक मशिनरी बसवून गळीत पूर्ण क्षमतेने व नियमित व्हावे. यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. त्याकरीता पुढील हंगामाची तयारी पूर्ण क्षमतेने करून कारखान्याचे गाळप उद्दिष्ट पूर्ण करणेचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने कामकाज सुरू आहे. आज आपल्या साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अहवाल, एकत्रित ताळेबंद, नफा – तोटा पत्रक व सन २०२४-२५ या सालचे महसुली व भांडवली अंदाजपत्रक आणि उपविधी दुरूस्तीचा प्रस्ताव आपल्या मान्यतेसाठी संचालक मंडळाचे वतीने सादर करीत आहे. सन २०२३ – २४ चा गळीत हंगाम आपल्या साखर कारखान्याचा सन २०२३-२४ हा २५ वा गळीत हंगाम दि. १४/
११/२०२३ इ. रोजी सुरू होवून दिनांक ०३/०३/२०२४३. रोजी समाप्त झाला. या हंगामात १११ दिवसात काखान्यात २,६४,४१३.१५८ मे. टन इतके ऊस गाळप होऊन ३,२८,६५० किंटल साखर उत्पादन झाले. तर सरासरी साखर उतारा १२.४२ टक्के इतका मिळाला. या हंगामात गळीतासाठी तालुक्यातील सभासद व बिगर सभासदांचा १,५८,५२० मे. टन व तालुक्याबाहेरून १,०५,८९३ मे. टन ऊस उपलब्ध झाला. कारखान्याकडे उपलब्ध तोडणी वाहतूक यंत्रणेमार्फत कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस उचल करणेचा प्रयत्न संचालक मंडळाने केला. सदर हंगामात तोडणी वाहतुक यंत्रणा कमी उपलब्ध झाली त्याचबरोबर संकेश्वर-बांदा या राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेल्या कामामुळे रस्त्यावरून वाहने येण्या-जाण्यासाठी अडचण होत होती त्यामुळे तोडणी वाहतुक यंत्रणा क्षमतेप्रमाणे काम करु शकली नाही. त्यामुळे त्याचा परिणाम कारखाना गाळपावर झाला आणि गळीताचे निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करता आलेले नाही. मागील हंगामातील सर्व अडचणी विचारात घेवून या हंगामाकरिता सक्षम तोडणी वाहतकु यंत्रणा भरणेत आली आहे. कार्यक्षेत्रात ऊस वाढीसाठी आवश्यक असलेले तालुक्यातील सर्व पाणी प्रकल्प पूर्ण झाले असून त्यामध्ये चित्री, उचंगी, आंबेओहळ हे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तर सर्फनाला प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये सद्या प्रायोगिक तत्वावर पाणी साठा करणेत आला सर्वच प्रकल्प मध्ये पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध झाले ऊस उत्पादनात वाढ होईल त्यामुळे पुढील कालावधी कारखाना पूर्ण क्षमतेने चालण्यास कार्यक्षेत्रामधूनच पुरेसा ऊस उपलब्ध होणार आहे. कारखाना चांगल्या पद्धतीने चालून उत्पादन खर्चात बचत व्हावी. व आर्थिक दृष्ट्या आपला कारखाना सक्षम व्हावा यासाठी व्यवस्थांना मार्फत व संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. असे बोलताना चेअरमन श्री धुरे म्हणाले. श्रद्धांजली वाचन संचालक नांदवडेकर यांनी केले.‌ संचालक मंडळाच्या हस्ते उत्कृष्ट ऊस उत्पादक तिन्ही गटातील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला
.

Oplus_131074

सभासदांच्या प्रतिक्रिया व प्रश्न.
यामध्ये.-माजी चेअरमन सुनील शिंत्रे, संचालक तानाजी देसाई, तसेच इंद्रजीत देसाई, सुनील शिंदे, तुळास्पा पोवार, संजय देसाई, रियाज तकीलदार, युवराज पोवार, आरिफ खेडेकर
श्रीमती अंजनाताई रेडेकर, दिनेश कांबळे, भिकाजी पाटील, राजु देशपांडे

यांनी विविध प्रश्नांचा भडीमार केला.

Oplus_131072

१) अपात्र केलेल्या सभासदांचे सभासदत्व कायम करावे
२) तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद यांचा ऊस आपल्या कारखान्यात घालावा म्हणून घरोघरी जाऊन विनंती करावी.
३) कारखाना कर्जात सभासद शेतकऱ्यांना काय दिला. साखर देखील दिला नाही.
३) कर्मचारी यांना आपलं म्हणुन वागणुक द्यावी.
४) पुढील काळात कारखाना कर्जातून बंद पडला तर याला जबाबदार संचालक मंडळ असेल
५) शेअर्स अनामत रक्कम वाढवल्या बाबत
६ ) मागील हंगामात कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक असताना कारखाना का? बंद झाला.
७) दाभेवाडीत एकही उसाच कडग मागील हंगामात तुटल नाही.
८) कामगारांच्या वेतनात वाढ व्हावी.
९) गजर नसताना मशनरी कशाला.- कारखाना अडचणीत आहे.
१०) ऊस टोळीना दिलेले अॅडव्हान्स वसुली करा.
११) दिपावलीला साखर पाहिजेत.नाहीतर मोर्चा.
१२) शेअर्स भांडवल अनामत रक्कम का वाढवली. यादी तयार करा. – याबाबतची नोंद अहवालात असावी
१३) पेद्रेवाडील टोळी करार का? करून घेतला नाही.
१४) बीड यंत्रेणेकडुन ऊस उत्पादकांची पिळवणूक होऊ नये.
१५) रेल्वे मार्ग आजऱ्यातून व्हावा.
याबाबतचा ठराव.

वरील प्रश्नांची चेअरमन व कारखाना व्यवस्थापनाने उत्तरे दिली.

यावेळी व्हा. चेअरमन मधुकर देसाई संचालक सुधीर देसाई, विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मारुती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी रामचंद्र पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशिलकर, गोविंद पाटील, सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, काशीनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे, नामदेव नार्वेकर
रशिद पठाण, दिगंबर देसाई, प्र. कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती तसेच माजी संचालक सभासद, विविध, संस्थेचे पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक श्री. तेली यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.