मुख्यमंत्री / ग्राम विकास मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाच झालं तरी काय.- उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या प्रलंबित प्रलंबित मागण्यांबाबत ( आजरा संघटनेचे प्रशासनाला निवेदन २ ऑक्टोबरला मशाल आंदोलन.)
आजरा प्रतिनिधी.
उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या प्रलंबित प्रलंबित मागण्यांबाबत शाखा आजरा संघटनेचे प्रशासनाला मंगळवार दि. २४ रोजी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या प्रलंबित प्रलंबित मागण्यांबाबत संदर्भ १. संघटनेचे मुख्यमंत्री व या ग्रामविकास मंत्री यांना दिलेले निवेदन उपरोक्त संदर्भ पत्रान्वये व प्रत्यक्ष झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदय व मंत्री ग्रामविकास महाराष्ट्र राज्य यांचेसोबत झालेल्या बैठकीत लवकरच सर्व मागण्या पूर्ण करत आहोत. असे आश्वासित केले होते.

संदर्भ क्र.२ अन्वये दिनांक १० ते १ रोजीच्या आझाद मैदानातील आंदोलनादरम्यान प्राप्त झालेल्या पत्रान्वये अध्याप मागण्या पूर्ण न झालेमुळे अभियानातील मने महिला केडर, कंत्राटी अधिकारी, कर्मचारी या सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मा. मुख्यमंत्री आणि मा.ग्रामविकास मंत्री महादय यांचा मान राखून आझाद मैदानातील आंदोलन दिनांक १२ जुलै २०२४ रोजी तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. पदये पत्रान्वये मुख्यमंत्री, ग्राम विकास मंत्री प्रधान सचिव यांचेसोबत संघटनेच्या प्रलंबित न्याय मागन्यालया पूर्ततेबाबतची प्रक्रिया जाणून घेनेसाठी प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ मिळावा यासाठी वेळोवेळी विनंती करण्यात आलेली मात्र आम्हाला शासनाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे अभियानात सहभागी झालेल्या ७४ लक्ष कुटुंबांच्या तूर्त स्थगित केलेले बेमुदत धरणे आंदोलन गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर दिनांक २५ सप्टेंबर रोजीपासून संविधानिक मार्गाने संप सुरु करत असून असहकार आंदोलन, आमरण उपोषण, संप/कामबंद आदोलन गावस्तरावर मशाल/प्रभात फेरी सुरु करत आहोत.
दिनांक २ ऑक्टोबर रोजी तालुका स्तरावर, ५ ऑक्टोबर रोजी राज्य संघटनेच्या मागणी बाबत अधिवेशन तथा जनजागृती महामेळावे घेणेचे नियोजन आहे. दिनांक ०३ ऑक्टोबर राजी
कामबंद आंदोलन सुरु करत असून मानवी साखळी करून शांततेत सर्व स्तरावर प्रभातफेरीच्या माध्यमातून लोकांत। (on व प्रशासकीय अधिकारी यांना आमचे प्रशासकीय प्रमुख अधिकारी, निर्णयकर्ते, कुटुंबप्रमुख, आधार, पालक ०४ आपणास नम्रपणे विनंती करण्यात येते की निवेदनातील खालील मागणीच्या पूर्ततेसाठी सोबत दिलेल्या प्रस्तावाण
न्याय मागण्या पूर्ण होणेसाठी मा. मुख्यमत्री. पा. ग्रामविकास मंत्री आणि मा, प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत व गावच्या वतीने कळविण्यात यावे. सदर मध्य गीच्या पूर्ततेचा शासन निर्णय दिनांक दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजीपर्यंत अंमलबजावणी आदेश निर्गमित करावा. ही नम्र विनंती. जेणेकरून सदरचे आंदोलन व संप स्थगित करण्याचा निर्णय संघटनेला घेणेस मदत होईल.

प्रमुख मागणी – शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी गा
शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे. सदरची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही आमच्या न्याय मागण्यांसाठी संविधानिक पद्धतीने दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजीपास। इच्छा नसताना देखील असहकार आंदोलन सुरू करत असून वरीलप्रमाणे मशाल फेरी, प्रभातफेरी, अधिवेशन तथा जनजा महामेळावे घेत आहोत त्यास परवानगी द्यावी व आवश्यक ते सहकार्य करावे. सदर अधिवेशन व जनजागृती मेळाव्याला राहून मार्गदर्शन करावे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदरची निवेदन गटविकास अधिकारी, आजरा तहसीलदार व आजरा पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर. अध्यक्षा – नम्रता नार्वेकर, उपाध्यक्ष वर्षा भिऊगडे, कोषाध्यक्ष तेजस्विनी देसाई, तसेच संघटनेच्या सदस्या उमा समकाळ, सुनिता परीट, मनीषा गिलबिले, माधुरी देसाई, भारती परीट, संध्या कांबळे, वर्षा कापसे, रूपाली पाटील, वैशाली फडके, रेखा परीट, रेश्मा भांईगडे शारदा चव्हाण सह आजरा उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या महिलांच्या सह्या आहेत. यावेळी आजरा उमेद शाखेच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.