Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रनगरपंचायतीकडून रहिवाशांना मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा.- बाबत अन्याय निवारण समितीचे निवेदन. ( आजरा...

नगरपंचायतीकडून रहिवाशांना मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा.- बाबत अन्याय निवारण समितीचे निवेदन. ( आजरा नगरपंचायत समोर शंखध्वनी करून निदर्शने.)

नगरपंचायतीकडून रहिवाशांना मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा.- बाबत अन्याय निवारण समितीचे निवेदन. ( आजरा नगरपंचायत समोर शंखध्वनी करून निदर्शने.)

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

नगरपंचायतीकडून रहिवाशांना मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा बाबत अन्याय निवारण समितीने आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा शहराचा पाणी पुरवठा विभाग कामाचा पूर्ण बट्याबोळ झालेला आहे. बरेच ठिकाणी पाईपला गळती लागलेली असून बरेच ठिकाणी पाणी पुरवठा कमी दाबाने अनियमित होत आहे. त्याबाबत रहिवाशांचे बरेच मागणी अर्ज नगरपंचायतीकडे आले असून सदर अर्जाना आपण केराची टोपली दाखविलेली आहे. शहराला होणारा पाणी पुरवठा स्वच्छ व नियमित योग्य दाबाने कधी मिळाणार? याचे लेखी उत्तर आपण द्यावे.


त्याचप्रमाणे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभिर झालेला असून शहरातील कचरा उठाव होत नाही. घरातील कचरा घेऊन जाणेसाठी घंटागाडी / ट्रॅक्टर चार चार दिवस येत नाही. त्यामुळे घरातील कचरा घरीच कुजला जातो व सर्वत्र दुर्घधी सुटुन आरोग्य धोक्यात आलेले आहे. काहीजण घरात कुजलेला कचरा घरात नको म्हणून रस्त्यावर आणुन टाकत आहेत. त्यांना जाब विचारला असता चार चार दिवस कचरागाडी येत नसलेने आम्ही काय करायचे अशी उत्तरे देतात. अन्याय निवारण समितीने गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावर मुरुम टाकणे विषयी सूचना केली होती. पण त्या गोष्टीला आपण चुनाच लावला. मुरुम टाकणेचे सोंग करून जागो जागी ट्रॅक्टरने मुरुम टाकुन मुरुम टाकणेचे काम चालु आहे. असे दर्शविले. परंतु प्रत्यक्षात काही ठिकाणी मुरमाचे ढीग टाकुन न पसरता तसेच ठेवलेले आहेत. त्यावेळी सणावारामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याच्या घरी सण असतात त्यामुळे त्या गोष्टीकडेसुध्दा आम्ही कानाडोळा केला व आपणास जाब विचारणेत आला नाही. तरी सद्या शहरातील रस्त्यांची पहाणी करुन ज्याठिकाणी मुरुमाची आवश्यकता आहे त्याठिकाणी मुरुम टाकणेची व्यवस्था करणेत यावी.
आजरा शहरासाठी २७ कोटीची नवीन पाणी पुरवठा योजना चालु आहे. सदर कामाची मुदत कोठ पर्यंत आहे? व सदर कामासाठी ठेकेदाराने मुदतवाढ मागितलेली आहे का? असेल तर मुदत वाढ कधीपर्यंत आहे अशा विविध प्रश्नाची विचारणा करत निवेदन देऊन निषेध आजरा नगरपंचायत च्या समोर शंखध्वनी करण्यात आला. याबाबत आजरा नगरपंचायत विविध प्रश्नांची लेखी उत्तरे दिली आहेत.
या आंदोलनात अध्यक्ष परशुराम बामणे सह अन्याय निवारण समितीचे सर्व सदस्य आजरा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट.

आजरा नगरपंचायतची लेखी उत्तरे.
१) नियमित स्वच्छता व कचरा उठाव कधी होणार.-
आजरा नगरपंचायत आरोग्य विभागाकडे दैनंदिन स्वच्छता करणेसाठी नगरपंचायत आस्थापनेवर एकही स्वच्छता कर्मचारी पद मंजूर नाही. त्यामुळे सदर काम करणेसाठी निविदा प्रक्रिया राबवून स्वच्छतेचा ठेका देणे आवश्यक आहे. त्याकरीता त्यानंतर नविन ठेकेदार नियुक्त करून कचरा संकलनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तथापि सदर निविदा प्रक्रियेत काही तांत्रिक अडचण निर्माण झालेस त्यासाठी पुढील कार्यवाही करणेसाठी अतिरिक्त/वाढीव कालावधी लागण्याची शक्यता आहे.
२) पाणीपुरवठा स्वच्छ व नियमित कधीपासून होणार.- आजरा शहरातील नविन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. ■ आजरा शहरातील पावसामुळे ४ महिने पाणीपुरवठा योजनेचे कामकाज पूर्णतः बंद होते. त्यासाठी त्यांना ४ महिन्याची वाढीव मुदत द्यावी लागणार असून पुढील ६ महिन्यामध्ये नविन पाणीपुरवठा योजनेचे पूर्ण होवून आजरा शहरातील नागरीकांना सुरळीत पाणी पुरवठा करणेत येईल. तसेच दिनांक ०५/१०/२०२४ पासून आवंडी वसाहत, गांधीनगर व जिजामाता कॉलनी येथील पाणीपुरवठा सुरळीत करणेत येणार आहे. व नविन पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारांसोबत नविन पाणी योजनेच्या विविध प्रश्नासंदर्भात मिटींग आयोजित करणेत येईल.

असे निवेदनातील प्रमुख मुद्द्याचे उत्तर आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी लेखी दिली आहे.

चौकट.

यामुळे दोन दिवसांपूर्वी आजरा नगरपंचायत माजी नगरसेवक यांनी पत्रकार परिषद घेऊन १ तारखेपासून कचरा नियमित उचलण्यात येईल असे सांगितले होते. पण याबाबत आजरा नगरपंचायतने
निविदा प्रक्रिया सुरू असून सदर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दि. २०/१०/२०२४ पर्यंतचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे लेखी उत्तर व पत्रकार परिषद यामध्ये तफावत दिसून येते. तरीही आजरा नगरपंचायत यांनी आजरा शहर सोबत हा आजरा तालुका आहे. तालुक्याला ग्रामीण भागातील नागरिक येत असतात. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने घातक रोगराई यासाठी तात्पुरते खाजगी कामगार लावून आजरा शहराची स्वच्छता करणे आजरा नगरपंचायत म्हणून कर्म प्राप्त आहे. अशी ही मागणी होत आहे.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.