Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेत खालील प्रश्नांचा समाधानकारक खुलासा मिळावा. - माजी...

आजरा कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेत खालील प्रश्नांचा समाधानकारक खुलासा मिळावा. – माजी संचालक व सभासदांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती.

आजरा कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेत खालील प्रश्नांचा समाधानकारक खुलासा मिळावा. – माजी संचालक व सभासदांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेत समाधानकारक खुलासा मिळावा. याबाबत माजी संचालक व काही सभासदांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती. दिली आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभे निमित्त वाटप केलेल्या वार्षिक अहवालामध्ये प्रसिद्ध केलेल्या चुकीच्या माहितीबाबत विद्यमान संचालक मंडळ सभासदांना समाधान कारक खुलासा करेल काय ?


१) जमीन वाढीव मूल्यांकन निधी रु. २७ कोटीवरुन रु. १७९ कोटी दाखविला आहे हे वास्तवास व मार्केट रेटला धरून आहे काय ? वाढीव मूल्यांकन दिशाभूल करणारे आहे (ताळेबंद पान क्र. ११)
२) कायम मालमत्ता वाढीव मूल्यांकन निधी गेल्या वर्षी ० किंमत असताना या वर्षी रु. ८३ कोटी ५३ लाख इतकी रक्कम दाखविली आहे. १९९७ च्या जुन्या मशीनरींची किंमत आता इतकी होऊ शकते काय? ही माहिती चुकीची आहे (पान क्र.११)
३) राखीव निधीतून चालू वर्षी १ कोटी ७३ लाख रुपये कमी केले आहेत या रक्कमेचा वापर कोठे केला याचा खुलासा होणे जरुरीचे आहे.
४)नफा तोटा पत्रक (पान क्र. २२) एसएमपी उस बिलावरील व्याज खर्च रु. २ कोटी ७८ लाख ४८ हजार ४०४ रु. दाखविला आहे ती रक्कम कोणासाठी खर्च केली याचा खुलासा होणे अपेक्षित आहे.


५) गेल्या वर्षीचे क्रशिंग विचारात घेतले तर (३.३६) संस्थेचे एकूण उत्पन्न रु.१५८ कोटी दाखविले होते त्या तुलनेने यंदा क्रशिंग कमी झाले असून ते २.६८ इतके आहे असे असताना तसेच एकूण उत्पन्नात २६ कोटी रुपयांची घट होऊनही नफा तोटा पत्रकात संस्थेचा नफा १ कोटी ३१ लाख १६ हजार दाखविला आहे हे कसे होऊ शकते?
६) सभासदांना साखर वाटप झाले पाहिजे याबाबत निवडणूक जाहिरातनाम्यात उल्लेख केला होता त्याचे काय झाले ?
७) कामगारांचे ३०% देणे होते त्यातील किमान १५% रक्कम चालू हंगामात देणे अपेक्षित होते त्यावर संचालक मंडळाने काय कार्यवाही केली ?
८) अपात्र केलेल्या २७०० सभासदांच्या भागांची किमान रक्कम रु.५०००/- धरल्यास अनामत अंदाजे रक्कम रु. १ कोटी ३५ लाखाचे वर होते ही रक्कम ताळेबंदात कोठे दाखविण्यात आली याचा खुलासा व्हावा.
९) कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी केंद्र शासनाचे पॅकेज मिळणार असल्याची ग्वाही आपण दिली होती त्याचे काय झाले?
१०) डिस्टलरी प्रोजेक्ट बाबत काय झाले याचा खुलासा गेल्या वर्षी जो दिला होता तोच खुलासा या वर्षी देणेत आला आहे ही पळवाट नाही का ?


११) क्रशिंग विचारत घेता ४०० टोळ्या अतिरिक्त येणार आहेत त्याचा वापर कोठे व कसा करणार याचा खुलासा व्हावा
१२) नवीन मशनरी करिता आपण रु. ७ कोटी खर्च केले आहे त्यामुळे क्रशिंगमध्ये किती फरक पडणार याचा खुलासा करण्यात यावा. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे या प्रसिद्धी पत्रकावर माजी चेअरमन सुनील शिंत्रे, अशोक चराटी संचालक राजेंद्र सावंत, दशरथ अमृते, अंजनाताई रेडेकर, मलिककुमार बुरुड, जितेंद्र टोपले, तानाजी देसाई, तसेच सभासद युवराज पोवार, आतिशकुमार देसाई, शैलेश मुळीक आदींच्या सह्या आहेत.

चौकट.

याबाबत चेअरमन वसंतराव धुरे तसेच संचालक सुधीर देसाई यांना वरील प्रश्नाबाबत विचारणा केली असता प्रत्येक प्रश्नाची योग्य व समाधानकारक अशी उत्तरे दिली जातील.. असे भ्रमणध्वनीवरून बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.