आजरा शहरातील १ तारखेपासून कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार.- माजी नगरसेवक अशोक चराटी.
( प्रलंबित विकास कामासह अनेक प्रश्नावर पत्रकार परिषदेत चर्चा.- आजरा नगरपंचायतीच्या माजी नगरसेवकांची पत्रकार परिषद )
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा नगरपंचायतच्या कार्यकालात नगरसेवक दोन वेगवेगळ्या आघाडीतील निवडून आले असले तरी नगरपंचायतचा कारभार एक मुखाने एकत्रितपणे करून जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पक्षाच्या नगरसेवकाकडून केला आहे. प्रामुख्याने आजरा शहरातील कचरा का? उचलला जात नाही याबाबत दि. २२ रोजी आजरा नगरपंचायतचे माजी नगरसेवक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी नगरसेवक अशोक चराटी बोलत होते.
पुढे बोलताना श्री चराटी म्हणाले सद्यस्थितीत आजरा नगरपंचायत चे कचऱ्याचे टेंडर संपल्यामुळे ठीक ठिकाणी कचरा पडला आहे. येणाऱ्या १ तारखेपासून कचरा उचलण्याची टेंडर सुरू होत असून आजरा शहरात पूर्वीसारखी स्वच्छता दिसेल कचऱ्याचे टेंडर संपले होते. यामध्ये लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपल्यानंतर कचऱ्याचा निधी शासन देत नाही यामुळे कचरा उठवण्याचे कामकाज बंद पडले परंतु ते कामकाज आता पुन्हा नाविन्यपूर्ण योजनेतून यासाठी पैसे उपलब्ध केले आहेत. यामध्येच नगरपंचायत च्या अठरा कर्मचाऱ्यांची बदली झाली. तसेच घनकचरा डेपो मंजुरीसाठी चाळीस लाख मंजूर झाले आहेत. शहरातील नागरिकांच्या गरज आहेत त्या जवळपास पूर्ण होताना दिसत आहेत.

विकास कामे करण्यासाठी नगरविकास जवळपास शंभर कोटीचा निधी आला आहे. यामध्ये गंगामाई वाचन मंदिर पाच कोटी बाजार मैदानासाठी ७० कोटी यामध्ये ३० कोटी आले असून पाण्याची स्कीम अंतिम टप्प्यात आहे ती स्कुटी मंजूर केले होते पावसामुळे काही काम शिल्लक आहेत. तसेच पूर्वी सीडी पार्क या ठिकाणी तलाव होता यासाठी २ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. १ कोटी ७५ लाख रुपये आले आहेत. तसेच सात ठिकाणी व्यायाम शाळेचे साहित्य व गार्डन आंबेडकर भवनच्या कामाची सुरुवात तसेच नवीन नगरपंचायत बांधकामाला १० कोटी यामुळे आजरा शहरात कचरा, रस्ते, शुद्ध फिल्टर पाणी व चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळण्यासाठी सर्व नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीने काम केले आहे. अशी माहिती झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, संभाजी पाटील, किरण कांबळे आदी नगरसेवक उपस्थित होते.
