Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रसंवेदना फाऊंडेशने गणेशचतुर्थी निमित्त केले पर्यावरण पूर्वक उपक्रम.

संवेदना फाऊंडेशने गणेशचतुर्थी निमित्त केले पर्यावरण पूर्वक उपक्रम.

संवेदना फाऊंडेशने गणेशचतुर्थी निमित्त केले पर्यावरण पूर्वक उपक्रम.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील संवेदना फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने गणेशचतुर्थीच्या शुभमूहूर्तावर आजरा तालुक्यातील गवसे, किटवडे व धनगरवाडा येथील शाळांमध्ये सौरऊर्जा पॅनल्सचे वितरण करण्यात आले.

मायकलमॅन प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने या “संवेदना उर्जा – सोलर स्कूल प्रकल्प” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सौरऊर्जा ही स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन ऊर्जा स्त्रोत असून, अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये सातत्याने वीजपुरवठा होण्यासाठी हा प्रकल्प मोलाचा ठरला आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात सातत्य राखता येईल, ज्यामुळे त्यांचा शैक्षणिक विकास सुनिश्चित होणार आहे. संवेदना फाऊंडेशनने ग्रामीण भागातील शाळांना शाश्वत ऊर्जेच्या साधनांचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले. तसेच १५ सप्टेंबर रोजी हारूर येथे संवेदना फाऊंडेशन आणि होस्टिन सर्विसेसच्या सहकार्याने एक भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गणेशचतुर्थीचे औचित्य साधून या कार्यक्रमात ५८० फळझाडांची लागवड करण्यात आली.

या उपक्रमाने परिसरातील पर्यावरण संवर्धनासह स्थानिकांना भविष्यातील आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या फलोद्यान निर्मिती उपक्रमाने हरितक्रांतीला नवी दिशा दिली असून, हारूरमधील शाळांचे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. वृक्ष दिंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले. संवेदना फाऊंडेशनच्या निसर्गमित्र टीमचे प्रमुख गिरीधर रेडेकर यांनी पर्यावरण संवर्धनासह आर्थिक सक्षमीकरण हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर विद्यामंदिर कोळींद्रे येथे ‘संवेदना मेडलाईन ग्लोबल स्कूल’ प्रकल्पांतर्गत आजरा तालुक्यातील ९ शाळांमध्ये ८० लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात मेडलाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एचओडी कृष्णा पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संगणकीय ज्ञानाची गरज व्यक्त केली. यावेळी संवेदना फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष पी. एस. मोहिते यांनी या प्रकल्पात स्थानिक संगणक तज्ज्ञ आणि शिक्षकांनी योगदान देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी या लॅपटॉपचा प्रभावी वापर करून आपली प्रगती साधावी, अशी अपेक्षा व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आयोजित या उपक्रमांमुळे संवेदना फाऊंडेशनने पर्यावरण, शिक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यामुळे सामाजिक विकासाची नवी दिशा निर्माण झाली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील नागरिकांच्या मध्ये समाधान व्यक्त होत आहे. या उपक्रमात संवेदना फाउंडेशन च्या सर्व सदस्यांचा सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.