Homeकोंकण - ठाणेबीडमध्ये कंटेनर-कारचा भीषण अपघात.- चौघांचा जागीच मृत्यू.🟥मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी.- मुंबई कस्टमकडून...

बीडमध्ये कंटेनर-कारचा भीषण अपघात.- चौघांचा जागीच मृत्यू.🟥मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी.- मुंबई कस्टमकडून ३ प्रवाशांना अटक.- ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त.🛑टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला.- भीषण अपघातात ६ शिक्षकांसह १२ जण जागीच ठार.

🟥बीडमध्ये कंटेनर-कारचा भीषण अपघात.- चौघांचा जागीच मृत्यू.
🟥मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी.- मुंबई कस्टमकडून ३ प्रवाशांना अटक.- ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त.
🛑टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला.- भीषण अपघातात ६ शिक्षकांसह १२ जण जागीच ठार.

बीड :- प्रतिनिधी.

बीडमध्ये आज रविवारी कंटेनर-कारचा भीषण अपघात झाला आहे. पावसामुळे समोरील कांटेनर न दिसल्याने स्विफ्ट कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

🟥हा अपघात अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ झाला. मृत सर्व लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील रहिवासी आहेत. या घटनेत स्विफ्टकारचा चक्काचूर झाला आहे. मृतांची नावे समजू शकली नाहीत. शनिवारी रात्री उशीरा जगलपूर येथील चौघेजण स्विफ्ट कार मधून (एमएच २४ एएस ६३३४) औरंगाबादला जात होते. बीड येथे शनिवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला.

Oplus_131072

त्यांची कार अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्ग्याजवळ आली असता, पावसामुळे समोरून येणाऱ्या कंटेनरचा अंदाज चालकाला आला नाही यामुळे कार आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. ही धडक ऐवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. तर कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गाडीतून सर्व मृतदेह बाहेर काढले. तसेच हे मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

🟥मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी.- मुंबई कस्टमकडून ३ प्रवाशांना अटक.- ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त.

मुंबई :- प्रतिनिधी.

मुंबईत सोने आणि हिऱ्यांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. काल रात्री मुंबई कस्टमने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण 2.286 किलो सोने आणि हिरे जप्त केले, ज्याची किंमत अंदाजे 1.58 कोटी रुपये (सोन्याचे मूल्य) आणि 1.54 कोटी रुपये हिऱ्यांची किंमत आहे. याप्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 3.12 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

🟥पहिल्या प्रकरणात, दुबईहून मुंबईत येणाऱ्या एका संशयीत प्रवाशाला थांबवण्यात आले आणि त्याच्याकडून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. ज्यात 24 कॅरेट सोन्याचे 12 बार (एकूण वजन 1400 ग्रॅम), अंदाजे किंमत 97,00,236 रुपये आहे. हे सोने प्रवाशाने पॅन्टच्या बेल्टजवळ लपवले होते. चौकशीदरम्यान प्रवाशाने सांगितले की, हे कृत्य त्याच फ्लाईटमधून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाच्या सांगण्यावरून केले आहे. सहप्रवाशानेही आपल्या निवेदनात हे मान्य केले. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

🔴दुसऱ्या प्रकरणात, हाँगकाँगहून मुंबईकडे येणाऱ्या एका प्रवाशाला थांबवून त्याच्याकडून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. ज्यामध्ये दोन 24 कॅरेट सोन्याच्या बांगड्या (एकूण वजन 886 ग्रॅम, किमतीचे 61,38,864 रुपये), रोलेक्स घड्याळ (13,70,520 रुपये किमतीचे) होते. तर 1,54,18,575 रुपये किमतीचे हिरे जप्त करण्यात आले. सोने, रोलेक्स घड्याळ प्रवाशाने परिधान केले होते, तर हिरे प्रवाशाने परिधान केलेल्या बनियानच्या आत एका विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवले होते. याप्रकरणी त्या प्रवाशाला अटकही करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास सुरू केला आहे.

🛑टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला.- भीषण अपघातात ६ शिक्षकांसह १२ जण जागीच ठार

🟥मेळघाटच्या घाटवळणाच्या रस्त्यांवर झाला बसचा भीषण अपघात

धारणी :- वार्ताहर

Oplus_131072

तालुक्यातील सेमाडोह गावाजवळ नाल्यात ओव्हर स्पीड खासगी ट्रॅव्हल्स बस उलटल्याने १२ जण ठार झाले. सहा शिक्षकांचा समावेश आहे. त्यापैकी चार शिक्षक महिला आहेत. मेळघाटातील विविध शाळांमध्ये कार्यरत हे शिक्षक सोमवारी सकाळी शाळेच्या वेळेवर हजर होण्यासाठी या खाजगी बस मधून प्रवास करीत होते.
🔴अमरावतीहून सकाळी सव्वा पाच वाजता निघणारी चावला कंपनीची ही बस अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचली. तेथून पुढे धारणीचा टायमिंग कव्हर करण्यासाठी मेळघाटच्या घाटवळणाच्या रस्त्यांवर बस चालकाने अतिशय वेगाने पुढे नेली. आठच्या सुमारास ती बस सेंमाडोह गावाजवळील नाल्यात कोसळली. त्यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले राजेंद्र पाल बाबू यांच्यासुद्धा मृतकांमध्ये समावेश आहे. मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. जखमींवर धारणी तसेच परतवाडा येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.