💥अंधश्रद्धेला चपराक.
🛑घाटातील जंगलात असलेला मृतदेह सावंतवाडीतील तरुणाच्या स्वप्नात यायचा.- स्वप्न सत्यात उतरतात तेव्हा…घटनास्थळी गेल्यावर कुजलेला मृतदेह व मानवी कवटी.- पोलीसही चक्रावले…पहा.. हा काय आहे प्रकार..
खेड :- प्रतिनिधी.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील भोस्ते घाटात पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील तरुणाच्या स्वप्नात जात होता. मृत व्यक्ती स्वप्नामध्ये जाऊन तरुणाकडे मदतीसाठी याचना करत होती. दररोज स्वप्न पडत असल्याने तरुणाने खेड पोलीस ठाणे गाठले व सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. अशी नोंद खेड पोलीसांच्या एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.
🟥मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाटाच्या जंगलात बुधवारी मानवी कवटी तसेच कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीसांच्या एफआयआरमधील नोंदीप्रमाणे भोस्ते घाटात पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह अनेक किमी लांब असलेल्या सावंतवाडीतील तरुणाच्या स्वप्नात जात होता. मृत व्यक्ती स्वप्नामध्ये जाऊन तरुणाकडे मदतीसाठी याचना करत होती. दररोज स्वप्न पडत असल्याने तरुणाने खेड पोलीस ठाणे गाठले व सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर समोरचे दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. तरुणाला पडलेल्या स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या ठरल्या होत्या. भोस्ते घाटामध्ये निर्जन ठिकाणी पोलिसांना कुजलेला मृतदेह सापडला.
🔴तरुणाकडून घटनेची माहिती मिळतात खेड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी रस्त्याजवळच जंगलात मानवी कवटी आढळून आली व काही अंतरावर कुजलेला मृतदेह आढळला. जंगलात एका झाडाला दोरी लटकल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. घटनास्थळी पोलिसांना एक बॅग आणि रेनकोटही सापडला आहे. मात्र या ठिकाणी सापडलेला मृतदेह कोणाचा आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नसून हा सापळा एका पुरुषाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. भोस्ते घाटात हा मृतदेह सापडण्याचं विचित्र कारणही समोर आलं आहे. योगेश पिंपळ आर्या या ३० वर्षीय तरुणाच्या स्वप्नात डोंगरात निर्जन ठिकाणी असलेला मृतदेह दिसला होता. योगेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या आजगाव येथे राहतो. योगेशने पोलिसांना सांगितले की, आपल्याला वारंवार हेच स्वप्न पडत आहे. त्यानं सांगितले की, खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचा मृतदेह असून तो माझ्या स्वप्नात येऊन मदतीसाठी याचना करत आहे.
🅾️सुरुवातीला पोलिसांना तरुणाच्या दाव्यावर विश्वास बसला नाही. मात्र काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी खेड पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला. मात्र योगेशच्या स्वप्नात आलेल्या ठिकाणीच पोलिसांना मानवी कवटी आढळून आली. यानंतर पोलिसांनी दुर्गम डोंगराळ भागात शोध घेतला तेव्हा त्यांना कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहही सापडला. मृतदेह सापडलेला भाग योगेश आर्या राहतो त्या आजगावपासून अनेक किमी दूर अंतरावर आहे. मात्र योगेशने आपल्या स्वप्नाबाबत जे सांगितलं ते हुबेहुब घाटात दिसलं. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांसह पोलीसही अचंबित झाले. जंगलातील एका झाडाला दोरी आढळल्याने मृत व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. मात्र हा मृतदेह नेमका कुणाचा आणि हा घातपात की आत्महत्या? याचा तपास पोलीस करत आहेत.