Homeकोंकण - ठाणेबचत गटांमध्ये निर्माण केलेल्या वस्तूंसाठी 'शाश्वत आशी बाजारपेठ' निर्माण करून देणार.- ....

बचत गटांमध्ये निर्माण केलेल्या वस्तूंसाठी ‘शाश्वत आशी बाजारपेठ’ निर्माण करून देणार.- . सौ.‌मनिषाताई खोराटे(💥मांडेदुर्ग येथे गणेश चतुर्थी निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न..)🟥वादग्रस्त वक्तव्य टाळा. – उपमुख्यमंत्री.- देवेंद्र फडणवीस यांचा नितेश राणेंना सल्ला!🟥 नाणीज येथे डंपर – मोटारसायकलचा भीषण अपघात.- काका-पुतण्याचा मृत्यू..

🛑बचत गटांमध्ये निर्माण केलेल्या वस्तूंसाठी ‘शाश्वत आशी बाजारपेठ’ निर्माण करून देणार.- . सौ. मनिषाताई खोराटे
(💥मांडेदुर्ग येथे गणेश चतुर्थी निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न..)
🟥वादग्रस्त वक्तव्य टाळा. – उपमुख्यमंत्री.- देवेंद्र फडणवीस यांचा नितेश राणेंना सल्ला!
🟥 नाणीज येथे डंपर – मोटारसायकलचा भीषण अपघात.- काका-पुतण्याचा मृत्यू..

चंदगड.- प्रतिनिधी.

Oplus_131072

चंदगड मांडेदुर्ग येथील गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रथमच हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या ऐतिहासिक प्रसंगाने चंदगड तालुक्यातील महिलांसाठी एक आनंददायक कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात अथर्व – दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या सुविद्य पत्नी सौ. मनिषाताई खोराटे, व पृथ्वीराज खोराटे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सांचीताई खोराटे, तसेच ॲड. संतोष मळविकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. संज्योतीताई मळविकर यांची प्रमुख उपस्थित होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पुजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात स्वागत व प्रास्ताविक करताना सौ. मनिषाताई खोराटे यांनी उपस्थित महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी सांगितले की, बचत गटांमध्ये निर्माण केलेल्या वस्तूंसाठी ‘शाश्वत आशी बाजारपेठ’ निर्माण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. या पद्धतीने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक मंच उपलब्ध होईल. याशिवाय, भविष्यात चंदगड तालुक्यात एक सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आणि उच्च दर्जाचे कॉलेज स्थापन करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने ते कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सौ. खोराटे यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले की, त्यांनी उद्योजक श्री. खोराटे साहेबांचे हात बळकट करून तालुक्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्नशील रहावे. त्यांच्या या प्रेरणादायक भाषणामुळे महिलांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली.
यावेळी सौ. ज्योत्स्ना मोरे, सौ. सुमन बेनके, सौ. सुवर्णा भोगण, सौ. रंजना पाटील, सौ. रेखा नांगणूर्कर, सौ. स्मिता नौकुडकर, सौ. सुधा पाटील, सौ. लक्ष्मी दस्के, सौ. गायत्री पाटील, सौ. मंगल शिंदे, सौ. रेणुका तक्केकर, सौ. शितल कांबळे, सौ. अनिता पाटील, सौ. पौर्णिमा धामणेकर, सौ. पूजा पाटील, सौ. पूजा पवार, सौ. राणी पाटील, सौ. सुरेखा पाटील आणि कृष्णा पाटील यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या अंतर्गत महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. सामूहिक सहभागाने कार्यक्रमाने उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. हळदी कुंकवाच्या या कार्यक्रमामुळे मांडेदुर्गच्या सामाजिक एकतेला वाव मिळाला आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे आणि महिलांच्या सामूहिक सहभागामुळे, मांडेदुर्गच्या समाजात एक नवीन ऊर्जा आणि एकजूट आणण्याचे कार्य यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.

🟥वादग्रस्त वक्तव्य टाळा. – उपमुख्यमंत्री.- देवेंद्र फडणवीस यांचा नितेश राणेंना सल्ला!

नागपूर – प्रतिनिधी.

भाजप आमदार नितेश राणे हिंदुत्ववादी आहेत.. त्यांच्या वक्तव्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो, नारायण राणे आणि मी त्यांच्याशी चर्चा केली असून त्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
🟥उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्या विशिष्ट धर्माच्या विरोधी वक्तव्यामुळे चर्चेत आहे. विविध संघटनांनी नितेश राणे यांचा निषेधही केला आहे. बुलढाणाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नितेश राणे यांचे याबाबत कान टोचले. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले, नितेश राणे यांच्याशी त्याचेवडील नारायण राणे आणि मी सुद्धा बोललेलो आहे. त्यांना असे वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला आहे. यापुढे ते कळजी घेतील.
🔴विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अभ्यास करून बोलले पाहिजे. उद्योग बाहेर गेला नाही, असा त्या कंपनीनेच खुलासा केला आहे. त्यामुळे ते तोंडावर पडले आहे. बातमी आली म्हणून लगेच माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची, हे आता त्यांनी बंद केले पाहिजे. कुठलीही माहिती न घेता , केवळ वर्तमान पत्राच्या बातमीवर वक्तव्य करणे योग्य नाही असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला.
🅾️पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी सुद्धा दौऱ्यावर आलेले आहे. विश्वकर्मा योजनेचे संमेलन वर्ध्यात होत आहे.यानंतर सुद्धा अनेक दौरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात होतील. असेही फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कोणाकडे तक्रार केली याबद्दल माहिती नाही असेही फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेसाठी आधीच अर्थसंकल्पात तरतुद केली आहे. त्यासाठी कोणत्याही योजनेला धक्का लावला नाही आणि तडजोड केली नाही असेही फडणवीस म्हणाले.

🟥 नाणीज येथे डंपर – मोटारसायकलचा भीषण अपघात.- काका-पुतण्याचा मृत्यू

पाली :- प्रतिनिधी.

Oplus_131072

मिऱ्या-नागपूर महामार्गावरील नाणीज जुन्या मठाजवळ आज गुरूवारी सकाळी डंपर-मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने नाणीज परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. डंपरने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
🔴या अपघाताबाबत पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून वेल्डींगच्या कामासाठी नाणीज येथून पालीच्या दिशेने दुचाकी क्र.एम एच ०८ ए एम ४९०३ घेऊन अरुण अनंत दरडी (३५) व रामचंद्र देवजी दरडी (६५ दोघेही रा. दरडीवाडी, नाणीज) हे दोघेजण वेल्डींगच्या कामासाठी खानू येथे दुचाकीवरुन येत असताना नाणीज जुन्या मठाजवळ पाठीमागून येणार्‍या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हे दोघे महामार्गावर पडून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून ते मृत झाल्याचे सांगितले. अरुण दरडी याच्यावर जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात तर रामचंद्र दरडी यांचे पाली ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले.
🟣अरुण हा तरुण व्यवसायिक असल्याने त्याचा मोठा संपर्क होता. बघता बघता ही घटना पंचक्रोशीत पसरली आणि अनेकांनी नाणीजकडे धाव घेतली. हे दोघे दरडीवाडी नाणीज येथील राहणारे असून अरुण दरडी हा तरुण वेल्डींगचे काम करतो. आपल्या हाताखाली त्याने चुलते रामचंद्र देवजी दरडी यांना कामासाठी ठेवले होते. अरुण दरडी यांच्या मागे वडील, भाऊ असा परिवार असून रामचंद्र दरडी यांच्या मागे पत्नी, मुले असा मोठा परिवार आहे. अपघातानंतर घटनास्थळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पाली पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, संतोष कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल सूर्याजी पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ऐन. ऐन. कदम हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.