Homeकोंकण - ठाणेदिल्लीचा नव्या मुख्यमंत्री म्हणून कारभार आतिशी यांच्या हाती.- 'या' १६ महिला मुख्यमंत्र्यांनी...

दिल्लीचा नव्या मुख्यमंत्री म्हणून कारभार आतिशी यांच्या हाती.- ‘या’ १६ महिला मुख्यमंत्र्यांनी केलंय विविध राज्यांचं नेतृत्व!🟥गणेश विसर्जन मिरवणुकीत भन्नाट डान्स.- घरी परतल्यावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू.

🟥दिल्लीचा नव्या मुख्यमंत्री म्हणून कारभार आतिशी यांच्या हाती.- ‘या’ १६ महिला मुख्यमंत्र्यांनी केलंय विविध राज्यांचं नेतृत्व!
🟥गणेश विसर्जन मिरवणुकीत भन्नाट डान्स.- घरी परतल्यावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू
.

नवी दिल्ली – वृत्तसंस्था.

दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांची आम आदमी पार्टीने एकमुखाने निवड केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली होती. या पदासाठी आता आतिशी यांचं नाव निश्चित झालं आहे. आतिशी यांच्या नावाची घोषणा होताच आप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवाल यांनी आज (१७ सप्टेंबर रोजी) उपराज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

🔴आतिशी या आम आदमी पार्टीमधील वरच्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. तसेच त्या अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. माजी उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर केजरीवाल यांनी शिक्षण मंत्रालयासह सिसोदिया यांच्याकडील खाती व इतर महत्त्वाची खाती आतिशी यांच्याकडे सोपवली होती. आतिशी या कालकाजी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.

आतिशी यांच्याआधी भाजपाच्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी दिल्लीचं नेतृत्त्व केलं आहे. तसेच इतरही अनेक राज्यांचा कारभार महिला मुख्यमंत्र्यांनी सांभाळला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी या देशातील १६ व्या महिला मुख्यमंत्री ठरतील.

🛑देशातील महिला मुख्यमंत्र्यांची नावं

🔺सुचेता कृपलानी (काँग्रेस) उत्तर प्रदेश
🔺नंदिनी सेतूपती (काँग्रेस) ओडिशा
🔺शशिकला काकोडकर गोवा (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
🔺अन्वरा तैमूर (आसाम) काँग्रेस
🔺व्ही. एन. जानकी (तामिळनाडू) अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कझगम
🔺जे. जयललिता (तामिळनाडू) अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कझगम
🔺मायावती (उत्तर प्रदेश) बहुजन समाज पार्टी
🔺राजिंदर कौर भट्टल (पंजाब) काँग्रेस
🔺राबडीदेवी (बिहार) राष्ट्रीय जनता दल
🔺सुषमा स्वराज (दिल्ली) भाजपा
🔺शीला दीक्षित (दिल्ली)➖ काँग्रेस
🔺उमा भारती (मध्य प्रदेश)भाजपा
🔺वसुंधरा राजे (राजस्थान) काँग्रेस
🔺ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस
🔺आनंदीबेन पटेल (गुजरात) भाजपा
🔺महबुबा मुफ्ती (जम्मू काश्मीर) जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी.
🔺आतिशी (दिल्ली) आम आदमी पार्टी

🟥गणेश विसर्जन मिरवणुकीत भन्नाट डान्स.- घरी परतल्यावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

अहमदनगर :- प्रतिनिधी

एकीकडे आज देशभरात लाडक्या गणपती बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला जात आहे. तर दुसरीकडे अहमदनगर येथील पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मोरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल दुपारी तोफखाना पोलीस स्टेशनच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत त्यांनी डान्स केला होता. मिरवणूक संपून घरी जाताच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
🟥याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे हे अहमदनगर पोलीस दलात कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काल तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता. दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत ज्ञानेश्वर मोरे यांनी मराठी चित्रपटाच्या गाण्यावर भन्नाट डान्स करत सर्वांची वाहवा मिळवली होती. गणपती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर ते आपल्या घरी गेले. घरी गेल्यावर ज्ञानेश्वर मोरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.