Homeकोंकण - ठाणेपुणे कात्रज येथे आप ने पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला

पुणे कात्रज येथे आप ने पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला

पुणे – कात्रज येथे आप ने पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला

पुणे कात्रज चौकामध्ये अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. ते बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी पेढे वाटप करून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम नौशाद अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आला होता. आम अदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रशांत कांबळे त्यावेळेस म्हणाले. आपके सर्वोच्च नेते माननीय अरविंदजी केजरीवाल यांना कुठलाही पुरावा नसताना 22 महिने अटक करून तिहारी जेलमध्ये ठेवण्यात आले होते. केजरीवाल यांच्या जामिनाचा निर्णय सुनावताना खंडपीठातील न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी सीबीआयवर कडक ताशेरे ओढले. ‘ईडी’च्या प्रकरणामध्ये केजरीवालांना जामीन मिळाला असतानाही त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने ‘सीबीआय’ने ही कारवाई केली, असे निरीक्षण नोंदवले ‘केजरीवाल यांना ‘सीबीआयने पिंजऱ्यातील पोपट असल्यासारखे वागू नये’ असा टोलाही न्यायमूर्ती भुयान यांनी लगावला. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहच वातावरण तयार झालं आहे. दिल्ली पंजाब सारख्या सुविधा आज पुणे मध्ये सुद्धा नागरिकांना मिळतील असा विश्वास त्यावेळेस देण्यात आला त्यावेळी कार्यकर्ते निखिल खंदारे युवा उपाध्यक्ष, निलेश वांजळे शहर उपाध्यक्ष, कुमार धोंगडे सहसचिव अजिंक्य जगदाळे, सुभाष करांडे,शंकर पोटघन, गजानन भोसले, गणेश परदेशी यदि नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.