Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवि. म.‌ मुमेवाडी ता. आजरा प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

वि. म.‌ मुमेवाडी ता. आजरा प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

वि. म.‌ मुमेवाडी ता. आजरा प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

मुमेवाडी ता. आजरा येथील प्राथमिक शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैभव कांबळे होते. तालुक्यातील प्राथमिक शाळेत पहिलाच उपक्रम राबवत या शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कु. प्रांजल विजय सावेकर या विद्यार्थिनीला पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्व माता पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. प्राथमिक शाळेमध्ये जर काही बदल घडवायचा असेल तर शिक्षकांच्या बरोबरीने पालकांनी सुद्धा या सर्व प्रकियेमध्ये उत्स्फुर्तपणे आपला सहभाग दिला पाहिजे. आपल्या पाल्याच्या प्रगतीविषयी वेळोवेळी शिक्षकांशी चर्चा केली पाहिजे असे मत अध्यक्ष यांनी मांडले. त्याच बरोबर शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक याच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. व या उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच फायदा होईल असे मत शिक्षकांनी मांडले. यावेळी माजी विद्यार्थी आ. टी बि. पी.कमांडो प्रवीण पाटील यांचा व सर्व शिक्षक व अंगणवाडी सेविका मदतनिस यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष रामदास मोरवाडकर, विद्यार्थी व पालक याची मनोगते झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पुंडपळ सर यांनी केले तर आभार मुख्यध्यापक के. टी. गुरव सर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.