Homeकोंकण - ठाणेशिक्षण विभागाचा मोठा निर्णय!कमी पटसंख्येच्या शाळांवर आता कंत्राटी शिक्षक.- निवृत्त शिक्षकासह डीएड,...

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!कमी पटसंख्येच्या शाळांवर आता कंत्राटी शिक्षक.- निवृत्त शिक्षकासह डीएड, बीएड उत्तीर्ण तरुणांनाही संधी.- दरमहा 15000 मानधन!🟥मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे.- सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची कबुली!🟥विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन.-या चार दिग्गज नेत्यांवर सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी?🟥मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलायमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड यांचे पत्रकारांच्या प्रश्नाला मिश्किल उत्तर.

🛑शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!कमी पटसंख्येच्या शाळांवर आता कंत्राटी शिक्षक.- निवृत्त शिक्षकासह डीएड, बीएड उत्तीर्ण तरुणांनाही संधी.- दरमहा 15000 मानधन!
🟥मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे.- सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची कबुली!
🟥विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन.-या चार दिग्गज नेत्यांवर सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी?
🟥मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड यांचे पत्रकारांच्या प्रश्नाला मिश्किल उत्तर.

मुंबई – प्रतिनिधी

राज्यातील जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांचा पट २० किंवा त्याहून कमी आहे, त्या शाळांमध्ये आता सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड, बीएड उत्तीर्ण बेरोजगार तरूण-तरूणींना शिक्षक म्हणून संधी मिळणार आहे. त्यांना दरमहा १५ हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरूवारी घेतला आहे.
🟥कमी पटंसख्येच्या शाळांमध्ये नेमलेल्या कंत्राटी शिक्षकास १२ रजा असतील. याशिवाय त्यांना नियमित शिक्षकांप्रमाणे अध्यापनाचे तास घ्यावे लागतील. त्यांना प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्तीचे आदेश द्यावेत. त्या शिक्षकाच्या कामाचे एक वर्षानंतर मूल्यमापन होईल. त्यात त्याचे काम समाधानकारक नसल्यास त्या कंत्राटी शिक्षकाची सेवा समाप्त केली जाणार आहे. दरम्यान, कंत्राटी शिक्षक मिळाल्याशिवाय त्या शाळांवरील शिक्षकांची बदली केली जाणार नाही. या कंत्राटी शिक्षकांवर केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे नियंत्रण राहील, असेही शासन निर्णयात नमूद आहे.

🟥शासन निर्णयातील ठळक बाबी…

🔺स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांची पटसंख्या २० किंवा त्याहून कमी आहे, त्या शाळांमध्ये मंजूर केलेल्या दोन शिक्षकांपैकी एकजण सेवानिवृत्त किंवा डीएड, बीएड झालेल्या बेरोजगार उमेदवाराची कंत्राटी पद्धतीने निवड करण्यास परवानगी
🔺निवृत्त शिक्षकाचे वय ७० पर्यंत असावे, तो मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेला असावा, त्यांची कोणतीही चौकशी प्रलंबित नसावी.
🔺निवृत्त शिक्षकाची नेमणूक करताना त्यास ज्या गटासाठी घ्यायचे आहे, त्या गटाला सेवाकाळात त्यांनी अध्यापन केलेले असावे
🔺कंत्राटी निवृत्त शिक्षक तीन वर्षांपर्यंत नेमला जावा किंवा त्यांचे वय ७० होईपर्यंतच नियुक्ती करावी, तो शिक्षक शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा.
🔺डीएड, बीएड उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देता येईल, पण त्यास कोणत्याही संवर्गात सेवा समावेशन, सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे अधिकार नसतील.
🔺डीएड, बीएडधारक बेरोजगार उमेदवारास सुरवातीला एकाच वर्षासाठी नेमणूक द्यावी, त्यानंतर योग्यता व गुणवत्तेच्या आधारावर कालावधी वाढविण्याची संधी.

🟥मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे.- सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची कबुली!

मुंबई – प्रतिनिधी.

मुंबई- गोवा महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून करण्यात येत आहे. या कामाचे १० टप्पे असून त्यासाठी वेगवेगळे कंत्राटदार नेमले आहेत. काही चुकीच्या कंत्राटदारांमुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. या महामार्गाचे काम पूर्ण होण्यास अजून किमान दोन वर्षे लागतील अशी कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी येथे दिली.
🔴मुंबई – गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून सार्वनिक बांधकाम विभागावर सर्वच स्तरांतून टीका होत असताना चव्हाण यांनी मात्र या महामार्गाच्या दुरवस्थेस राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण जबाबदार असल्याचे सांगितले. या महामार्गावरील राजापूर ते गोवापर्यंतचा महामार्ग चांगला झाला असून संगमेश्वर ते राजापूर दरम्यानचे काम रखडले आहे. या महामार्गावर छोटे-मोठे १४ पूल आहेत. तसेच या रस्त्याला अनेक सेवा रस्ते आहेत. यामुळेच कामाला विलंब होत आहे
.

🟥कंत्राटदार जबाबदार

या रस्त्याचे काम करणाऱ्या काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले. या ठिकाणी दुसरे कंत्राटदार नेमण्यात आले. मात्र त्यांनीही काम केले नाही. उपठेकेदार काम करत नसल्याने हा गोंधळ झाला आहे. तसेच या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे अधिकार राज्याच्या बांधकाम विभागाला नाहीत. केवळ देखरेख करण्याची जबाबदारी आहे. तरीही लवकर हे काम पूर्ण करून घेतले जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

🟥विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन.-या चार दिग्गज नेत्यांवर सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी?

मुंबई :- प्रतिनिधी

भाजपच्या गोटातून एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. आगामी विधानासभेच्या अनुषंगाने भाजपचं मेगा प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. भाजपच्या वतीने पक्षातील चार दिग्गज नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे या चार नेत्यांवर विधानसभेसाठीची महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
🛑दरम्यान, येत्या आठवड्याभरात 20 स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार आहेत. तर अशोक चव्हाण, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा देखील या समितीत समावेश असणार आहे. तर दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विशेष प्रचारक म्हणून एक महिना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचेही बोलले जात आहे.
🔴काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप प्रणित आघाड्यांची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची 30 जागांवर सरशी झाली आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले असल्याचेही बघायला मिळाले आहे.
🟥कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिला तर कदाचित महायुतीची सत्ता जाणे अटळ असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भातील भाजपची बऱ्यापैकी पकड असलेल्या मतदारसंघातही महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी असे महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विदर्भासह राज्यातील सर्व जागांवर भाजपकडून विशेष मंथन करण्यात येत असून त्या अनुषंगाने भाजप तयारीला लागले आहे.

🟥मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड यांचे पत्रकारांच्या प्रश्नाला मिश्किल उत्तर.

मुंबई :- प्रतिनिधी.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या घरातील गणरायाचे दर्शन यावेळी घेतले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी या भेटीबद्दल प्रश्न विचारला असता, जितेंद्र आव्हाड यांनी मिश्किल उत्तर दिले आहे. मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत त्यांनी याविषयी अधिक बोलणे टाळले आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या घरी येऊन गणपतीचं दर्शन घेतलं, नंतर यायला मला मिळत नाही आणि नंतर ते ही भेटत नाहीत, म्हणून आत्ता मी आल्याचेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
🔴एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातून आपल्या राजकारणाची सुरूवात केली. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून राजकारणात होते. तर जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ठाण्यात राजकारण करत होते. दोन्ही नेते दोन टोकाच्या विचारसरणीचे. ठाण्यात या दोघांचाही तसा दबदबा आहे. या दोघांचा राजकीय विरोध तर टोकाचा आहे. एकनाथ शिंदे हे सध्या मुख्यमंत्री आहेत. तर जितेंद्र आव्हाडांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. आपल्या मतदार संघातही हे दोघे मजबूत आहेत. त्यांचा जनाधारही मोठा आहे.
🟥जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री हे एकाच जिल्ह्यात राहात असून त्यांच्यात चांगली मैत्री असल्याचे सर्वश्रुत आहे. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एकनाथ शिंदेयांच्याशी माझी मैत्री तर आहेच. हे मी कधीही नाकारलंच नाही, फक्त मुख्यमंत्री झाल्यामुळे भेटीगाठी कमी झाल्या आहेत, त्यांचे मित्र अधिक वाढलेत, त्यामुळे या मित्राला वेळ द्यायला त्यांना कमी वेळ मिळतो, असा मिश्किल टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. आज गणेशोत्सव निमित्त आलो होतो माहिती घेतली ते येणार होते, मी आलो. भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा कशी होणार त्यांच्या घरी गर्दी खूप होती. आमचे वैचारिक मतभेद आहेत पण मैत्री आहे. आमची मैत्री आहे. असंही आव्हाड म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.