श्री गणरायाचे आगमन – पावसानं दिली विश्रांती आजरा तालुक्यात गणरायाचं उत्साह आगमन… गणपती बाप्पा मोरया..
आजरा.- प्रतिनिधी.

मागील पंधरवड्यात मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपलं होतं नद्या पात्रा बाहेर तर बंधारे पाण्याखाली गेले होते धरणे शंभर टक्के भरली पण काही काळ पावसाने विश्रांती दिली परंतु एक दोन आठवड्यापासून अचानक येणारा वळवाचा पाऊस या पावसाने आज श्री. गणरायाच्या आगमना दिवशी विश्रांती घेतली आहे. यामध्ये आजरा बाजारपेठ हाऊसफुल आहे. ग्रामीण भागातील व आजरा शहरातील गणेशभक्त विविध श्री. गणेश उत्सव सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसत आहे. आजरा शहरासह, तालुक्यातील ग्रामीण भागात घरगुती बाप्पांचे आगमन होण्यास पहाटेपासून सुरुवात झाली आहे. तर तालुक्यातील विविध मंडळाचे श्री गणपती बाप्पा सायंकाळी चार नंतर सुरुवात होईल.
श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा “शिवा” असेही म्हणले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. २०२४ सालातील श्री गणेश चतुर्थी सन. सुख शांती वैभव प्राप्त होवो… हा सन सर्वांनी पर्यावरण पूर्वक, पारंपारिक वाद्याच्या गजरात शांततेत साजरा करावा.
श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
