सद्यस्थितीत वस्त्रोउद्योग अडचणीत आहे.- येणारा काळ चांगला असेल.- अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख.- अशोक चराटी
( आजरा सूतगिरणीची ४५ वी सभा खेळीमेळीत संपन्न. )
आजरा.- प्रतिनिधी.
सद्यस्थितीत वस्त्रोउद्योग अडचणीत आहे. महाराष्ट्रातील ४०% सूतगिरणी बंद आहेत. फक्त सहा सूतगिरणी वस्त्रोद्योग अडचणीत असताना देखील सुरू आहेत. यामध्ये आजरा सूतगिरण प्रथम क्रमांकावर आहे. परंतु येणारा काळ हा चांगला असेल. असे वक्तव्य आजरा येथील अण्णा – भाऊ आजरा ता. शेतकरी सहकारी सूतगिरण सर्वसाधारण वार्षिक सभेच्या निमित्ताने बोलताना अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीमती अन्नपूर्णा चराटी होत्या. यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.

पुढे बोलताना श्री चराटी म्हणाले. बिनव्याजी ११ कोटी रुपये कर्ज दिले आहे. पण नेते अमित शहा यांच्या माध्यमातून एन सी डी सी मधून कर्ज उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे असे झाले तर महाराष्ट्रातील १६६ सूतगिरण्या सुरू होऊन वस्त्रोद्योगाला गत वैभव प्राप्त होईल. असे बोलताना श्री चराटी म्हणाले

यावेळी मार्गदर्शन करताना व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे म्हणाले. वस्त्रोद्योग हा सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग आहे. परंतु जागतिक मंदीमुळे उद्योग अडचणीत आला आहे. या मंदीच्या काळात वस्त्रोद्योगाला फटका बसला आहे. महावितरण सह आधारभूत किमती वाढल्याने चढ्या भावातून सूत घ्यावे लागते याचाही फटका बसला आहे. खरंतर अण्णाभाऊंनी लोकांच्या हाताला काम मिळावे म्हणून या सूतगिरणीची स्थापना केली. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोरोना काळात देखील आम्ही सूतगिरण चालू ठेवली. व या मंदीतून लवकरच बाहेर पडून वस्त्रउद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू होईल व भविष्यात गतिमान वैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा चालू असल्याचे डॉ. श्री देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना सभासदांना संबोधित केले. सभेची नोटीस वाचन व मंजुरी दत्तात्रय दोरुगडे यांनी केले. तर श्रद्धांजली वाचन संचालक राजु पोतणीस यांनी केले. यावेळी संचालक शंकर टोपले, अविनाश सोनटक्के, कृष्णांत गिरीगोसावी, जयसिंग देसाई, रजनीकांत नाईक, नारायण मुरुकटे, इंजि. जी. एम. पाटील, डॉ. इंद्रजीत देसाई, डॉ.संदिप देशपांडे, गोमती मालूताई शेवाळे, मनिषा कुरुणकर, हसन शेख, अनिकेत चराटी सह अण्णाभाऊ संस्था समूहाचे सर्व संचालक पदाधिकारी, सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक शशिकांत सावंत यांनी मानले. राष्ट्रगीता नंतर वार्षिक सर्वसाधारण सभा संपली असल्याचे जाहीर केले.
चौकट.
४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने.
सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संचालक जी.एम. पाटील यांचा सत्कार.
संचालक डॉ. संदीप देशपांडे यांची कन्या डॉ. साक्षी देशपांडे.- यांचा बॅचलर इन फिजीओथेरपी ट्रीटमेंट मध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल सत्कार.