🛑अण्णा – भाऊ म्हणजे विश्वास.- आजरा अर्बनच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचा कारभार.- संस्था समूह प्रमुख श्री चराटी.
( अहवाल वर्षात बँकेला रु ७ कोटी ७८ लाख ८६ हजार.. इतका कर पूर्वक नफा.- निव्वळ नफा. शिल्लक. ५ कोटी १३ लाख. )
🛑भडगाव ग्रामस्थांच्या बैठकीत अर्थवचे उद्योजक मानसिंग खोराटे यांना पाठींबा.
(💥गोडसाखर कारखाना सुरु करून गडहिंग्लजच्या तालुक्याचा विकासाची गती देखील सुनिश्चित करू )
आजरा.- प्रतिनिधी.

अण्णा – भाऊ म्हणजे एक विश्वास आहे. हा विश्वास कायम ठेवणार आजरा अर्बनच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचा कारभार असल्याचे अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी. दि.४ रोजी दि. आजरा अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लि. आजरा ( मल्टीस्टेट ) या बँकेच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना बोलत होते. चेअरमन रमेश कुरुणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले. पुढे श्री. चराटी म्हणाले अजरा अर्बन ही बँक देशातील ठराविक १०० बँकेमध्ये ही बँक येते भविष्यात आम्ही जवळपास जाण्याचा प्रयत्न करत आहोत. बँकेच्या अन्य ठिकाणी शाखा ज्या होत आहेत. त्या शाखा लोकांच्या सभासदांच्या व येथील स्थानिक रहिवासी यांच्या मागणीनुसार होत आहेत. चांगली संस्था आहे. चांगल्या कारभाराला सभासदांनी मदत केल्यास संस्था उभारी घेईल. व चांगली संस्था चालत असताना अडचणी आणण्याचा प्रयत्न केल्यास तर संस्था अडचणीत येऊ शकते यासाठी सभासदानी देखील संस्थेचा हिताचा विचार करावा. असे श्री चराटी बोलताना म्हणाले.
सभा नोटीस, विषय पत्रिका वाचन व सभासदांच्या लेखी प्रश्नांची उत्तरे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी दिली. चेअरमन कुरुणकर यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना संस्थेच्या वाटचालीचा आढावा दिला. आर्थिक वर्ष २०२३/२४ मध्ये स्थिर व्याजदरामुळे आर्थिक विकासाला चालना व महागाई व नियंत्रण या दोन्ही घटकांमध्ये संतुलन राखण्यात भारतीय रिझर्व बँकेला यश आले आहे. भारतीय अर्थव्यवस्था सलग तिसऱ्या वर्षी सात टक्क्याहून अधिक वाढीचा दर राखत आर्थिक वर्ष २३/२४ मध्ये ८.२% इतकी वाढ नोंदवली ही वाढ प्रामुख्याने उत्पादन औद्योगिक क्षेत्रातील पोलाद सिमेंट व ऑटोमोबाईल या क्षेत्राच्या मजबूत कामगिरीमुळे झाली प्रतिकूल परिस्थितीत कृषी क्षेत्राच्या उत्पादनात झालेली घट असतानाही भारताने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान जागतिक नकाशावर कायम राखले आहे.
आजरा अर्बन बँकेचा एकूण व्यवसाय दि. ३१ मार्च २०२३ च्या १३२५. ९० कोटीवरून रु. १९१.६५ कोटीने म्हणजे १४.४६ टक्क्यांनी वाढून दि. ३१ मार्च २०२४ रोजी रु. १५१७.५६ कोटीवर पोहोचला आहे.( अहवाल वर्षात बँकेला रु ७ कोटी ७८ लाख ८६ हजार.७९७ पैसे ५२ इतका कर पूर्वक नफा.- निव्वळ नफा. शिल्लक. ५ कोटी १३ लाख. ३२ हजार १६५ पैसे ५२ इतका नफा.) बँकेचे कामकाज अगदी उत्तम पद्धतीने चालू आहे. सभासदांच्या हिताचा विचार करणारी ही बँक आहे. असे बोलताना चेअरमन श्री. करुणकर म्हणाले.
यावेळी संचालक मंडळाच्या वतीने विशेष सत्कार, व ७५ वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचे अभिष्टचिंतन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी व्हा. चेअरमन सुनील मगदूम, तसेच संचालक विलास नाईक डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, अस्मिता सबनीस, सूर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅ सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे सह मान्यवर सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक विलास नाईक यांनी मांनले

🛑भडगाव ग्रामस्थांच्या बैठकीत अर्थवचे उद्योजक मानसिंग खोराटे यांना पाठींबा.
आजरा.- प्रतिनिधी.

भडगाव ता. गडहिंग्लज येथील ग्रामस्थांच्या आयोजित केलेल्या बैठकीत अर्थव उद्योजक मानसिंग खोराटे यांना आगामी निवडणुकीसाठी पाठींबा देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला घेतला.
दि. ५ रोजी झालेल्या बैठकीत
श्री खोराटे यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गडहिंग्लज, आजरा या विभागाचा चंदगड तालुक्यासह मतदारसंघाचा विकास होण्यासाठी प्रयत्नशील असणार आह. श्री. खोराटे संबोधित करताना बोलत होते. दौलत साखर कारखाण्यामुळे चंदगड तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या विकासाची जशी गती आहे. तशीच हरळी गोडसाखर कारखाना सुरु करून गडहिंग्लजच्या तालुक्याचा विकासाची गती देखील सुनिश्चित करू मुळात आपला जिल्हा शेतीप्रधान आहे. या मतदार संघातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य हा माझ्या कुटुंबाचा सदस्य हा मतदारसंघ म्हणजे माझा परिवार आहे. आणि त्याच्या विकासासाठी मला काहीतरी योगदान देणे आवश्यक आहे. समाजासाठी काहीतरी देणे हे माझे कर्तव्य आहे. बैठकीत उपस्थितांनी श्री. खोराटे यांचे वचनाचे स्वागत करत तुम्ही पुढे व्हा. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. असे भडगाव ग्रामस्थ यांच्या समर्थनामुळे श्री.खोराटे यांना त्यांच्या विकासाच्या योजनांना गती देण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळणार आहे. यावेळी भडगाव ग्रामस्थ बाळगोंडा पाटील, गुरुराज हत्ती, चंद्रशेखर मोळदी रामभाऊ पाटील अमरनाथ घुगरी, काशिनाथ मूर्ती मलगोंडा पाटील शिवाजी पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
