Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रउंबरवाडी (ता. गडहिंग्लज) गावातील नागरिकांनी उद्योजक मानसिंग खोराटे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी दिला...

उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) गावातील नागरिकांनी उद्योजक मानसिंग खोराटे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी दिला जाहीर पाठींबा.🛑मलतवाडी ता. चंदगड गावांमधील नागरिकांनी चंदगड विधानसभेचे शाश्वत नेतृत्व. उद्योजक मानसिंग खोराटे यांना जाहीर पाठिंबा.

🛑उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) गावातील नागरिकांनी उद्योजक मानसिंग खोराटे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी दिला जाहीर पाठींबा.
🛑मलतवाडी ता. चंदगड गावांमधील नागरिकांनी चंदगड विधानसभेचे शाश्वत नेतृत्व. उद्योजक मानसिंग खोराटे यांना जाहीर पाठिंबा.

गडहिंग्लज. प्रतिनिधी.

Oplus_131072

उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) गावातील नागरिकांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी अर्थाव उद्योजक मानसिंग खोराटे यांना जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठींब्यामुळे चंदगड मतदारसंघाच्या विकासासाठी एक सकारात्मक दिशा मिळाल्याचे मानले जात आहे.
श्री.‌खोराटे यांनी या वेळी आपल्या भाषणात चंदगड मतदारसंघाच्या वर्तमान स्थितीवर विचार मांडत . त्यांनी सांगितले की, “चंदगड मतदारसंघ रोजगार निर्मिती, आरोग्य आणि उद्योगधंद्याच्या बाबतीत आजही मागे आहे. हा मतदारसंघ राज्यात एक उधोगधंद्याचे मॉडेल बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये येणाऱ्या समस्यांचे समाधान करणे, मुला-मुलींच्या शिक्षणामध्ये गुणवत्तेची घट रोखणे आणि इतर समस्या सोडवणे हे आपल्या माझे उद्दिष्ट आहे..”
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीच्या सुधारणेसाठी आपल्या अथक प्रयत्नांमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्यामुळे शेतकऱ्यांना न्याय व सन्मान मिळवण्यात मोठा लाभ झाला आहे. त्यांच्या सततच्या प्रयत्नांनी शेतकऱ्यांच्या समस्यांना ठोस समाधान मिळवले आहे, यामुळेच ग्रामस्तांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमास अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. नामदेव कोकितकर, सिद्धाप्पा पाटील, अझरूद्दीन मुल्ला, नितीन पाटील, विलास रेडेकर, आनंदा मनगुतकर, दिलीप घेवडे, बाबू गोरुले, भीमा गोरुले, मौला मुल्ला, गुलाब मुल्ला, इस्माईल मुल्ला, संजय निउगीरे, चंद्रकांत निळवले, भैरू पाटील, सदाशिव पाटील, बाळू चव्हाण, बाबू कोकितकर, सुरेश सोमशेट्टी, विष्णू पोवार, संजय गोरुले, कृष्णा होडगे आदींच्या उपस्थितीत हा पाठींबा जाहीर करण्यात आला.या कार्यक्रमामुळे ग्रामस्थांच्या आशेची लाट वाढली आहे आणि चंदगड मतदारसंघाच्या विकासासाठी एक नवीन चैतन्य मिळाले आहे.

🛑मलतवाडी ता. चंदगड गावांमधील नागरिकांनी चंदगड विधानसभेचे शाश्वत नेतृत्व. उद्योजक मानसिंग खोराटे यांना जाहीर पाठिंबा.

चंदगड.- प्रतिनिधी.

Oplus_131072

चंदगड विधानसभा मतदार संघातील मलतवाडी येथील गावांमधील नागरिकांच्या सोबत अथर्व-दौलत साखर कारखाना कार्यस्थळावर अर्थव उद्योजक मानसिंग खोराटे यांच्यासोबत भेट घेतली चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असल्यामुळे तालुक्यातील कामगार शेतकरी वाहतूकदार यांची झालेली दयनीय अवस्था पाहता मानसिंग खराटे यांनी दौलत कारखाना ३९ वर्षासाठी चालवण्यास घेऊन तालुक्यातील सभासद शेतकरी व तोडणी वाहतूकदार तसेच दौलत परिवाराला गतवैभव प्राप्त करून दिले. असेच चंदगड तालुक्याला विकासाचे वैभव लाभण्यासाठी मलतवाडी मधील गावकऱ्यांनी पाठिंबा दिला. श्री. खोराटे बोलतेवेळी म्हणाले की दौलत वर आज सुद्धा राजकारण चालू आहे म्हणून त्यामुळे शासकीय कामांना अडचणी येत आहेत. म्हणून मी राजकारणात येण्याचा निश्चय केला. व मी राजकारणातून समाजकारण करणार आहे. कारण मी या समाजाच काहीतरी देण लागतोय आपली मतदारसंघाच्या सर्वांगीण शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनाच्या चर्चाद्वारे सर्वांनी एकमताने ठरवले की, विधानसभा निवडणुकीसाठी अर्थव उद्योजक मानसिंग खोराटे यांना जाहीर पाठींबा दिला.


या वेळी शशिकांत रेडेकर नागोजी पाटील नारायण सुंडकर नामदेव पताडे संजय गणपती पाटील परश्याम सातबारा सुंडकर सुबराव रेडेकर बाळू तरवार तुकाराम रेडेकर रजनीकांत पाटील तातोबा रेडेकर मायाप्पा पाटील रामचंद्र पाटील सुधाकर सखनकर सुरेश सखनकर प्रकाश सखनकर आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन व आभार आशु लाड यांनी मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.