Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा परिवहन महामंडळातील बहुसंख्य संघटनांनी दिले आंदोलनाचे निवेदन..( दि.३ रोजी एसटी कामगार...

आजरा परिवहन महामंडळातील बहुसंख्य संघटनांनी दिले आंदोलनाचे निवेदन..( दि.३ रोजी एसटी कामगार सयुक्त कृती समितीने धरणे आंदोलनाचा निर्णय.)🛑आजरा नगरपंचायत क्षेत्रातील विविध प्रश्नावर अन्याय निवारण समितीची बैठक संपन्न.

🛑आजरा परिवहन महामंडळातील बहुसंख्य संघटनांनी दिले आंदोलनाचे निवेदन..( दि.३ रोजी एसटी कामगार सयुक्त कृती समितीने धरणे आंदोलनाचा निर्णय.)
🛑आजरा नगरपंचायत क्षेत्रातील विविध प्रश्नावर अन्याय निवारण समितीची बैठक संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

राज्य परिवहन महामंडळातील बहुसंख्य संघटनांनी आपल्या प्रलंबित आर्थिक व विविध मागण्यांसाठी कृती समिती स्थापन केली आहे. व विविध प्रश्नाबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत यातील
१) राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन
२) मूळ वेतनात मागील काळात झालेली T अनागोंदी दूर करणे
३ ) नवीन जुल्मी शिस्त व आवेदन कार्यपध्दतीमध्ये तातडीने बदल करा !
४ ) घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतनवाढीचा दर यांची थकबाकी तातडीने मिळालीच पाहिजे ..
५) सर्व बसमध्ये कौटोबीक पास मोफत करा.
६) ४८४९ कोटीमधील मधील उर्वरीत रक्कम ताबडतोब वळती करा …
७) इनडोअर व आऊटडोअर वैदयकीय कॅशलेस योजना तात्काळ लागू करा …
८ ) स्वहक्काच्या लालपरी बांधणीसाठी चॅसीस दया … व लालपरीचे खाजगीकरण कायमस्वरूपी थांबवा …
९) स्वच्छ व सुंदर विश्रांतीगृहाची पूर्तता करा …
१०) धाववेळ वाढवून देत वेळापत्रकातील त्रुटी दूर करा …या
कामगारांच्या प्रलंबित आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी एसटी कामगार सयुक्त कृती समितीने धरणे आंदोलनाचा निर्णय घेतलेला होता. मात्र राज्य सरकारने सकारात्मकता दर्शवून आमच्या मागण्या सोडवणुकीचे आश्वासन दिलेले होते त्यामुळे दि. ०९/०८/२०२४ रोजीचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलेले होते. मात्र सरकार निव्वळ वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचे निदर्शनास येत असल्याने व आमच्या मागण्या दुर्लक्षित करत असल्याने राज्य सयुक्त कृती समितीने दि. ०३/०९/२०२४ रोजी पासून धरणे आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे. व राज्यभरातील महामंडळाच्या प्रत्येक विभाग/आगार व युनिट समोर धरणे आंदोलन करण्याची नोटीस शासन व प्रशासनाला बजावली आहे. तरी भानए… आगार चे गेट समोर दिनांक ०३/०९/२०२४ पासून बहुसंख्य कर्मचारी आपल्या न्याय्य मागण्यासाठी बेमुदत धरणे धरणार आहेत. महाराष्ट्र एस.टी. कामगार कृती समितीच्या वतीने निवेदन दिले
आहे.

🛑आजरा नगरपंचायत क्षेत्रातील विविध प्रश्नावर अन्याय निवारण समितीची बैठक संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत आजऱा येथील नगरपंचायत क्षेत्रातील विविध प्रश्नावर अन्याय निवारण समितीची बैठक झाली. दि. २ रोजी आजरा नगरपंचायत मध्ये अन्याय निवारण समितीची मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्याबरोबर बैठक झाली. बैठकीमध्ये प्रामुख्याने नगरपंचायत क्षेत्रातील विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली आजरा पाणी फिल्टर हाऊस परिसरात आझादी अमृत महोत्सव वर्षा निमित्त बांधलेले स्वातंत्र्य सैनिक स्मारकाची होत असलेली दुर्दशा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली व त्याची ताबडतोब स्वच्छता करून कायम स्वरूपी तो परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियोजन लावण्याची विनंती केली. पावसाळ्यात पडलेल्या घरांच्या भिंतीचा पंचनामे करून संबंधितांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्याची ही विनंती केली. त्यावेळी अधिकारी सुर्वे यांनी स्पष्ट केले की माझेकडे सर्व फायली त्याचवेळी क्लिअर करून संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवले आहेत तसेच काही दिवसावर आलेल्या गणपतीच्या सणा निमित्त गांधीनगर व संपूर्ण आजरा तील खड्डे मुरूम टाकून ताबडतोब भरून घ्यावे ही विनंती केली, वाणी गल्लीतील बऱ्याच वेळेपासून प्रलंबित असलेला गटरीचा प्रश्न मुख्याधिकारी श्री सुर्वे व संबंधित कॉन्ट्रॅक्टरला फोन करून ताबडतोब काम चालू करण्यासाठी सूचना केल्या तसेच बेशिस्त कामगारांना ( जी कामावर हजर होत नाहीत) अशा कामगारांना काढून टाकून त्या ठिकाणी नवीन कामगार नेमण्यात यावेत अशी सुचना केली. या बैठकीला अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे ( भाऊजी ) उपाध्यक्ष गौरव देशपांडे, सचिव. पांडुरंग सावरतकर, सेक्रेटरी वाय बी चव्हाण, दिनकर जाधव, जोतिबा आजगेकर, सी डी सरदेसाई, जावेद पठाण, अभिजीत संकपाळ, संतोष बांदिवडेकर सह सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.